एक्स्प्लोर

निवडणूक निकाल २०२४

(Source: ECI/ABP News/ABP Majha)

काँग्रेसच्या 139 व्या स्थापना दिनानिमित्त आज नागपुरात "हैं तैयार हम" महारॅली, लोकसभा निवडणुकीचं बिगुल फुंकणार

103 वर्षानंतर काँग्रेसच्या स्थापना दिनाची सभा नागपुरात होत असल्यामुळे विदर्भातील काँग्रेस नेते आणि कार्यकर्त्यांसाठी हा अभिमानाचा क्षण असल्याचे मतही वडेट्टीवार यांनी व्यक्त केला.

नागपूर : लोकसभा निवडणुकीचा (Loksabha Election)  बिगुल फुंकण्यासाठी दीक्षाभूमी व संघभूमी असलेल्या उपराजधानीत गांधी कुटुंबीय प्रथमच एका व्यासपीठावर येणार आहे.  काँग्रेस (Congress) स्थापना दिनानिमित्त 'है तयार हम' सभेचं आयोजन करण्यात आले आहे.  सोनिया गांधी(Soniya Gandhi) , राहुल गांधी (Rahul Gandhi) , प्रियांका गांधी (Priyanka Gandhi)  उपस्थित राहाणार आहेत. काँग्रेसच्या स्थापना दिनाच्या निमित्ताने 28 डिसेंबर ला नागपुरात काँग्रेसची 'है तयार हम' अशी महारॅली (सभा) होणार आहे. त्यासाठी उमरेड रोडवरील बहादुरा परिसरात 40 एकर क्षेत्रावर विशेष मैदान तयार करण्यात आला  आहे.

सोनिया गांधी, राहुल गांधी, प्रियंका गांधी आणि मल्लिकार्जुन खरगे या राष्ट्रीय नेत्यांच्या उपस्थितीत होणाऱ्या या महारॅलीच्या माध्यमातून काँग्रेसच्या लोकसभा निवडणुकीच्या तयारीला दिशा मिळेल असा मत विरोधी पक्ष नेते विजय वडेट्टीवार यांनी व्यक्त केला आहे. विदर्भाच्या भूमीने नेहमीच काँग्रेसला साथ दिली आहे, त्यामुळे पुन्हा एकदा डॉ बाबासाहेब आंबेडकर यांची दीक्षाभूमी आणि प्रभू श्रीरामाचा रामटेक या पावनभूमीतून आशीर्वाद घेऊन काँग्रेस नेतृत्व देशातून भाजप सरकारला उलथवून लावेल असा विश्वास वडेट्टीवार यांनी व्यक्त केला आहे. 1920 मध्ये काँग्रेसचे खास अधिवेशन नागपुरात पार पडले होते.. त्याच्या 103 वर्षानंतर काँग्रेसच्या स्थापना दिनाची सभा नागपुरात होत असल्यामुळे विदर्भातील काँग्रेस नेते आणि कार्यकर्त्यांसाठी हा अभिमानाचा क्षण असल्याचे मतही वडेट्टीवार यांनी व्यक्त केला.

 दरम्यान, लोकसभा निवडणुकीचा रणशिंग फुंकण्यासाठी काँग्रेसने महाराष्ट्राची आणि त्यातल्या त्यात नागपूरची निवड का केली? काँग्रेसची स्थापना झालेली मुंबई किंवा देशाची राजधानी असलेले दिल्ली या ऐवजी ही सभा नागपुरात का? असा प्रश्न उपस्थित होणे स्वाभाविक आहे. 

दिल्ली ऐवजी ही सभा नागपुरात का?

  • काँग्रेसचा महाराष्ट्र आणि नागपूरशी ऐतिहासिक नातं आहे..
  • 1891 साली काँग्रेसचे अधिवेशन नागपुरात पार पडले
  • 1920 साली काँग्रेसचा विशेष अधिवेशन नागपुरात पार पडलं होतं. त्या अधिवेशनामध्येच महात्मा गांधी यांना सर्वसामान्य नेता अशी ओळख मिळाली होती. याशिवाय स्वराज्य तसेच असहकार आंदोलन या प्रस्तावांवरही नागपूर चर्चा होऊन महत्त्वाचे निर्णय झाले होते.
  •  1920 च्या त्याच अधिवेशनात काँग्रेसच्या घटनेत आवश्यक बदल करून काँग्रेसची आजची संघटनात्मक बांधणी निश्चित करण्यात आली होती. 
  • स्वातंत्र्योत्तर काळात काँग्रेसचा पहिला अधिवेशन 1959 मध्ये नागपूरतच पार पडला होता.या अधिवेशनात इंदिरा गांधी यांची काँग्रेस च्या अध्यक्षा म्हणून निवड झाली होती.
  •  निवडणुकीच्या काळात ऊर्जा घेऊन जोरात मैदानात उतरण्यासाठीही काँग्रेसचा नागपूर आणि महाराष्ट्राची वेगळं नातं आहे. इंदिरा गांधी नेहमीच त्यांच्या लोकसभा प्रचाराचा बिगुल नंदुरबार मधून फुंकायच्या..
  •  तर अडचणीच्या प्रसंगी (आणीबाणी नंतर) वैदर्भीय मतदाराने काँग्रेसला हाथ दिल्याचं अनेक वेळेला दिसून आल्यामुळे काँग्रेस नेत्यांचा विदर्भावर खास प्रेम आहे.

 दरम्यान, नागपूरची सभा नुसती भाषणापुरती मर्यादित नाही.. तर, लोकसभा निवडणुकीच्या दृष्टीने कार्यकर्त्यांना आणि मतदारांना वैचारिक दिशा देण्यासाठी काँग्रेसच्या या सभेमध्ये काही विशेष ठराव पारित होणार असल्याची माहिती आहे. बेरोजगारी, देशाची आर्थिक स्थिती तसेच देशातील घटनात्मक संस्था आणि व्यवस्थेवर मोदी सरकारकडून लादला जाणारा नियंत्रण या संदर्भात हे ठराव असू शकतात.

