एक्स्प्लोर

Mayayuti Seat Sharing In Maharashtra : एकेरी जागा ते पक्ष तुमचा, चिन्ह आमचं! शिंदे-अजित पवारांची मोदी शाहांच्या महाशक्तीसमोर 'किती' डील होणार?

शिंदे आणि अजित पवार गटामध्ये जागांवरून नाराजी पसरली आहे. कार्यकर्त्यांपासून ते नेत्यांपर्यंत जागा वाटपामध्ये किती जागा मिळणार? आणि त्या मिळाल्या तरी कोणत्या असणार याचीच चर्चा रंगली आहे.

Mayayuti Seat Sharing In Maharashtra : धरलं तर चावतंय आणि सोडलं तर पळतंय अशी अवस्था महायुतीमध्ये शिंदे गट आणि अजित पवार गटाची लोकसभेच्या जागावाटपामध्ये (Loksabha Election 2024) झाली आहे का? अशी चर्चा राजकीय वर्तुळामध्ये रंगली आहे. गेल्या काही दिवसांमध्ये महायुतीमध्ये (Mayayuti Seat Sharing In Maharashtra) जागावाटपावरून कमालीचा काथ्याकूट सुरु आहे. भाजपकडून (BJP) सर्वाधिक जागांची मागणी सुरू असतानाच शिवसेना शिंदे गट (Eknath Shinde) आणि राष्ट्रवादी फोडून सत्तेत आलेल्या अजित पवार गटाला (Ajit Pawar) 2019 मध्ये ज्या जागांवर निवडणूक लढवली त्या जागांसाठी आग्रही आहेत. मात्र, भाजपकडून त्यांना आतापर्यंत तरी ठेंगा दाखवण्यात आला आहे. त्यामुळे अजित पवार आणि शिंदे गटांमध्ये सुद्धा जागा वाटपावरून कमालीची अस्वस्थता पसरली आहे. 

कितीही वरून दाखवण्याचा प्रयत्न होत असला तरी शिंदे आणि अजित पवार गटामध्ये जागांवरून नाराजी पसरली आहे. कार्यकर्त्यांपासून ते नेत्यांपर्यंत जागा वाटपामध्ये किती जागा मिळणार? आणि त्या मिळाल्या तरी कोणत्या असणार याचीच चर्चा रंगली आहे. इतकेच नव्हे तर अजित पवार आणि शिंदे गटाला जरी काही जागा सुटल्या तरी त्या भाजपच्या चिन्हावर लढाव्या लागणार असल्याने अस्वस्थता आणखी वाढत गेली आहे. 

केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी (Amit Shah) महायुतीच्या जागावाटपावर मुंबईत (Mumbai) तीन बैठका घेतल्या. त्यांनी यावेळी सबुरीचा सल्ला विजयी होणाऱ्या उमेदवारावर जोर लावणार असल्याची स्पष्टोक्ती दिली. इतके होऊनही महायुतीमधील शिंदे आणि अजित पवार गटातून नाराजीचा सूर कायम आहे. या सर्व पार्श्वभूमीवर महायुतीची जागावाटपाची चर्चा आता दिल्लीमधूनच होणार आहेत. आज (8 मार्च) दिल्लीत प्रथम अमित शाह आणि भाजप अध्यक्ष नड्डांच्या उपस्थितीत अजित पवार, एकनाथ शिंदे आणि फडणवीस यांच्यात बैठक होणार आहे. 

दोन्ही गटाला जागा किती वाट्याला येतात आणि त्या कोणत्या असतील याकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष असताना अमित शाह आणि नरेंद्र मोदी यांची मित्रपक्षांसोबत असलेली "कार्यशली" पाहता शिंदे गट आणि अजित पवार गट हे कितपत बोली करून जागा पदरात पाडून घेऊ शकतात, हा मुद्दाच आहे. इतकंच नाही, तर केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांचे भाजपच्या पहिल्या यादीत नाव नसणे यावरूनही अंदाज येऊ शकतो. संघ परिवारात भक्कम नाव असूनही गडकरी यांचे नाव पहिल्या यादीत नसल्याने भूवया उंचावल्या गेल्या आहेत. दुसरीकडे, महाराष्ट्रातील विरोधातील सर्व्हे सुद्धा महायुतीसाठी धोक्याचा इशारा देऊन गेले आहेत. 

