एक्स्प्लोर

Nashik News : नाशिकमध्ये अदानी समूहाची गुंतवणूक, अदानी ट्रान्समिशन करणार वीज पुरवठा 

Nashik News : महावितरणच्या (Mahavitaran) जोडीला आता अदानी समूह (Adani Group) नाशिकमध्ये वीज वितरण करणार आहे.

Nashik News : नाशिक शहराला भेडसावणारी विजेची समस्या दूर होणार असल्याचे संकेत मिळाले आहेत. देशातील सर्वात मोठा समूह असलेल्या अदानी ट्रान्समिशनने नाशिक परिसरात वितरण व्यवसायासाठी अदानी इलेक्ट्रिसिटी नाशिक लिमिटेड ही शाखा सुरु केली आहे. त्यामुळे आगामी काळात नाशिक शहरात बत्ती गुल होण्याचा प्रश्न मिटणार आहे. 

नाशिक (Nashik) शहराची लोकसंख्या वाढत असून त्यामुळे विजेचा वापर देखील दिवसेंदिवस वाढत आहे. अशातच महावितरणच्या (Mahavitaran) जोडीला आता अदानी समूह (Adani Group) नाशिकमध्ये वीज वितरण करणार आहे. येत्या काळात अदानी ट्रान्स्मिशनकडून (Adani Transmission) नाशिक शहराला वीजपुरवठा करण्यात येणार असून त्या पार्श्वभूमीवर नाशिक शहरात अदानी समूहाने चाचपणी केली आहे. शिवाय अदानी ट्रान्समिशनची एक शाखा देखील शहरात खुली करण्यात आल्याचे समजते आहे. याबाबत माहिती बिजनेस स्टँडर्ड्स या वाहिनीने दिली आहे. त्यामुळे नाशिक शहराला विजेची कमतरता आता भासणार नसल्याचे चित्र आहे. 

दरम्यान देशातील दिग्गज अदानी समूह लवकरच नाशिक शहराला वीज पुरवठा (Power Supply) करणार आहे. याबाबतची माहिती अदानी इलेक्ट्रिसिटी या कंपनीनेच दिली आहे. सद्यस्थितीत नाशिक शहरामध्ये केवळ महावितरण कंपनीचा वीज पुरवठा होत आहे. त्यामुळे आगामी काळात अदानी समूहाकडून वीज पुरवठा उपलब्ध होणार आहे. त्यामुळे नाशकात प्रथमच खासगी वीज व्यावसायिक पुरवठा सेवेत उतरणार आहे. अदानी ट्रान्समिशनने नाशिक परिसरात वितरण व्यवसायासाठी अदानी इलेक्ट्रिसिटी नाशिक लिमिटेड ही शाखा सुरु केली आहे. नाशिक शहरात समांतर वितरण परवाना लागू करण्याचे कंपनीचे उद्दिष्ट आहे. कंपनीने 16 मार्च 2023 रोजी 'अदानी इलेक्ट्रिसिटी नाशिक लिमिटेड' नावाने संपूर्ण मालकीची उपकंपनी सुरु केली आहे. 

महावितरण कंपनी प्रचंड तोट्यात, मात्र... 

अदानी इलेक्ट्रिसिटी नाशिक लिमिटेड या कंपनीची गुजरातमधील (Gujrat) अहमदाबाद येथे 16 मार्च रोजी नोंदणी करण्यात आली आहे. कंपनीच्या म्हणण्यानुसार अदानी इलेक्ट्रिसिटी नाशिक लिमिटेडने अधिकृत कामकाज सुरु केलेलं नाही. अदानींच्या कंपनीने वीज पुरवठा सुरू केला तर नाशिक शहरात महावितरण आणि अदानी असे दोन पुरवठादार राहणार की फक्त अदानीला परवानगी दिली जाणार याबाबत काहीही स्पष्टता झालेली नाही. मात्र शहर परिसरात एकाचवेळी दोन पुरवठादार असले तर वीज पुरवठ्याच्या क्षेत्रात स्पर्धा निर्माण होईल. यातून ग्राहकाला दर्जेदार सेवा आणि किंमतीवरही त्याचा परिणाम होऊ शकतो. मुंबईमध्ये टाटा, अदानी, रिलायन्स यांच्या माध्यमातून वीज पुरवठा होत आहे. अशाच पद्धतीने आता राज्यातील विविध शहरांमध्ये वीज पुरवठ्याची सेवा देण्याचा सरकारचा मानस असल्याचे बोलले जाते.

