एक्स्प्लोर

Mumbai Rain Updates: मुंबईतील सर्व शाळा-महाविद्यालयांना आज सुट्टी; सर्व यंत्रणा सज्ज, महानगरपालिका आयुक्तांची माहिती

Mumbai Rain Updates: आवश्यकता असेल, तरच घराबाहेर पडा, अशी सूचनाही प्रशासनाने नागरिकांना केली आहे.

Mumbai Rain Updates मुंबई: हवामान खात्याने मुंबई महानगराला पावसाचा (Heavy Rain In Mumbai) रेड अलर्ट (Red Alert In Mumbai) जारी केल्यामुळे विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेसाठी मुंबईतील सर्व शाळा, महाविद्यालयांना आज (मंगळवार दिनांक 9 जुलै २०२४) रोजी सुट्टी जाहीर करण्यात आली आहे. मुंबई महापालिकेने याबाबत घोषणा केली. आवश्यकता असेल, तरच घराबाहेर पडा, अशी सूचनाही प्रशासनाने नागरिकांना केली आहे.

भारतीय हवामान खाते (मुंबई) यांच्या वतीने, मुंबई महानगराला अति मुसळधार पावसाचा (रेड अलर्ट) इशारा देण्यात आला आहे.  या पार्श्वभूमीवर, विद्यार्थ्यांची सुरक्षितता लक्षात घेता, महानगरपालिका आयुक्त तथा प्रशासक भूषण गगराणी यांनी मुंबई महानगरातील सर्व व्यवस्थापनांच्या प्राथमिक, माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळा तसेच महाविद्यालयांना आज (मंगळवार दिनांक 9 जुलै 2024) रोजी सुट्टी जाहीर केली आहे.

आवश्यकता असेल तरच नागरिकांनी घराबाहेर पडण्याचं आवाहन-

अति मुसळधार पावसाचा इशारा (Red Alert) लक्षात घेता, नागरिकांना विनंती करण्यात येते की, कृपया सर्वांनी सतर्क रहावे. आवश्यकता असेल तरच नागरिकांनी घराबाहेर पडावे. तसेच प्रशासनाच्या माध्यमातून वेळोवेळी देण्यात येणार्‍या सुचनांचे पालन करावे. आपत्कालीन परिस्थितीत नागरिकांनी घाबरून न जाता महानगरपालिकेच्या आपत्ती व्यवस्थापन कक्षाचा मदत सेवा क्रमांक 1916 यावर संपर्क साधावा. भारतीय हवामान खात्याने मुंबईत अति मुसळधार पावसाचा इशारा दिला आहे. ही बाब लक्षात घेता, मुंबईकर नागरिकांची गैरसोय होणार नाही, यादृष्टीने महानगरपालिकेची यंत्रणा सज्ज असल्याची माहिती महानगरपालिकेने दिली. 

ठाणे जिल्ह्यातील शाळांना सुट्टी जाहीर

हवामान विभागाकडून वर्तविण्यात आलेल्या शक्यतेच्या पार्श्वभूमीवर अतिवृष्टीच्या अनुषंगाने इ. 1 ली ते 12 वी च्या सर्व माध्यमाच्या/मंडळाच्या शालेय विद्यार्थ्यांची शाळेत ये-जा करण्याची गैरसोय होऊ शकते. याचा विचार करता शालेय विद्यार्थ्यांच्या सुरक्षितेतेच्या दृष्टीकोनातून ठाणे जिल्ह्यातील सर्व शाळांना दि. 09/07/2024 रोजी सुट्टी जाहीर करण्यात येत आहे.

रत्नागिरी जिल्ह्यातील शाळाही राहणार बंद 

रत्नागिरी जिल्ह्यातील सर्व शाळा व महाविद्यालये (अंगणवाडी, पूर्व प्राथमिक व प्राथमिक, माध्यमिक, महाविद्यालय) विद्यार्थ्यांना उद्या मंगळवार  दि. 9 जुलै रोजी सुट्टी जाहीर करण्यात आल्याचा आदेश जिल्हाधिकारी एम देवेंदर सिंह यांनी दिला.

नवी मुंबईतील शाळांनाही सुट्टी-

अतिवृष्टीची शक्यता लक्षात घेवून नवी मुंबई शहरातील सर्व शाळा सुट्टी देण्यात आली आल्याचे आयुक्त कैलाश शिंदे यांनी जाहीर केले आहे. सर्व माध्यमांच्या शाळा आज बंद राहणार आहेत.

संबंधित बातम्या:

Pune Rain Update : पुण्यातील सर्व शाळांना सुट्ट्या, सातारा जिल्ह्याला रेड अलर्ट, दोन्ही जिल्ह्यांत अतिमुसळधार पावसाची शक्यता

