एक्स्प्लोर
Advertisement
(Source: ECI/ABP News/ABP Majha)
महिला सुरक्षेसाठी RPF चा व्हॉट्सअॅप ग्रुप, सूचना-तक्रारींऐवजी महिलांचं 'गुड मॉर्निंग'-'गुड नाईट'
मुंबईतील लोकलने दररोज लाखो महिला प्रवास करतात. गर्दीची वेळ असो वा शुकशुकाटाची चोरी, चेन स्नॅचिंग, छेडछाड यासारख्या गुन्ह्यांनी महिला त्रस्त होत्या. त्यामुळे 2016 साली RPF Sakhi नावाच्या व्हॉट्सअॅप ग्रुपची निर्मिती करण्यात आली.
मुंबई : मुंबईतील पश्चिम रेल्वेवरील आरपीएफने महिलांच्या सुरक्षेसाठी RPF Sakhi हा 'व्हॉट्सअॅप' ग्रुप तयार केला. या ग्रुपवर महिला ट्रेन प्रवासातील कोणतीही तक्रार नोंदवू शकतात. महिला सुरक्षेसाठी सुरु झालेल्या या ग्रुपवर तक्रारी किंवा सूचनांऐवजी 'गुड मॉर्निंग' आणि 'गुड नाईट'च्या मेसेजेसनी उच्छाद मांडला होता.
मुंबईतील लोकलने दररोज लाखो महिला प्रवास करतात. गर्दीची वेळ असो वा शुकशुकाटाची चोरी, चेन स्नॅचिंग, छेडछाड यासारख्या गुन्ह्यांनी महिला त्रस्त होत्या. त्यामुळे 2016 साली RPF Sakhi नावाच्या व्हॉट्सअॅप ग्रुपची निर्मिती करण्यात आली.
प्रत्येक कोचमध्ये जाऊन महिला पोलिसांनी याविषयी जागरुकता केली. आठ वेगवेगळ्या ग्रुप्समध्ये 1400 महिला सहभागी झाल्या. मात्र अडचणींविषयी सांगण्याऐवजी 50 टक्के महिला 'गुड मॉर्निंग', 'गुड नाईट' किंवा फॉरवर्ड मेसेजेस पाठवले जाऊ लागल्या.
'फॉरवर्ड'बाज महिलांमुळे ग्रुपमधील इतर महिला सदस्य आणि पोलिस अधिकारी त्रस्त झाल्या. वैतागलेल्या चारशे जणींनी नाईलाजाने ते ग्रुप लेफ्टही केले. त्यामुळे महिला पोलिस अधिकाऱ्यांनी 'असे' मेसेज पाठवणाऱ्या महिलांना तंबी दिली. पुन्हा एकदा प्रवासी महिलांमध्ये ग्रुप आणि सुरक्षेविषयी प्रचार सुरु करण्यात आला आहे.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
निवडणूक
क्राईम
निवडणूक
निवडणूक
Advertisement