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

MMRDAला हायकोर्टाचा दणका, मेट्रोसाठीच्या सल्लागार कंपनीचं कंत्राट रद्द केल्याची नोटीस हायकोर्टाकडून रद्द
MMRDAला हायकोर्टाचा दणका, मेट्रोसाठीच्या सल्लागार कंपनीचं कंत्राट रद्द केल्याची नोटीस हायकोर्टाकडून रद्द
लई दिसाची हौस राया... पोलंडच्या तरुणाईची कोल्हापुरात ठसकेबाज लावणी, चला आता जेजुरीला जाऊ...
लई दिसाची हौस राया... पोलंडच्या तरुणाईची कोल्हापुरात ठसकेबाज लावणी, चला आता जेजुरीला जाऊ...
देवाधि देव महादेव... देवाभाऊंनी लिहिलेलं, शंकर महादेवन अन् अमृता फडणवीसांनी गायलेलं महाशिवरात्री गाणं रिलीज
देवाधि देव महादेव... देवाभाऊंनी लिहिलेलं, शंकर महादेवन अन् अमृता फडणवीसांनी गायलेलं महाशिवरात्री गाणं रिलीज
पहिला 'छत्रपती संभाजी महाराज महाराष्ट्र प्रेरणा गीत' पुरस्कार जाहीर; मंत्री आशिष शेलारांकडून पुरस्काराची घोषणा
पहिला 'छत्रपती संभाजी महाराज महाराष्ट्र प्रेरणा गीत' पुरस्कार जाहीर; मंत्री आशिष शेलारांकडून पुरस्काराची घोषणा
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Prajakta Mali Trimbakeshwar | प्राजक्ता माळीच्या नृत्याला विरोध, वादाचा 'तांडव' Special ReportMalvan| छत्रपतींच्या मालवणमध्ये देशद्रोह्यांचा मुक्काम? भारत-पाक सामन्यानंतर देशविरोधी घोषणाGangster Gaja Marne | गजा मारणेवर कारवाई, नेत्यांमधील कोल्ड वॉर? Special ReportZero Hour Full | गजा मारणेसारख्या प्रवृत्तींना आपली यंत्रणा पाठीशी का घालते? ABP Majha

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
MMRDAला हायकोर्टाचा दणका, मेट्रोसाठीच्या सल्लागार कंपनीचं कंत्राट रद्द केल्याची नोटीस हायकोर्टाकडून रद्द
MMRDAला हायकोर्टाचा दणका, मेट्रोसाठीच्या सल्लागार कंपनीचं कंत्राट रद्द केल्याची नोटीस हायकोर्टाकडून रद्द
लई दिसाची हौस राया... पोलंडच्या तरुणाईची कोल्हापुरात ठसकेबाज लावणी, चला आता जेजुरीला जाऊ...
लई दिसाची हौस राया... पोलंडच्या तरुणाईची कोल्हापुरात ठसकेबाज लावणी, चला आता जेजुरीला जाऊ...
देवाधि देव महादेव... देवाभाऊंनी लिहिलेलं, शंकर महादेवन अन् अमृता फडणवीसांनी गायलेलं महाशिवरात्री गाणं रिलीज
देवाधि देव महादेव... देवाभाऊंनी लिहिलेलं, शंकर महादेवन अन् अमृता फडणवीसांनी गायलेलं महाशिवरात्री गाणं रिलीज
पहिला 'छत्रपती संभाजी महाराज महाराष्ट्र प्रेरणा गीत' पुरस्कार जाहीर; मंत्री आशिष शेलारांकडून पुरस्काराची घोषणा
पहिला 'छत्रपती संभाजी महाराज महाराष्ट्र प्रेरणा गीत' पुरस्कार जाहीर; मंत्री आशिष शेलारांकडून पुरस्काराची घोषणा
प्रतिक्षा संपली... BMC मधील '1846 कार्यकारी सहायक' पदांसाठीचा निकाल जाहीर, इथं पाहा तुमची निवड झाली का?
प्रतिक्षा संपली... BMC मधील '1846 कार्यकारी सहायक' पदांसाठीचा निकाल जाहीर, इथं पाहा तुमची निवड झाली का?
गोंदियात रेल्वे इंजिन अनियंत्रित झाल्याने थेट भिंतीवर आदळलं; सुदैवाने जिवीतहानी टळली
गोंदियात रेल्वे इंजिन अनियंत्रित झाल्याने थेट भिंतीवर आदळलं; सुदैवाने जिवीतहानी टळली
Indrajit Sawant : इंद्रजीत सावंतांना धमकी देणाऱ्या प्रशांत कोरटकर विरोधात कारवाई; महापुरुषांचा अवमान, जातीय तेढ आणि जीवे मारण्याचा गुन्हा दाखल
इंद्रजीत सावंतांना धमकी देणाऱ्या प्रशांत कोरटकर विरोधात कारवाई; महापुरुषांचा अवमान, जातीय तेढ आणि जीवे मारण्याचा गुन्हा दाखल
Sushma Andhare On Neelam Gorhe: नीलम गोऱ्हेंच्या विरोधात ठाकरे गटाचा आक्रमक पवित्रा; सुषमा अंधारेंकडून थेट अब्रुनुकसानीची कायदेशीर नोटीस
नीलम गोऱ्हेंच्या विरोधात ठाकरे गटाचा आक्रमक पवित्रा; सुषमा अंधारेंकडून थेट अब्रुनुकसानीची कायदेशीर नोटीस
Embed widget