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Raj Thackeray : बाळा नांदगावकरांनी कमंडलू भरुन कुंभमेळ्यातील पवित्र पाणी आणलं, राज ठाकरे म्हणाले, हड मी नाही...
बाळा नांदगावकरांनी कमंडलू भरुन कुंभमेळ्यातील पवित्र पाणी आणलं, राज ठाकरे म्हणाले, हड मी नाही...
रस्त्यांची तुलना हेमा मालिनींच्या गालांसोबत करणाऱ्यांना महिला सुरक्षिततेचा मुद्दा काय कळणार? रोहिणी खडसेंनी गुलाबराव पाटलांना सुनावलं
रस्त्यांची तुलना हेमा मालिनींच्या गालांसोबत करणाऱ्यांना महिला सुरक्षिततेचा मुद्दा काय कळणार? रोहिणी खडसेंनी गुलाबराव पाटलांना सुनावलं
Satish Bhosale : सतीश भोसले उर्फ खोक्या भाई भाजपचा कार्यकर्ता नाही? 2021 सालीच पक्षातून केलेली हकालपट्टी, प्रतिमा मलीन झाल्यानंतर भाजपचं स्पष्टीकरण
सतीश भोसले उर्फ खोक्या भाई भाजपचा कार्यकर्ता नाही? 2021 सालीच पक्षातून केलेली हकालपट्टी, प्रतिमा मलीन झाल्यानंतर भाजपचं स्पष्टीकरण
Khokya Satish Bhosle:
"माफीच्या लायकीचा नाही..."; हरिण, काळवीट मारणाऱ्या खोक्या उर्फ सतीश भोसलेला बिष्णोई गँगकडून धमकी
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

ABP Majha Marathi News Headlines 06 PM TOP Headlines 06PM 09 March 2025Dhananjay Deshmukh And Vaibhavi Deshmukh | सरकारचे डोळे कधी उघडणार? वैभवीचा संतप्त सवाल, तर सर्व पुरावे मुख्यमंत्र्यांना देणार, धनंजय देशमुखांची माहितीRaj Thackeray VS BJP Minister | राज ठाकरेंचं कुंभमेळ्याबाबत वक्तव्य, भाजप नेत्यांचा राज ठाकरेंवर हल्लाबोलTop 50 | टॉप 50 बातम्यांचा सुपरफास्ट आढावा एका क्लिकवर ABP Majha | 08 March 2025 | 5 Pm

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Raj Thackeray : बाळा नांदगावकरांनी कमंडलू भरुन कुंभमेळ्यातील पवित्र पाणी आणलं, राज ठाकरे म्हणाले, हड मी नाही...
बाळा नांदगावकरांनी कमंडलू भरुन कुंभमेळ्यातील पवित्र पाणी आणलं, राज ठाकरे म्हणाले, हड मी नाही...
रस्त्यांची तुलना हेमा मालिनींच्या गालांसोबत करणाऱ्यांना महिला सुरक्षिततेचा मुद्दा काय कळणार? रोहिणी खडसेंनी गुलाबराव पाटलांना सुनावलं
रस्त्यांची तुलना हेमा मालिनींच्या गालांसोबत करणाऱ्यांना महिला सुरक्षिततेचा मुद्दा काय कळणार? रोहिणी खडसेंनी गुलाबराव पाटलांना सुनावलं
Satish Bhosale : सतीश भोसले उर्फ खोक्या भाई भाजपचा कार्यकर्ता नाही? 2021 सालीच पक्षातून केलेली हकालपट्टी, प्रतिमा मलीन झाल्यानंतर भाजपचं स्पष्टीकरण
सतीश भोसले उर्फ खोक्या भाई भाजपचा कार्यकर्ता नाही? 2021 सालीच पक्षातून केलेली हकालपट्टी, प्रतिमा मलीन झाल्यानंतर भाजपचं स्पष्टीकरण
Khokya Satish Bhosle:
"माफीच्या लायकीचा नाही..."; हरिण, काळवीट मारणाऱ्या खोक्या उर्फ सतीश भोसलेला बिष्णोई गँगकडून धमकी
तब्बल 9 वर्षांनी पतंजली फूड अँड हर्बल पार्क लोकार्पण, मी मुख्यमंत्री होण्याची वाट हे पार्क पाहत होतं, देवेंद्र फडणवीसांची मिश्किल प्रतिक्रिया 
मुख्यमंत्री होण्याची वाट पतंजली फूड अँड हर्बल पार्क पाहत होतं; देवेंद्र फडणवीसांची मिश्किल प्रतिक्रिया 
BJP on Raj Thackeray : घरात बसून कुंभमेळ्याचं पाणी अस्वच्छ म्हणणं चुकीचं; राज ठाकरेंवर भाजपचा पहिला पलटवार
घरात बसून कुंभमेळ्याचं पाणी अस्वच्छ म्हणणं चुकीचं; राज ठाकरेंवर भाजपचा पहिला पलटवार
रक्ताच्या प्रत्येक थेंबाची किंमत मोजली जाईल, संतोष देशमुखांना क्रूरपणे संपवलं, बारामतीत आक्राेश मोर्चात कुटुंबीय आक्रमक, Photos
रक्ताच्या प्रत्येक थेंबाची किंमत मोजली जाईल, संतोष देशमुखांना क्रूरपणे संपवलं, बारामतीत आक्राेश मोर्चात कुटुंबीय आक्रमक, Photos
IND vs NZ Champions Trophy 2025 Final: चॅम्पियन्स ट्रॉफीच्या अंतिम सामन्यात 'यांच्या' खांद्यांवर महत्त्वाची जबाबदारी; आणीबाणीच्या परिस्थिती निभावणार मोलाची भूमिका
चॅम्पियन्स ट्रॉफीच्या अंतिम सामन्यात 'यांच्या' खांद्यांवर महत्त्वाची जबाबदारी; आणीबाणीच्या परिस्थिती निभावणार मोलाची भूमिका
Embed widget