Gurudwara of Nanded : 94 किलो दागिने वितळवून झाले 48 किलो, गुरुद्वारात आलेल्या दानरुपी दागिन्यांमध्ये गैरव्यवहार, न्यायालयाचे महत्त्वाचे आदेश
Gurudwara of Nanded : नांदेडच्या गुरुद्वारात दानरुपी आलेल्या दागिन्यात भ्रष्टाचार झाल्याची याचिका उच्च न्यायालयात दाखल करण्यात आलीये.
Gurudwara of Nanded : नांदेडच्या गुरुद्वारात दानरुपी आलेल्या दागिन्यात भ्रष्टाचार झाल्याची याचिका उच्च न्यायालयात दाखल करण्यात आली आहे. याबाबत महसूल विभागाच्या सचिव आणि नांदेड जिल्हाधिकारी यांना 18 डिसेंबर पर्यत आपले म्हणणे सादर करण्याची अंतिम मुदत न्यायालयाने दिलीये. नांदेड येथील सचखंड गुरुद्वारात 1970 पासून ते 2020 पर्यंत दानरुपी जमा झालेले सोने चांदीचे दागिने वितळवून त्याचे बिस्कीट तयार करण्यात आले होते. मात्र ही प्रक्रिया पार पाडताना कोणतीही पारदर्शकता बाळगण्यात आली नव्हती.
1970 पासून ते 2020 पर्यत दानरुपी एकूण 94 किलो सोने प्राप्त झाले होते
2020 मध्ये नांदेडच्या सचखंड गुरुद्वारात प्रशासक म्हणून माजी पोलीस महासंचालक पी एस पसरीचा यांची नियुक्ती होती. परंतु प्रशासकाला अंधारात ठेऊन सचिवानी ही प्रक्रिया पार पाडली. ही प्रक्रिया पार पाडताना प्रशासनाचा अधिकारी असणे गरजेचे असताना कोणताही अधिकारी या प्रक्रियेत नव्हता. सचिवानी अधिकार नसताना कमिटी गठीत करून हा निर्णय घेतला असा आक्षेप प्रशासक पी एस पसरीचा यांनी घेतला होता. माहितीच्या अधिकारात 1970 पासून ते 2020 पर्यत दानरुपी एकूण 94 किलो सोने प्राप्त झाले होते. परंतु या सोन्यात 48 किलोचे बिस्कीट तयार करण्यात आले. त्यामुळे दागिन्यापासून बिस्कीट बनवताना एवढा फरक कसा आला असा संशय निर्माण झाला.
झालेल्या गैरव्यावहाराची CBI किंवा ED चौकशी करण्याची मागणी
शिवाय दानरुपी आलेले 50 ते 55 कलगीमध्ये असलेल्या हिरे आणि मोत्याबाबत कुठलीही माहिती देण्यात आली नाही. सोन्यामध्ये घडलेल्या गैर प्रकारबाबत शासनाने चौकशी करावी असे पत्र तत्कालीन प्रशासक पीएस पसरीचा यांनी ऑगस्ट 2022 मध्ये शासनाकडे दिले होते. मात्र याबाबत कुठलीही चौकशी झाली नसल्याने गुरुद्वारा बोर्डाचे माजी सदस्य सरदार रवींद्रसिंग पुजारी आणि रणजित सिंग गिल यांनी नोव्हेंबर 2024 मध्ये औरंगाबाद उच्च न्यायालयात याचिका दाखल केली. महसूल सचिव आणि जिल्हाधिकाऱ्यानी चौकशी बाबत 3 डिसेंबर रोजी चौकशी अहवाल दाखल करण्याचे आदेश उच्च न्यायालयाने दिले होते. परंतु कुठलेही उत्तर दाखल गेले गेले नाही. आता येत्या 18 डिसेंबर पर्यंत चौकशी बाबत उत्तर दाखल करण्याची अंतिम मुद्दत उच्च ना्यालयाने दिली आहे. गुरुद्वारात दानरुपी आलेल्या सोने ,चांदी,हिरे ,मोती बाबत झालेल्या गैरव्यावहाराची CBI किंवा ED चौकशी करण्याची मागणी याचिका कर्त्यानी केली आहे.
इतर महत्त्वाच्या बातम्या