एक्स्प्लोर

Sambhajiraje Chhatrapati : राज्यसभेच्या निवडणुकीतून संभाजीराजेंची माघार, म्हणाले, हा माझा स्वाभिमान

मी राज्यसभा निवडणुकीला सामोरं जाणार नाही, पण ही माझी माघार नसून स्वाभिमान असल्याचे मत संभाजीराजे छत्रपती यांनी व्यक्त केले.

sambhajiraje chhatrapati : शिवसेनेनं माझ्यासमोर पक्ष प्रवेशाची अट कायम ठेवली होती, पण मी स्पष्ट शब्दात नकार दिल्याचे वक्तव्य संभाजीराजे छत्रपती यांनी केले. छत्रपतीला आम्हाला बाजूला ठेवायचे नाही. बरोबर ठेवायचे आहे. त्यामुळे तुम्ही शिवसेनेत प्रवेश करावा असा प्रस्ताव मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी माझ्यासमोर ठेवला होता,असे संभाजीराजे यांनी सांगितले. दरम्यान, यावेळी संभाजीराजे यांनी मोठा निर्णय घेतला आहे. मी राज्यसभा निवडणुकीला सामोरं जाणार नाही, पण ही माझी माघार नसून, स्वाभिमान असल्याचे संभाजीराजे म्हणाले.

पुढचा प्रवास किती खडतर हे मला माहित आहे

राज्यसभेचा कार्यकाळ संपल्यानंतर पुढची वाटचाल कशी असणार अशी चर्चा होती. त्यावेळी मी दोन राजकीय निर्णय जाहीर केले होते. त्यावेळी मी बोललो होतो की राज्यसभा निवडणुक लढवणार आहे. पुढचा प्रवास किती खडतर आहे हे मला माहिती होते. मागील 15 ते 20 वर्षे मी काम करतो आहे. खासदारकी असताना समाजाची भुमिका मांडण्याचा प्रयत्न मी करत होतो. त्यामुळेच माझी इच्छा होती की सर्व पक्षांनी मिळून मला राज्यसभेत पाठवावं असे संभाजीराजे म्हणाले. मी मुख्यमंत्र्यांना सांगू इच्छितो की, शिवजी महाराज यांचं स्मारक असेल तिथं आपण दोघांनी जायचं आणि संभजीराजे खोटं बोलतायत का हे सांगायच असेही संभाजीराजे यावेळी म्हणाले.

मुख्यमंत्र्यांचा फोन

मला दोन खासदार भेटायला आले आणि त्यांनी मला सांगितलं की शिवसेनेत तुम्ही प्रवेश करा. उद्या आपली उमेदवारी जाहीर करु. त्यानंतर मुख्यमंत्र्यांचाही मला फोन आला. त्यांनी मला भेटायला बोलवलं होतं असेही ते म्हणाले. त्यांनी आम्हाला सांगितले की, छत्रपती आमच्यासोबत हवे आहेत. शिवसेनेत प्रवेश करावा असे त्यांनी सांगितले, पण मी त्यांना सांगितल की मी अपक्ष निवडणूक लढवणार आहे. त्यांना मी प्रस्ताव सांगितलं की, मला महाविकास आघाडी पुरस्कृत उमेदवार घोषित करा. पण मुख्यमंत्री म्हणाले की, हे शक्य होणार नाही. परंतू ते म्हणाले की शिवसेना पुरस्कृत उमेदवार व्हा. त्यानंतर त्यांच्या एका मंत्र्यांचा फोन आला की आपण एक मध्यमार्ग काढू. त्यानंतर एक ड्राफ्ट तयार करण्यात आला. तो ड्राफ्ट माझ्याकडे आहे. त्यानंतर एक शिष्टमंडळ आलं. मुख्यमंत्र्यांचे एक स्नेही माझ्याकडे आले त्यांनी सांगितले की, शिवसेनेत तुम्ही प्रवेश करा. त्यानंतर त्यांनी एक ड्राफ्ट मला सांगितला, तो ड्राफ्ट फायनल केला. त्यानंतर मी कागदपत्रे तयार करण्यासाठी कोल्हापूरला गेल्याचे संभाजीराजेंनी सांगितले.