जागावाटपावरून काथ्याकूट सुरु असतानाच मतदारसंघातील वाद डोकेदुखी वाढत आहे. जवळपास 15 लोकसभा मतदारसंघामध्ये महायुतीचा स्थानिक पातळीवरील वाद सुरु आहे. अजित पवारांचा बालेकिल्ला असणाऱ्या पुणे जिल्ह्यातील मावळ आणि शिरुर जागेवरूनही वाद सुरु आहे. मुंबईमधील जागांवरूनही वाद सुरु आहे. शिंदे गटाकडे असलेल्या जागांवरून वाद सुरु आहे. त्यामुळे जागावाटपाचा तिढा सोडवल्यानंतर स्थानिक पातळीवर मोठी कसरत करावी लागणार आहे. 

दोन्ही गटात नाराजीचा सूर 

महायुतीमधील जागा वाटपावरून पहिल्यांदा शिंदे गटाकडून भाजपला कडाडून विरोध सुरू झाला. यामध्ये सर्वात प्रथम रामदास कदम यांनी केसाने गळा कापू नका अशा भाषेमध्ये आपला संताप व्यक्त केला.रामदास कदम (Ramdas Kadam) यांची वक्तव्ये पाहता ते इतकी मोठी वक्तव्ये मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना झुगारून करतील का? दुसरीकडे, दादा भूसे यांनी लावलेला तोच सूर तसेच 2019 मध्ये मुख्यमंत्रीपदाचा शब्द देण्यात आला होता, असे संजय शिरसाटांकडून जाहीरपणे सांगणे हा निश्चितच योगायोग नाही. एक प्रकारे भाजपला संदेश दिल्याची चर्चा आहे. तत्पूर्वी गजानन कीर्तीकर यांनी सुद्धा भाजपवर तोफ डागली होती. जागावाटपामध्ये दुय्यम भूमिका दिली जात असल्याचा आरोप केला होता. रामदास कदम यांचा आवाज वाढल्यानंतर तातडीने त्यांचा मुलगा सिद्धेश कदम यांना राज्य प्रदूषण नियंत्रण मंडळाचे अध्यक्षपद तातडीने देऊन त्यांचा आवाज कमी केल्याची चर्चा आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची मुकसहमती असल्याशिवाय हे नेते बोलतील का? असाही प्रश्न आहे. 

अजित पवार गटातही नाराजी

शिंदे गटाची चर्चा एका बाजूने असतानाच अजित पवार गटातूनही जागावाटपावर छगन भुजबळ यांनी जितक्या जागा शिंदे गटाला देऊ केल्या जातील, तितक्या जागा आम्हाला सुद्धा हव्यात अशी मागणी केली आहे. प्रफुल पटेल यांनीही स्थानिक जागांवरून इशारा दिला आहे. त्यामुळे भाजप समोर आव्हाने वाढत आहेत. समोर आलेल्या आकडेवारीनुसार अजित पवार गट आणि शिंदे गट यांनी जवळपास 22 जागांवर (13+9) दावा केला आहे. त्यामुळे इतक्यात जागा द्यायच्या झाल्यास 2019 च्या सूत्रानुसार भाजपला लोकसभेच्या रिंगणात उतरावं लागेल अशी चिन्हे आहेत. मात्र, भाजपकडून करण्यात आलेले सर्व्हे, तसेच महायुतीकडून करण्यात आलेले सर्व्हे शिंदे गटासाठी अजित पवार गटासाठी परिस्थिती अनुकूल नसल्याची चर्चा सुद्धा आहे. ज्या ठिकाणी परिस्थिती अनुकूल नसेल त्याठिकाणी भाजपच्या चिन्हावर निवडणूक लढवण्यास सांगितले जाऊ शकते. त्यामुळे सुद्धा कार्यकर्ते आणि नेत्यांमध्ये अस्वस्थता पसरली आहे.

