Arvind Sawant On Sabhajiraje : उद्धव ठाकरे शिवसैनिकाला डावलून संभाजी राजेंना जागा द्यायला तयार होते, पण....
Arvind Sawant On Sabhajiraje : मुख्यमंत्री उध्दव ठाकरे (CM Udhhav Thackeray) जड अंतःकरणाने शिवसैनिकाला डावलून संभाजी राजेंना जागा द्यायला तयार होते, पण त्यांनी शिवसेनेत यावं, ही इच्छा होती.
Arvind Sawant On Sabhajiraje : उद्धव ठाकरे मुख्यमंत्री झाल्यापासून रोज एक मुहूर्त काढला जातोय सरकार पाडण्याचा, हा सगळा गदारोळ महाराष्ट्र बघतो आहे, सरकार पडत नाही म्हणून असे प्रकार सुरू असून माझ्या इतक्या वर्षाच्या राजकीय प्रवासात एवढं खालच्या पातळीचे राजकारण मी कधीच बघितलं नसल्याचे वक्तव्य खासदार शिवसेना नेते अरविंद सावंत यांनी केले आहे. सावंत हे नाशिक दौऱ्यावर असतांना त्यांनी पत्रकारांशी सवांद साधला.
शिवसंपर्क अभियानाच्या पार्श्वभूमीवर शिवसेना नेते हे नाशिक दौऱ्यावर होते. ते यावेळी म्हणाले, महाविकास आघाडी सरकार पडण्याचा दावा आखला जात आहे, त्यासाठी विरोधक वाट्टेल ते राजकारण करत असून राजकीय प्रवासात एवढं खालच्या पातळीचे राजकारण मी कधीच बघितलं नसल्याचे त्यांनी सांगितले.
सुशांत पासून कंगना पर्यंत हा प्रकार
उद्धव ठाकरे मुख्यमंत्री झालेले विरोधकांना पाहवत नाहीय, यासाठी हवा तो विरोध करण्यात येत आहे. आठवून बघा, सुशांत पासून कंगना पर्यंत हा प्रकार सुरू आहे. तसेच तत्कालीन मुख्यमंत्री फडणवीस यांनी केलेलं भाषण पहा, ज्यांच्यावर आरोप केले होते, ते त्यांच्या पक्षात गेले आणि पावन झाले, मंत्री झाले. एवढं करून सरकार स्थापन होत नाही म्हटल्यावर काय करायचं असा त्यांना प्रश्न पडला. म्हणून मुख्यमंत्री म्हणाले की तुम्ही राष्ट्रवादी सोबत सत्ता स्थापन केली असती तर हीच लोक पावन झाली असती काय? शिवसेना शब्दाला जागणारा देशातील एकमेव पक्ष
शिवसेना शब्दाला जागणारा देशातील एकमेव पक्ष असून आमच्यावर वंदनीय बाळासाहेब ठाकरेंचे संस्कार असल्याचे ते बोलले. राज्यसभा आणि लोकसभा संख्येला महत्त्व असल्याने मग आमचा अधिकृत उमेदवार राज्यसभेत जायला हवा. उध्दव ठाकरे जड अंतःकरणाने शिवसैनिकाला डावलून संभाजी राजेंना जागा द्यायला तयार होते, पण त्यांनी शिवसेनेत यावं, ही इच्छा होती, पण त्यांना बंधन नको होत, त्यांना अपक्ष हवं होत, शिवसेना फरफट होण्यासाठी जन्माला आलेली नाही.
सोमय्या म्हणजे ईडीचा प्रवक्ता
सोमय्या म्हणजे ईडीचा प्रवक्ता असून तो सांगतो उद्या त्याला जेल होणार, त्याला सध्या झेड प्लस सुरक्षा असून जेव्हा कोर्टाकडून दिलासा मिळतो, तेव्हा बाहेर येतो. ईडीने अद्याप वानखेडे,नवलानी यांच्यावर कारवाई केली नाही. गुजरात मध्ये 20 हजार कोटींचे हिरॉईन मिळाले त्याच काय झालं? मीडियाने देखील हे काही दाखवले नाही, राज्यातून अनेक प्रकल्प गुजरात मध्ये पळवून नेण्यात येत आहे.