एक्स्प्लोर
Advertisement
नगरमधील शेतकऱ्यांची एपीएमसीतील व्यापाऱ्यांकडून लाखोंची फसवणूक
नगरमधील शेतकऱ्यांची एपीएमसी मधील व्यापाऱ्यांकडून लाखोंची फसवणूक झाल्याचा प्रकार समोर आला आहे. अनेक महिन्यांपासून तक्रार करूनही एपीएमसी प्रशासनाचे दुर्लक्ष केले आहे. त्यामुळे नगरमधील शेतकरी आंदोलनाच्या तयारीत आहे.
नवी मुंबई : एकीकडे आवकाळी पावसाने शेतकऱ्यांचे कंबरडे मोडले असतानाच दुसरीकडे एपीएमसीत जीवापाड जपून वाढवलेल्या शेतमालाची किंमत न देता व्यापारी वर्गाकडून लाखो रूपयांना गंडा घालण्याचा प्रकार समोर आला आहे. नवी मुंबई एपीएमसी मार्केटमधील भाजीपाला व्यापाऱ्यांनी अहमदनगर मधील शेतकऱ्यांची लाखोंची फसवणूक केल्याचा आरोप शेतकऱ्यांकडून करण्यात आला आहे.
मार्च, एप्रिल, मे या तीन महिन्यात अहमदनगर जिल्ह्यातील अकोला तालुक्यात राहणाऱ्या 25 शेतकऱ्यांनी आपला भाजीपाला विकण्यासाठी नवी मुंबईच्या एपीएमसी मार्केट मध्ये पाठवला होता. आपल्या शेतात तळहातावर पिकविलेला कोबी विकण्यासाठी या शेतकऱ्यांनी व्यापारी वर्गाच्या हवाली डोळे झाकून दिला होता. मालाला चार पैसे आल्यानंतर घेतलेले कर्ज आणि पोरांबाळांची शिक्षणाचा खर्च भागवता येईल अशी भाबडी आशा या बळीराजाने मनाशी केली होती.
मालाचे लाखो रूपये देण्याऐवजी भाजीपाला मार्केटमधील व्यापारी मोहम्मद हमीद आणि अभिजीत कांडेकर यांनी त्यांना चालढकल केली. शेतकऱ्यांचे एकूण 13 लाख 50 हजार रूपयांची देणी देण्यास टाळाटाळ करून दिलेला 12 लाख रूपयांचा चेकही वटला नव्हता. यानंतर 6 लाख रूपये रोख देत 7.5 लाख रूपयांची देणी थकीत ठेवली होती. अखेर सात महिने उलटल्यानंतर आपल्या मालाचे पैसे मिळत नसल्याने शेतकऱ्यांनी एपीएमसी प्रशासनाचे कार्यालय गाठले. माञ त्या ठिकाणीही त्यांना योग्य तो न्याय मिळत नसल्याने अखेर मुख्यमंत्री कार्यालयाकडे व्यापाऱ्यांच्या विरोधात शेतकऱ्यांनी तक्रार केली आहे.
एपीएमसी प्रशासनाकडे तक्रार गेल्यानंतर 7.5 लाख रुपयांचा धनादेश व्यापाऱ्यांना देण्यास सांगण्यात आले असून तो न वटल्यास पुढील कायदेशीर कारवाई करणार असल्याचे एपीएमसी प्रशासनाने स्पष्ट केले आहे. तर आपल्या कुटूंबातील प्रमुखांचे निधन झाल्याने पैसे देण्यास उशीर झाल्याचे व्यापाऱ्यांकडून सांगण्यात आले आहे.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
निवडणूक
कोल्हापूर
निवडणूक
निवडणूक
Advertisement