मुसळधार पावसामुळे मुंबईची लाईफलाईन ठप्प! मध्य रेल्वेची वाहतूक कोलमडली, ट्रान्स-हार्बरचा वेगही मंदावला, अनेक एक्स्प्रेस गाड्याही रद्द
Mumbai Rain Marathi News: मुसळधार पावसाचा परिणाम मध्य रेल्वे आणि हार्बर रेल्वेवर झालेला दिसून येत आहे.

Mumbai Rain Local Train Updates मुंबई: मुंबई आणि उपनगरात रात्रीपासून मुसळधार पाऊस (Heavy Rain In Mumbai) सुरु आहे. त्यामुळे मुंबईतील विविध भागात पाणी साचलं आहे. हिंदामाता परिसर, दादर, माटुंगा, भांडूप, अंधेरी, कुर्ला परिसरात मोठ्या प्रमाणात पाणी साचलं आहे. हार्बर मार्गावरील एलटीटी आणि चुनाभट्टी स्थानकात पाणी साचलं आहे.
पावसाचा रस्ते वाहतुक आणि लोकल सेवेवर (Mumbai Local Train) देखील मोठा परिणाम झाला आहे. कुर्ला, अंधेरी, सांताक्रुझमधील सखल भागात मोठ्या प्रमाणात पाणी साचलं आहे. कल्याणपासून मुंबईकडे जाणाऱ्या लोकलसेवेवर देखील परिणाम झाल्याचं पाहायला मिळतंय. त्यामुळे नोकरदारवर्गाने घराबाहेर पडण्याआधी या सर्व परिस्थितीचा आढावा घ्यावा, असं आवाहन करण्यात येत आहे. मुंबईत अनेक ठिकाणी पाणी साचल्याने वाहनचालकांना पाण्यातून वाट काढत प्रवास करावा लागतोय.
#WATCH | Maharashtra: Water accumulated at railway track, following heavy rainfall in Mumbai.
— ANI (@ANI) July 8, 2024
(Visuals from Dadar Area) pic.twitter.com/lXH4qeHh5p
ठाण्याकडून मुंबईकडे येणारी रेल्वे सेवा ठप्प (Local Train service from Thane to Mumbai stopped)
मुसळधार पावसाचा परिणाम मध्य रेल्वे आणि हार्बर रेल्वेवर झालेला दिसून येत आहे. ठाण्याहून वाशीकडे जाणाऱ्या लोकल गाड्या पूर्णपणे ठप्प झालेल्या आहेत. तसेच ठाण्याकडून मुंबईकडे येणारी रेल्वे वाहतुक देखील सध्या ठप्प झाली आहे. पश्विम रेल्वेवर सध्या काहीही परिणामा झालेला नाही. लांब पल्ल्याच्या एक्प्रेस गाड्यादेखील रद्द करण्यात आलं आहे. पुण्याहून मुंबईकडे येणारी सिंहगड एक्सप्रेस आणि डेक्कन क्वीन देखील रद्द करण्यात आली आहे.
ALERT--Due to Heavy Rain In Mumbai Suburban & Harbour Line Train Traffic Delay Due To Watter Logging.
— DRM Mumbai CR (@drmmumbaicr) July 7, 2024
Effected Station- CSMT- CHF-LTT.
राज्यात पावसाचा जोर वाढला-
शनिवारपासून राज्यात पावसाचा जोर वाढला असून, मुंबई, मुंबई उपनगर, ठाणे, कोकण, पुणे आणि पश्चिम महाराष्ट्रातील काही भागात जोरदार पाऊस झाला. रविवारी पहाटेपासूनच मुंबईत पावसाला सुरूवात झाली. शहरातील अनेक भागात पावसाची संततधार सुरू असून, पावसामुळे तांत्रिक बिघाड झाल्याने मुंबई लोकल रेल्वे सेवेवरही परिणाम झाला.
सिंधुदुर्ग, रत्नागिरीत आज शाळांना सुट्टी जाहीर
सिंधुदुर्ग जिल्ह्यात अतिवृष्टी झाली आहे. पुराच्या पाण्यात गाडी घालणाऱ्या लोकांवर गुन्हा दाखल करण्याचे आदेश मी दिलेले आहेत. पुराची परिस्थिती अशीच राहील्यास शाळांना सुट्टी देण्यात येईल अशी माहीती शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांनी दिली आहे. जिल्हाधिकाऱ्यांनी सिंधुदुर्ग आणी रत्नागिरी जिल्ह्यातील प्राथमिक व माध्यमिक शाळांना सुट्टी देण्याचे आदेश दिले आहेत.
संबंधित बातमी:
Mumbai Thane Rain Blog LIVE : पावसामुळे मुंबई-ठाण्यातील विविध भागात पाणी साचलं, रेल्वेसेवा विस्कळीत
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