त्या आमदारांच्या पाठीशी आयुष्यभर उभा राहणार

कोल्हापूरला जाताना मी बातम्या पहिल्या की कोल्हापूरच्या एका व्यक्तीला उमेदवारी दिली. संभाजीराजे शिवबंधन बांधणार अशा बातम्या दिल्या गेल्या.यावेळी मी मुख्यमंत्र्यांना फोन केला, परंतु त्यांनी फोन उचलला नाही. त्यांनी शब्द पाळला नाही. असेही संभाजीराजे म्हणाले. येमाऱ्या काळात विस्तापित मावळ्यांना एकत्र करण्याचे काम मी करणार आहे. मी स्वराज्यच्या माध्यमातून उभा रहाणार आहे. ज्या आमदारांनी सह्या केल्या त्यांच्या पाठीशी मी आयुष्यभर राहणार असल्याचे संभाजीराजे म्हणाले.

घोडेबाजार होऊ नये म्हणून मी निवडूक लढवणार नाही

शिवसेनेनं ऑफर दिली ती स्वीकारली असती तर मी खासदार झालो असतो. मला सर्व आमदार म्हणत आहेत की, आपण निवडणुक लढावावी. परंतू मला माहिती आहे त्याठिकाणी घोडेबाजार होणारं आहे असेही संभाजीराजे म्हणाले. घोडेबाजार होऊ नये म्हणून मी निवडुकीला समोर जाणार नाही, ही माझी माघार नसून हा माझा स्वाभिमान असल्याचे संभाजीराजे म्हणाले.

महत्त्वाच्या बातम्या

मुख्यमंत्र्यांनी 3 वर्षांपूर्वी उद्घाटन केलेला पूल गेला वाहून; ठेकेदारावर गुन्ह्याची मागणी, रोहित पवारांची खोचक टीका
मुख्यमंत्र्यांनी 3 वर्षांपूर्वी उद्घाटन केलेला पूल गेला वाहून; ठेकेदारावर गुन्ह्याची मागणी, रोहित पवारांची खोचक टीका
सावजी जेवणाच्या वक्तव्यावरुन वाद, तुकाराम मुंढेंची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, माफी मागण्याचा प्रश्नच नाही
सावजी जेवणाच्या वक्तव्यावरुन वाद, तुकाराम मुंढेंची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, माफी मागण्याचा प्रश्नच नाही
ABP Majha Top Headlines : ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 05 ऑगस्ट 2026 | बुधवार
ABP Majha Top Headlines : ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 05 ऑगस्ट 2026 | बुधवार
Video: 'ज्यांनी आमचं संरक्षण केलं पाहिजे तेच आम्हाला चोपून काढत आहेत' मुंबई पोलिसांची गाडी भर रस्त्यात अडवणाऱ्या रियासह देशातील तरुणी राहुल गांधींच्या भेटीला
Video: 'ज्यांनी आमचं संरक्षण केलं पाहिजे तेच आम्हाला चोपून काढत आहेत' मुंबई पोलिसांची गाडी भर रस्त्यात अडवणाऱ्या रियासह देशातील तरुणी राहुल गांधींच्या भेटीला

व्हिडीओ

Sunil Tatkare On Congress : काँग्रेसने वैचारिक दिवाळखोरी दाखवली; सुनील तटकरेंचा घणाघाती हल्ला
Mumbai Police Salary Scam | पोलिसात ‘घुसखोरी’ पगारात चोरी | ABP Majha Special Report
Congress On Sunetra Pawar : गूंगी गुडियाचा टोला, वाद विकोपाला | Special Report ABP Majha
Ketan Agarwal Case Update : सियाचं कांड, लग्नाआधीच गुप्तहेरांना डिमांड | Special Report ABP Majha
Sanjay Raut Delhi PC : बिहारमधील निकालावरून संजय राऊतांचा भाजपवर हल्लाबोल