जागा वाटपामध्ये सन्मान मिळत नसल्याने आता भाजपला अजित पवार आणि शिंदे गटाकडून आश्वासनाची आठवण सुद्धा करून देण्यात येत आहे. इतकेच नव्हे तर जागा वाटपावरून अजित पवार हे नाराज असल्याची चर्चा आहे. त्यांनी लोकसभेसाठी नऊ आणि विधानसभेसाठी 90 जागा मिळाव्यात अशी अपेक्षा व्यक्त केली आहे. मात्र, विधानसभेचे गणित अजून लांब असलं, तरी लोकसभेसाठी नऊ जागा खरोखरच भाजपकडून देण्यात येणार का? हा मात्र मोठा प्रश्न आहे. 

मित्रपक्षांना देताना भाजपची कसरत 

एकीकडे लोकसभेच्या निवडणुकीसाठी भाजपकडून पहिली यादी जाहीर करण्यात आली असली, तरी ज्या नेत्यांना निवडणुकीच्या रिंगणात उतरावं लागणार होतं, अशाच नेत्यांची यादी जाहीर करण्यात आली आहे. यामध्ये कोणत्याही प्रकारचा वाद नसलेल्या हक्काच्या जागांवर उमेदवार उतरवण्यात आले आहेत. मात्र, उत्तर प्रदेशमधील अजूनही 29 उमेदवार घोषित करण्यात आलेले नाहीत. त्यामुळे मित्र पक्षांना जागा सोडताना भाजपला कमालीची कसरत करावी लागणार आहे. मित्रपक्ष सोबत हवे आहेत. मात्र, त्यांना हव्या किंवा अपेक्षित असलेल्या जागा देण्याची कोणतीही मानसिकता भाजपकडून आजवर दिसून आलेली नाही. त्यामुळे या जागा सोडताना मोठी कसरत करावी लागणार आहे. 

महाराष्ट्रात भाजप बॅकफूटवर?

दुसरीकडे, भाजपने भाजपने 195 उमेदवारांची यादी जाहीर करण्यात आली असली, तरी महाराष्ट्रामधील एकाही जागेचा यामध्ये समावेश नाही. इतकेच नव्हे तर भाजपकडून 34 केंद्रीय राज्यमंत्र्यांना निवडणुकीच्या रिंगणात उतरवण्यात आलं आहे. तीन माजी मुख्यमंत्र्यांना सुद्धा निवडणुकीच्या रिंगणात उतरवण्यात आलं आहे. एवढे सगळे होत असताना महाराष्ट्रामध्ये एकाही जागेसाठी उमेदवार घोषित करण्यात आलेला नाही. अपवाद राहिला तो कृपाशंकर सिंह यांचा. त्यांना   उत्तर प्रदेशातील जौनपूर लोकसभा मतदारसंघातून उमेदवारी देण्यात आली आहे. हा अपवाद वगळता महाराष्ट्रातील कुठल्याच जागेवर उमेदवार घोषित करण्यात आलेला नाही. 

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Weather Updates: पाऊस कधी येणार? मान्सूनबाबत हवामान खात्याची महत्त्वाची अपडेट, अंदमानमध्ये 'या' तारखेला आगमन
पाऊस कधी येणार? मान्सूनबाबत हवामान खात्याची महत्त्वाची अपडेट, अंदमानमध्ये 'या' तारखेला आगमन
World Most Expensive Movie : जगातला सर्वात महागडा चित्रपट कोणता? 'या' बजेटमध्ये अल्लू अर्जुनचा पुष्पा 20 वेळा बनेल
जगातला सर्वात महागडा चित्रपट कोणता? 'या' बजेटमध्ये अल्लू अर्जुनचा पुष्पा 20 वेळा बनेल
सुशीलकुमार मोदी यांचं निधन, बिहारमधील भाजपचा चेहरा हरपला
सुशीलकुमार मोदी यांचं निधन, बिहारमधील भाजपचा चेहरा हरपला
पाकिस्तानच्या व्हॉट्सअॅप ग्रुपमध्ये चॅटिंग, अनेकांना मारण्याचं प्लॅनिंग, दहशतवादी कृत्यांची चर्चा; नांदेडमधील युवक गुजरात पोलिसांच्या ताब्यात
पाकिस्तानच्या व्हॉट्सअॅप ग्रुपमध्ये चॅटिंग, अनेकांना मारण्याचं प्लॅनिंग, दहशतवादी कृत्यांची चर्चा; नांदेडमधील युवक गुजरात पोलिसांच्या ताब्यात
Advertisement
for smartphones
and tablets