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Maharashtra Assembly Election Results 2024 : महायुतीच्या बटेंगे तो कटेंगे अन् एक है तो सेफ है च्या नाऱ्यातही किती मुस्लीम उमेदवारांना विजयी गुलाल?
महायुतीच्या बटेंगे तो कटेंगे अन् एक है तो सेफ है च्या नाऱ्यातही किती मुस्लीम उमेदवारांना विजयी गुलाल?
IPL Auction 2025 : युजवेंद्र चहलला लॉटरी, टीम इंडियात संधी मिळेना पण आयपीएलमध्ये पैशांचा वर्षाव, पंजाबकडून 18 कोटी खर्च
युजवेंद्र चहलला लॉटरी, टीम इंडियात संधी मिळेना पण आयपीएलमध्ये पैशांचा वर्षाव, पंजाबकडून 18 कोटी खर्च
ठाकरेंचा एकमेव मुस्लीम उमेदवार बनला आमदार; हारुण खान यांना खेचून आणला विजय, मताधिक्य किती?
ठाकरेंचा एकमेव मुस्लीम उमेदवार बनला आमदार; हारुण खान यांना खेचून आणला विजय, मताधिक्य किती?
Maharashtra Assembly Election Result 2024 : फक्त 162 मतांनी महायुतीच्या त्सुनामीत विजय खेचून आणलेला 'नशीबवान' उमेदवार माहीत आहेत का?
फक्त 162 मतांनी महायुतीच्या त्सुनामीत विजय खेचून आणलेला 'नशीबवान' उमेदवार माहीत आहेत का?
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Bharat Gogawale Exclusive : मंत्रि‍पदासाठी शिवलेला कोट आता तरी घालणार? भरत गोगावले म्हणतातBharat Gogawale on Uddhav Thackeray :उद्धव ठाकरेंचे आमदार संपर्कात पण लगेच काही करणं बरोबर दिसत नाहीMahayuti CM Oath Ceremony : शपथविधी कधी पर्यंत झाला पाहिजे? कायदेशीर बाजू नेमकी काय?Sunil Shelke Meet Ajit Pawar : अजितदादांनी सांगितला मोदी-शेळकेंच्या भेटीचा किस्सा #abpमाझा

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Maharashtra Assembly Election Results 2024 : महायुतीच्या बटेंगे तो कटेंगे अन् एक है तो सेफ है च्या नाऱ्यातही किती मुस्लीम उमेदवारांना विजयी गुलाल?
महायुतीच्या बटेंगे तो कटेंगे अन् एक है तो सेफ है च्या नाऱ्यातही किती मुस्लीम उमेदवारांना विजयी गुलाल?
IPL Auction 2025 : युजवेंद्र चहलला लॉटरी, टीम इंडियात संधी मिळेना पण आयपीएलमध्ये पैशांचा वर्षाव, पंजाबकडून 18 कोटी खर्च
युजवेंद्र चहलला लॉटरी, टीम इंडियात संधी मिळेना पण आयपीएलमध्ये पैशांचा वर्षाव, पंजाबकडून 18 कोटी खर्च
ठाकरेंचा एकमेव मुस्लीम उमेदवार बनला आमदार; हारुण खान यांना खेचून आणला विजय, मताधिक्य किती?
ठाकरेंचा एकमेव मुस्लीम उमेदवार बनला आमदार; हारुण खान यांना खेचून आणला विजय, मताधिक्य किती?
Maharashtra Assembly Election Result 2024 : फक्त 162 मतांनी महायुतीच्या त्सुनामीत विजय खेचून आणलेला 'नशीबवान' उमेदवार माहीत आहेत का?
फक्त 162 मतांनी महायुतीच्या त्सुनामीत विजय खेचून आणलेला 'नशीबवान' उमेदवार माहीत आहेत का?
Dhule Rural Vidhan Sabha Election Result 2024 : अवघ्या 32 वर्षीय राम भदाणेंनी काँग्रेसच्या बालेकिल्ल्याला लावला सुरुंग, 66 हजारांच्या मताधिक्याने दणदणीत विजय
अवघ्या 32 वर्षीय राम भदाणेंनी काँग्रेसच्या बालेकिल्ल्याला लावला सुरुंग, 66 हजारांच्या मताधिक्याने दणदणीत विजय
अजित पवार आणि छगन भुजबळ हे फक्त आणि फक्त पैशांच्या बळावर निवडून आले, अंजली दमानियांचा आरोप
अजित पवार आणि छगन भुजबळ हे फक्त आणि फक्त पैशांच्या बळावर निवडून आले, अंजली दमानियांचा आरोप
Manoj Jarange on Devendra Fadnavis : तू पुन्हा आला की, मी पुन्हा बसणार! मनोज जरांगे पाटलांचा देवेंद्र फडणवीसांना थेट इशारा
तू पुन्हा आला की, मी पुन्हा बसणार! मनोज जरांगे पाटलांचा देवेंद्र फडणवीसांना थेट इशारा
Dhananjay Munde : यार तुम्ही विरोधकांना काहीच ठेवलं नाही, ग्रेट...,  धनंजय मुंडे यांचं देवेंद्र फडणवीस यांच्याकडून कौतुक, परळीच्या विजयावर म्हणाले...
यार तुम्ही विरोधकांना काहीच ठेवलं नाही, ग्रेट..., धनंजय मुंडे यांचं देवेंद्र फडणवीस यांच्याकडून कौतुक
Embed widget