एक्स्प्लोर

Pune Crime : धक्कादायक! बांगलादेशी व्यक्तीने पुण्यात जागा घेऊन घरही बांधले, 500 रुपयात बनावट आधारकार्ड काढलं

Bangladeshi In India : बांगलादेशातून आलेल्या व्यक्तीने भिवंडीत 500 रुपये देऊन बनावट आधारकार्ड काढलं. त्यानंतर भारतीय असल्याचं सांगत त्याने पुण्यात जागा घेऊन संसार थाटला. 

पुणे : म्यानमारमधून बांगलादेशात आलेल्या आणि त्यानंतर पुण्यात राहिलेल्या रोहिंग्या व्यक्तीने बनावट आधार कार्ड काढून जागा विकत घेतली आणि घर बांधून संसारही थाटल्याचं समोर आलं. विशेष म्हणजे या व्यक्तीवर जुलै महिन्यात पोलिसांनी कारवाई केली होती. त्यानंतरही त्याने खोट्या कागदपत्रांच्या आधारे हे कृत्य केल्याचं समोर आलं. मुजल्लीम खान असं या रोहिंग्या व्यक्तीचं नाव आहे. 

बनावट आधार कार्ड, 80 हजारात जागा घेतली 

जुलै महिन्यात चार रोहिंग्या हे म्यानमारमधून बांगलादेशात आणि बांगलादेशातून थेट पुण्यातील देहूरोड परिसरातील गांधीनगर येथे आले होते. हे चारही लोक पंडित चाळीत बेकायदेशीर पद्धतीने राहत असल्याची माहिती पिंपरी चिंचवड पोलिसांच्या दहशतवाद विरोधी पथकाला मिळाली होती. त्यानंतर पोलिसांनी या चौघांवर कारवाई केली. मात्र याच्यातील एक असलेल्या मुजल्लीम खान यांने पुण्यात 80 हजार रुपयांना जागा विकत घेतली आणि त्या जागेवर घर बांधून संसार देखील थाटला. 

बनावट कागदपत्र वापरून ही जागा बेकायदेशीर पद्धतीने विकत घेतल्याची माहिती आता समोर आली आहे. मुजलीम खान याने चंद्रभागा कांबळे यांच्याकडून 80 हजार रुपयांना 600 चौरस फूट जागा खरेदी केली आणि त्या ठिकाणी घर बांधले. 

म्यानमारमध्ये मौलानाचा कोर्स केला

मुजल्लीम खान याने म्यानमार येथील इस्लामिक संस्थेत मौलाना कोर्स पूर्ण केलाय. तो आणि त्याची पत्नी दोन मुलांसह म्यानमार येथे राहत होता. त्यानंतर 2022 मध्ये तो कुटुंबासह बांगलादेशात राहायला गेला. मात्र बांगलादेशात त्याला काम मिळाले नाही. त्यामुळे तो भारतात आला.

कोलकत्तामध्ये राहत असताना तिथे काम न मिळाल्याने मुजल्लीम खान थेट पुण्याला आला. पुण्यात तो बेकायदेशीर पद्धतीनं राहत होता. देहूरोड परिसरात कपडे विकण्याचा व्यवसाय करत होता. भिवंडीतून कपडे आणून पुण्यातील देहूरोड परिसरात विकायचा. 

500 रुपयात बनावट आधार कार्ड काढलं

भिवंडीत असताना पाचशे रुपये देऊन त्याने आधार कार्ड तयार केलं आणि त्यातून त्याने भारतीय असल्याची ओळख सगळ्यांना पटवून दिली. त्यानंतर या खानने देहूरोड भागात सुपारी विकायला सुरुवात केली. याच काळात देहू रोड येथील गांधीनगर भागातील चंद्रभागा कांबळे यांच्या संपर्कात येऊन त्यांच्याकडून 80 हजार रुपयाने 600 चौरस फूट जागा विकत घेतली आणि तिथेच घर बांधलं. 

मुजल्लीम खान आता जामीनावर बाहेर आहे. मात्र यातून आजूबाजूच्या देशातील लोक बेकायदेशीरपणे आणि बनावट कागदपत्रं तयार करून भारतात कसे घुसखोरी करत आहेत हे पुन्हा एकदा समोर आलं आहे.

ही बातमी वाचा: 

शिवानी पांढरे
Read
आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

Nashik News: नाशिकमध्ये भुताचा वावर, सोशल मीडियावर फोटो-व्हिडीओ व्हायरल, नागरिकांनी रात्रीच्या वेळी गस्त घातली अन्...; नेमकं काय घडलं?
नाशिकमध्ये भुताचा वावर, सोशल मीडियावर फोटो-व्हिडीओ व्हायरल, नागरिकांनी रात्रीच्या वेळी गस्त घातली अन्...; नेमकं काय घडलं?
फरहान अख्तरला 40 कोटी तर दूर, एक पैसाही देणार नाही; ‘डॉन 3’ प्रकरणात रणवीर सिंहचा पलटवार, म्हणाला...
फरहान अख्तरला 40 कोटी तर दूर, एक पैसाही देणार नाही; ‘डॉन 3’ प्रकरणात रणवीर सिंहचा पलटवार, म्हणाला...
Nagpur Accident News: रस्त्याच्या कडेवर उभ्या असलेल्या दुचाकीमुळे 17 प्रवाशांचे वाचले प्राण; नागपुरात एसटी बसचा विचित्र अपघात
रस्त्याच्या कडेवर उभ्या असलेल्या दुचाकीमुळे 17 प्रवाशांचे वाचले प्राण; नागपुरात एसटी बसचा विचित्र अपघात
Superstar First Appeared In Front Of Camera: 47 वर्षांपूर्वी कॅमेऱ्यासमोर पहिल्यांदा आलेला सुपरस्टार; 2026 मध्ये 'बॉर्डर 2'च्या गाजावाज्यात गपचूप दिली 300 कोटींची फिल्म
47 वर्षांपूर्वी कॅमेऱ्यासमोर पहिल्यांदा आलेला सुपरस्टार; 2026 मध्ये 'बॉर्डर 2'च्या गाजावाज्यात गपचूप दिली 300 कोटींची फिल्म

