एक्स्प्लोर

विठूच्या पंढरीत निराधारांच्या सेवेसाठी तरुणाईचा पुढाकार

उद्योग धंद्यात काम करणारे आणि शेतीत राबणाऱ्या या तरुणांनी एकत्र येत अशा निराधारांसाठी नियमितपणे काहीतरी करायचे ठरवले आणि यातून ‘राजर्षी शाहू बहुउद्देशीय संस्थे’ची सुरुवात झाली. सोशल मीडियावर गुंग असणाऱ्या या तरुणाईला एक उद्देश मिळाला आणि मोबाईलवर अखंडपणे चालणारे हात आता निराधारांच्या सेवेसाठी राबू लागले आहेत.

पंढरपूर : विठूच्या पंढरीत निराधार आणि मनोरुग्ण वृद्धांची संख्या लक्षणीय प्रमाणात वाढलीय. हेच लक्षात घेता पंढरीतल्या तरुणांनी एकत्र येत, या निराधार वृद्धांना मानसिक-आर्थिक आधार देण्यासाठी पुढाकार घेतलाय. तरुणांच्या या उपक्रमाचं सर्वच स्तरातून कौतुक होतंय. अनेकजण आपल्या कुटुंबातील कुणी वृद्ध त्रासदायक वाटला किंवा मनोरुग्ण असला, तर त्यांना पंढरपुरात आणून सोडून  देतात, असे अनेकदा समोर आले आहे. असे निराधा भिक्षा मागून पंढरीत आपल्या आयुष्याची गाडी हाकत असतात. यात्रेनंतर तर अशा निराधारांच्या संख्येत लक्षणीय वाढ झालीय. विठ्ठल मंदिर, प्रदक्षिणा मार्ग, चंद्रभागेचं वाळवंट हे या निराधारांचे आश्रयस्थान बनते आणि उरलेला काळ ते याच ठिकाणी घालवत असतात. यातील बहुतांश मंडळी चांगल्या घरातील असूनही केवळ कुटुंबाच्या त्रासामुळे निराधार बनलेली असतात. देशात सगळ्यात जास्त भिकारी हे सोलापूर जिल्ह्यात असल्याची आकडेवारी काही वर्षांपूर्वी आलेल्या एका अहवालातून समोर आले होते. विठूच्या पंढरीत निराधारांच्या सेवेसाठी तरुणाईचा पुढाकार उद्योग धंद्यात काम करणारे आणि शेतीत राबणाऱ्या या तरुणांनी एकत्र येत अशा निराधारांसाठी नियमितपणे काहीतरी करायचे ठरवले आणि यातून ‘राजर्षी शाहू बहुउद्देशीय संस्थे’ची सुरुवात झाली. सोशल मीडियावर गुंग असणाऱ्या या तरुणाईला एक उद्देश मिळाला आणि मोबाईलवर अखंडपणे चालणारे हात आता निराधारांच्या सेवेसाठी राबू लागले आहेत. गेल्या आठ दिवसांपासून या तरुणांनी शहरातील अशा निराधारांची ठिकाणे शोधली आणि त्यांना संत तनपुरे मठात आणण्याचे काम सुरु केले. या निराधारांचे केस आणि नखे कापण्यात आली. त्यांना आंघोळ घालून नवीन कपडे देण्यात आले. यावेळी अनेक निराधारांना वैद्यकीय मदतीची गरज दिसून आल्यावर त्यांची तपासणी करुन त्यांच्यावर उपचार देखील करण्यात आले. यानंतर त्यांच्यासोबत या तरुणांनी भोजन करीत त्यांना एक दिवसाचा मायेचा कौटुंबिक अनुभव मिळवून दिला. विठूच्या पंढरीत निराधारांच्या सेवेसाठी तरुणाईचा पुढाकार विशेष म्हणजे, याच ठिकाणी एका बाजूला काँग्रेस पक्षाचा मेळावा मोठ्या गाजावाजात सुरु असताना ही तरुणाई मात्र दिवसभर कोणालाही न सांगता या निराधारांच्या सेवेत रमून गेली होती. आता महिन्यात एकदा तरी या निराधारांसोबत दिवस घालवण्याचा यांनी निश्चय केला असून त्यांच्या पुनर्वसनासाठी देखील काय करता येईल यासाठी सोशल मीडियाची मदत घेतली जाणार असल्याचे सचिन लोंढे या तरुणाने सांगितले. तर शेतीत निसर्ग साथ देत नसला तरी या तणावातून देखील अशा निराधारांच्या सेवेतून समाधान मिळत असल्याचे धनाजी गोरे यांनी सांगितले. जालना जिल्ह्यातील बंडू ढोलेसारख्या शेतकरी कुटुंबातील एकाला भाऊबंदकीने वडिलांच्या मृत्यूनंतर घरातून हाकलून देत त्याची सगळी संपत्ती जमीनजुमला लाटला. वडिलांची श्रद्धा याच पांडुरंगावर असल्याने बंडूने देखील 1972 साली देवावर हवाला ठेवून निराधार झाल्यावर पंढरपूर गाठले आणि तेव्हापासून तोही आता इथलाच बनला आहे. मिळेल तिथे भीक मागून दिवस सारताना त्याला या तरुणाईतच आपले मायबाप दिसले. निराधारांना आता या तरुणाईने मायेचा हात दिल्याने त्यांनाही आता आधार वाटू लागला आहे.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Eknath Shinde - Vinod Tawde : आधी कुजबूज, नंतर टाळी दिली! शिंदे-तावडेंमध्ये काय चर्चा?
Eknath Shinde - Vinod Tawde : आधी कुजबूज, नंतर टाळी दिली! शिंदे-तावडेंमध्ये काय चर्चा?
पेट्रोलचा टँकर पलटी झाला, फोंडा घाटाचा रस्ता सरसर वणव्यासारखा पेटत गेला अन्...
पेट्रोलचा टँकर पलटी झाला, फोंडा घाटाचा रस्ता सरसर वणव्यासारखा पेटत गेला अन्...
Devendra Fadnavis Chief Minister : देवेंद्र फडणवीसांची झंझावाती कारकीर्द, कमबॅकची कहाणी माझा वर
Devendra Fadnavis Chief Minister : देवेंद्र फडणवीसांची झंझावाती कारकीर्द, कमबॅकची कहाणी माझा वर
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 04 डिसेंबर 2024 | बुधवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 04 डिसेंबर 2024 | बुधवार
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Zero Hour : शपथविधीआधी देवेंद्र फडणवीसांसमोर सर्वात मोठी आव्हानं, एकनाथ शिंदेच्या नाराजीचा अर्थ काय?Special Report on Devendra Fadnavis : सर्वसमावेशक अनुमोदन, देवेंद्र फडणवीस भाजप विधिमंडळ पक्षनेतेपदीSudhir Mungantiwar on Oath Ceremony : उद्या फक्त 3 जण शपथ घेतील, सुधीर मुनगंटीवारांची मोठी माहितीEknath Shinde - Vinod Tawde : आधी कुजबूज, नंतर टाळी दिली! शिंदे-तावडेंमध्ये काय चर्चा?

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Eknath Shinde - Vinod Tawde : आधी कुजबूज, नंतर टाळी दिली! शिंदे-तावडेंमध्ये काय चर्चा?
Eknath Shinde - Vinod Tawde : आधी कुजबूज, नंतर टाळी दिली! शिंदे-तावडेंमध्ये काय चर्चा?
पेट्रोलचा टँकर पलटी झाला, फोंडा घाटाचा रस्ता सरसर वणव्यासारखा पेटत गेला अन्...
पेट्रोलचा टँकर पलटी झाला, फोंडा घाटाचा रस्ता सरसर वणव्यासारखा पेटत गेला अन्...
Devendra Fadnavis Chief Minister : देवेंद्र फडणवीसांची झंझावाती कारकीर्द, कमबॅकची कहाणी माझा वर
Devendra Fadnavis Chief Minister : देवेंद्र फडणवीसांची झंझावाती कारकीर्द, कमबॅकची कहाणी माझा वर
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 04 डिसेंबर 2024 | बुधवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 04 डिसेंबर 2024 | बुधवार
Maharashtra CM : शपथ विधिबाबत एकनाथ शिंदेंचा सस्पेन्स कायम; समजूत काढण्यासाठी शिवसेनेचे आमदार वर्षावर
शपथ विधिबाबत एकनाथ शिंदेंचा सस्पेन्स कायम; समजूत काढण्यासाठी शिवसेनेचे आमदार वर्षावर
Eknath Shinde : देवेंद्र फडणवीस यांची विनंती अन् उपमुख्यमंत्रिपदाबाबतचा प्रश्न, एकनाथ शिंदे पत्रकार परिषदेत काय म्हणाले?
देवेंद्रजींनी मुख्यमंत्री व्हावं असं पाठिंब्याचं पत्र सेनेनं दिलं, एकनाथ शिंदेंनी सांगितला अडीच वर्षांपूर्वीचा प्रसंग
Devendra Fadnavis : Eknath Shinde मंत्रिमंडळात राहणार नाही? फडणवीसांचं मोठं वक्तव्य
Devendra Fadnavis : Eknath Shinde मंत्रिमंडळात राहणार नाही? फडणवीसांचं मोठं वक्तव्य
Rahul Narwekar : राहुल नार्वेकर पुन्हा विधानसभा अध्यक्ष होणार, सूत्रांची माहिती, विशेष अधिवेशनाच्या तारखा समोर
राहुल नार्वेकर पुन्हा विधानसभा अध्यक्ष होणार, सूत्रांची माहिती, विशेष अधिवेशनाच्या तारखा समोर
Embed widget