व्हिडीओ

ABP Majha Headlines : 07 AM : 14 May 2024 : Maharashtra News : एबीपी माझा हेडलाईन्सABP Majha Headlines : 6.30 PM : 14 May 2024 : Maharashtra News : एबीपी माझा हेडलाईन्सTOP 100 : टॉप 100 बातम्यांचा वेगवान आढावा : टॉप 100 न्यूज : 14 May 2024 : ABP MajhaZero Hour Amit Shah : महाराष्ट्रात भाजपला किती जागा मिळतील? झीरो अवरमध्ये सविस्तर चर्चा

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Weather Updates: पाऊस कधी येणार? मान्सूनबाबत हवामान खात्याची महत्त्वाची अपडेट, अंदमानमध्ये 'या' तारखेला आगमन
पाऊस कधी येणार? मान्सूनबाबत हवामान खात्याची महत्त्वाची अपडेट, अंदमानमध्ये 'या' तारखेला आगमन
World Most Expensive Movie : जगातला सर्वात महागडा चित्रपट कोणता? 'या' बजेटमध्ये अल्लू अर्जुनचा पुष्पा 20 वेळा बनेल
जगातला सर्वात महागडा चित्रपट कोणता? 'या' बजेटमध्ये अल्लू अर्जुनचा पुष्पा 20 वेळा बनेल
सुशीलकुमार मोदी यांचं निधन, बिहारमधील भाजपचा चेहरा हरपला
सुशीलकुमार मोदी यांचं निधन, बिहारमधील भाजपचा चेहरा हरपला
पाकिस्तानच्या व्हॉट्सअॅप ग्रुपमध्ये चॅटिंग, अनेकांना मारण्याचं प्लॅनिंग, दहशतवादी कृत्यांची चर्चा; नांदेडमधील युवक गुजरात पोलिसांच्या ताब्यात
पाकिस्तानच्या व्हॉट्सअॅप ग्रुपमध्ये चॅटिंग, अनेकांना मारण्याचं प्लॅनिंग, दहशतवादी कृत्यांची चर्चा; नांदेडमधील युवक गुजरात पोलिसांच्या ताब्यात
गुजरातचं पॅकअप, पावसामुळे सामना रद्द, कोलकाताचं अव्वल स्थान अधिक मजबूत
गुजरातचं पॅकअप, पावसामुळे सामना रद्द, कोलकाताचं अव्वल स्थान अधिक मजबूत
Pune Loksabha : शिरुर, मावळच्या तुलनेत पुण्यात मतदानाचा आकडा वाढण्याची चिन्हे; कोणाच्या काळजाचा ठोका चूकणार?
शिरुर, मावळच्या तुलनेत पुण्यात मतदानाचा आकडा वाढण्याची चिन्हे; कोणाच्या काळजाचा ठोका चूकणार?
CSK विरोधातील सामन्याआधी RCB च्या अडचणी वाढल्या, दोन खेळाडू मायदेशी परतले, प्लेऑफचा प्रवास कठीण 
CSK विरोधातील सामन्याआधी RCB च्या अडचणी वाढल्या, दोन खेळाडू मायदेशी परतले, प्लेऑफचा प्रवास कठीण 
Sagli : सांगली रेल्वे स्टेशनवर बॉम्ब ठेवल्याची अफवा, पोलिसांकडून सांगली-मिरज स्टेशनची झाडाझडती 
Sagli : सांगली रेल्वे स्टेशनवर बॉम्ब ठेवल्याची अफवा, पोलिसांकडून सांगली-मिरज स्टेशनची झाडाझडती 
Embed widget