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
विलास घुले मृत्यू प्रकरण! खासदार बजरंग सोनवणेंच्या मुलाला अटक करा नाहीतर आम्ही… बीड जिल्हाधिकारी कार्यालयासमोर घुले कुटुंबीयांचे आमरण उपोषण 
विलास घुले मृत्यू प्रकरण! खासदार बजरंग सोनवणेंच्या मुलाला अटक करा नाहीतर आम्ही… बीड जिल्हाधिकारी कार्यालयासमोर घुले कुटुंबीयांचे आमरण उपोषण 
मुख्यमंत्र्यांनी 3 वर्षांपूर्वी उद्घाटन केलेला पूल गेला वाहून; ठेकेदारावर गुन्ह्याची मागणी, रोहित पवारांची खोचक टीका
मुख्यमंत्र्यांनी 3 वर्षांपूर्वी उद्घाटन केलेला पूल गेला वाहून; ठेकेदारावर गुन्ह्याची मागणी, रोहित पवारांची खोचक टीका
Video: 'ज्यांनी आमचं संरक्षण केलं पाहिजे तेच आम्हाला चोपून काढत आहेत' मुंबई पोलिसांची गाडी भर रस्त्यात अडवणाऱ्या रियासह देशातील तरुणी राहुल गांधींच्या भेटीला
Video: 'ज्यांनी आमचं संरक्षण केलं पाहिजे तेच आम्हाला चोपून काढत आहेत' मुंबई पोलिसांची गाडी भर रस्त्यात अडवणाऱ्या रियासह देशातील तरुणी राहुल गांधींच्या भेटीला
Shiv Sena Symbol Case : शिंदेंच्या 31 आमदारांनी स्वेच्छेने शिवसेना सोडली, पाठीशी महाशक्ती असल्याचा दावा म्हणजे पक्षविरोधी कारवाई; शिवसेनेच्या सुनावणीतील 25 मोठे मुद्दे
शिंदेंच्या 31 आमदारांनी स्वेच्छेने शिवसेना सोडली, पाठीशी महाशक्ती असल्याचा दावा म्हणजे पक्षविरोधी कारवाई; शिवसेनेच्या सुनावणीतील 25 मोठे मुद्दे
सावजी जेवणाच्या वक्तव्यावरुन वाद, तुकाराम मुंढेंची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, माफी मागण्याचा प्रश्नच नाही
सावजी जेवणाच्या वक्तव्यावरुन वाद, तुकाराम मुंढेंची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, माफी मागण्याचा प्रश्नच नाही
आता तर विधिमंडळ पक्ष दुसऱ्याच राजकीय पक्षात विलीन होत आहेत, लोकशाही मूल्यांचे रक्षण कसे करायचे, याचा निर्णय तुम्हालाच घ्यावा लागेल; कपिल सिब्बलांची 'सर्वोच्च' साद
आता तर विधिमंडळ पक्ष दुसऱ्याच राजकीय पक्षात विलीन होत आहेत, लोकशाही मूल्यांचे रक्षण कसे करायचे, याचा निर्णय तुम्हालाच घ्यावा लागेल; कपिल सिब्बलांची 'सर्वोच्च' साद
इकडं जंतर मंतरवर विद्यार्थ्यांना अमानुष मारहाण, राम मंदिर लुटीवर चर्चेसाठी विरोधक एकवटले अन् तिकडं संसदेत पराभव होऊन सुद्धा केंद्र सरकार मतदारसंघ पुनर्रचना विधेयक पुन्हा आणण्याच्या तयारीत
इकडं जंतर मंतरवर विद्यार्थ्यांना अमानुष मारहाण, राम मंदिर लुटीवर चर्चेसाठी विरोधक एकवटले अन् तिकडं संसदेत पराभव होऊन सुद्धा केंद्र सरकार मतदारसंघ पुनर्रचना विधेयक पुन्हा आणण्याच्या तयारीत
Tukaram Mundhe: ॲनालॉग पनीर काय आहे, 1 वर्षांनंतरही बंदी वाढवणार का? तुकाराम मुंढेंनी सगळं सांगितलं, म्हणाले, आरोग्याशी तडजोड नाही
ॲनालॉग पनीर काय आहे, 1 वर्षांनंतरही बंदी वाढवणार का? तुकाराम मुंढेंनी सगळं सांगितलं, म्हणाले, आरोग्याशी तडजोड नाही
Embed widget