एक्स्प्लोर
उन्हात बाहेर पडताय? सावधान! IMD चा उद्यापासून तीव्र उष्णतेच्या लाटेचा इशारा, कुठे अलर्ट दिलेत, पहा
हवामान विभागाच्या अंदाजानुसार, 7-11 मार्चपर्यंत कोकणपट्ट्यासह मुंबई, ठाणे, रायगड, रत्नागिरी, सिंधुदूर्ग, धूळे, व नाशिक जिल्ह्यात प्रचंड उष्णता वाढणार
heat Wave
1/7

राज्यात होळीआधीच दुसरी उष्णतेची लाट आली आहे . फेब्रुवारीच्या शेवटच्या आठवड्यात मुंबई व कोकणपट्ट्यात उष्णतेच्या लाटेचा इशारा देण्यात आला होता .
2/7

राज्यात सध्या प्रचंड उष्ण तापमानाने नागरिक हैराण झाले आहेत . 9 ते 11 मार्चपर्यंत कोकणपट्ट्यासह मुंबई,ठाणे पालघर जिल्ह्यांना उष्णतेच्या लाटेचा यलो अलर्ट देण्यात आला आहे .
3/7

दरम्यान राज्यभरात सर्वाधिक तापमानाची नोंद होत असून मध्य महाराष्ट्र विदर्भ व मराठवाडा तापला आहे .
4/7

बहुतांश ठिकाणी 36 ते 40°c ची नोंद होत आहे .मुंबई उपनगर ,सिंधुदुर्ग रत्नागिरी रायगड ठाणे जिल्ह्यांना उष्ण आणि दमट हवामानाचा इशारा आहे.
5/7

ढील काही दिवस इशान्येकडील वारे सक्रीय झाल्याने उत्तरेकडून येणाऱ्या शहरात पूर्वेकडील वारे वाहण्यास सुरुवात होणार आहे. त्यामुळे तापमानात पुन्हा वाढ होत असल्याचं हवामानतज्ञांचे म्हणणे आहे.
6/7

राज्यात पुढील 24 तासात कमाल तापमानात दोन ते चार अंश सेल्सिअसने वाढ होण्याची शक्यता आहे. पुण्यात आज किमान तापमानातही वाढ झाल्याचे हवामान तज्ञांनी सांगितले .
7/7

कोकणात उष्णतेच्या लाटेपासून दूर राहण्यासाठी दुपारच्या वेळी उन्हात न जाणे ,बाहेर जाताना डोके झाकणे ,भरपूर पाणी पिणे ,सुती सैल कपडे वापरणे अशा काही आवश्यक तत्त्वांचे पालन करण्याचं आवाहन IMD ने केले आहे.
Published at : 08 Mar 2025 12:59 PM (IST)
आणखी पाहा