व्हिडीओ

Manoj Jarange Patil : सातारा,मिरज,कोल्हापूर संस्थानचे गॅझेटिअर लागू करा अन्यथा, मनोज जरांगेंचा इशारा
Babanrao Taywade Nagpur : ओबीसींची जनगणना जातीनिहाय व्हावी, बबनराव तायवाडे यांची मागणी
Gosekhurd Dam Issue : गोसेखुर्द बॅकवॉटरमुळे शेतकऱ्यांचं किती नुकसान? Special Report
Sambhajinagar Phulambri : इंग्रजी शाळेतलं भयंकर कृत्य, संभाजीनगर हादरलं Special Report
Mumbai Mayor : रितू तावडेंनी स्वीकारला महापौरपदाचा पदभार Special Report

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Nashik News: नाशिकमध्ये भुताचा वावर, सोशल मीडियावर फोटो-व्हिडीओ व्हायरल, नागरिकांनी रात्रीच्या वेळी गस्त घातली अन्...; नेमकं काय घडलं?
नाशिकमध्ये भुताचा वावर, सोशल मीडियावर फोटो-व्हिडीओ व्हायरल, नागरिकांनी रात्रीच्या वेळी गस्त घातली अन्...; नेमकं काय घडलं?
फरहान अख्तरला 40 कोटी तर दूर, एक पैसाही देणार नाही; ‘डॉन 3’ प्रकरणात रणवीर सिंहचा पलटवार, म्हणाला...
फरहान अख्तरला 40 कोटी तर दूर, एक पैसाही देणार नाही; ‘डॉन 3’ प्रकरणात रणवीर सिंहचा पलटवार, म्हणाला...
Nagpur Accident News: रस्त्याच्या कडेवर उभ्या असलेल्या दुचाकीमुळे 17 प्रवाशांचे वाचले प्राण; नागपुरात एसटी बसचा विचित्र अपघात
रस्त्याच्या कडेवर उभ्या असलेल्या दुचाकीमुळे 17 प्रवाशांचे वाचले प्राण; नागपुरात एसटी बसचा विचित्र अपघात
Superstar First Appeared In Front Of Camera: 47 वर्षांपूर्वी कॅमेऱ्यासमोर पहिल्यांदा आलेला सुपरस्टार; 2026 मध्ये 'बॉर्डर 2'च्या गाजावाज्यात गपचूप दिली 300 कोटींची फिल्म
47 वर्षांपूर्वी कॅमेऱ्यासमोर पहिल्यांदा आलेला सुपरस्टार; 2026 मध्ये 'बॉर्डर 2'च्या गाजावाज्यात गपचूप दिली 300 कोटींची फिल्म
Mumbai Traffic : अतिक्रमणांमुळं रस्त्यांची वाईट अवस्था, पुढच्या दहा वर्षांत मुंबईकर घोड्यानंच प्रवास करतील, उच्च न्यायालयानं मुंबई महापालिकेच्या कारभारावर फटकारलं
अतिक्रमणांमुळं रस्त्यांची वाईट अवस्था, पुढच्या दहा वर्षांत मुंबईकर घोड्यानंच प्रवास करतील, उच्च न्यायालयानं मुंबई महापालिकेच्या कारभारावर फटकारलं
Divya Shinde On Bigg Boss Marathi 6: 'मी मरणाच्या दारात होते, दोन दिवसांनी मला इंजेक्शन दिलं... खरं फुटेजही दाखवलं नाही'; दिव्या शिंदेचे 'बिग बॉस'वर गंभीर आरोप
'मी मरणाच्या दारात होते, दोन दिवसांनी मला इंजेक्शन दिलं...'; दिव्या शिंदेचे 'बिग बॉस'वर गंभीर आरोप
Team India: टीम इंडियावर दुहेरी संकट, अभिषेक शर्मा आजारी आता ईशान किशन दुखापतग्रस्त, धक्कादायक अपडेट समोर
बुमराहच्या यॉर्करवर ईशान किशन दुखापतग्रस्त, टीम इंडियासमोर दुहेरी संकट, सूर्याचं टेन्शन वाढलं
धक्कादायक! घरातील फ्रीजचा स्फोट, घरगुती साहित्याची राखरांगोळी; इमारतीच्या उंच मजल्यापर्यंत धुराचे लोट
धक्कादायक! घरातील फ्रीजचा स्फोट, घरगुती साहित्याची राखरांगोळी; इमारतीच्या उंच मजल्यापर्यंत धुराचे लोट
Embed widget