Maharashtra Mumbai Rain Update LIVE: रत्नागिरी, सिंधुदुर्गसह रायगड जिल्हातील शाळांनाही सुट्टी
Mumbai Thane Rain Blog LIVE : मुसळधार पावसामुळे मुंबई उपनगर आणि ठाण्यातील विविध भागात पाणी साचलंय, ज्यामुळे रेल्वेसेवा विस्कळीत झाली आहे.
LIVE

Background
Mumbai Local : पश्चिम रेल्वेच्या दादर स्थानकात पावसाचे पाणी, वाहतूक संथ गतीने सुरू
पश्चिम रेल्वेच्या दादर स्थानकात पावसाचे पाणी भरल्याने लोकल वाहतूक विस्कळित, अप आणि डाऊन दिशेची वाहतूक अतिशय संथ गतीने सुरू.
Mumbai Local Train Service Update : ठाणे रेल्वे स्थानकावर गर्दी, ठाण्यातून कर्जत-कसाराकडे जाणाऱ्या गाड्या रद्द
मुसळधार पावसाचा जोर ओसरल्यानंतर लोकल वाहतूक आता पूर्वपदावर येत आहे. ठाण्यातून कल्याणकडे जाणाऱ्या स्लो लोकल सुरळीत झाल्या आहेत, मात्र जलद लोकल 15 ते 20 मिनिट उशिराने धावत आहेत. ठाण्याहून सुटणाऱ्या कर्जत, कसारा ट्रेन रद्द करण्यात येत आहेत. त्यामुळे नोकरदारवर्गांना कामावरून घरी जाताना परतीच्या प्रवासत सायंकाळी देखील फटका बसल्याचं दिसतंय. ठाण्यातील फलाट क्रमांक 1 वर पाणी साचल्यामुळे सीएसटीला सुटणाऱ्या ट्रेन प्लॅटफॉर्म क्रमांक चारवर वळवण्यात येत आहेत.
गुहागर मध्ये पावसाचे थैमान, नागरी वसाहतीला पाण्याचा वेढा
गुहागरमध्ये सकाळपासून मुसळधार पाऊस सुरू असून अनेक भागात पाणी साचले आहे. पावसाचा जोर वाढल्याने गुहागरची मुख्य बाजारपेठ असलेली शृंगारतळी भागात नागरी वस्तीमध्ये पाणी शिरून जनजीवन विस्कळीत झाले आहे. तर गुहागर विजापूर मार्गावर देखील प्रचंड पाणी साचल्यामुळे वाहतूक विस्कळीत झाली आहे. पावसाचा जोर कायम राहिल्यास गुहागरमधील जनजीवनावर अधिक प्रभाव होण्याची शक्यता आहे.
पुण्यात पावसाला सुरुवात, पुढील 3 दिवसांसाठी ऑरेंज अलर्ट
पुण्यात तुरळक पावसाला सुरुवात झाली आहे. डेक्कन, जंगली महाराज रोड, घोले रोड परिसरात पावसाला सुरुवात झालीये. पुढील तीन दिवस पुणे शहराला ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे. घाटमाथ्यावर मुसळधार पावसाची शक्यता हवामान खात्याने व्यक्त केली आहे. शिवाय पर्यटकांनाही सतर्कतेचा इशारा देण्यात आलाय.

महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज