Uddhav Thackeray Interview : "अजित पवार प्रामाणिक नेते", उद्धव ठाकरेंकडून उपमुख्यमंत्री अजित पवारांचं कौतुक, नेमकं काय म्हणाले उद्धव ठाकरे?
Uddhav Thackeray Interview : राज्यातील राजकीय उलथापालथीनंतर उद्धव ठाकरे यांनी मागील आठवड्यात शरद पवार यांच्या कार्यालयात उपमुख्यमंत्री अजित पवारांची भेट घेतली.

Uddhav Thackeray Interview : शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackarey) यांनी उपमुख्यमंत्री अजित पवारांचे कौतुक केले आहे. यावर बोलतांना त्यांनी म्हटलं आहे की, "अजित पवार हे प्रामाणिक आणि कुशल नेते आहेत." सामनाचे कार्यकारी संपादक संजय राऊत यांनी 'आवाज कुणाचा' या पॉडकास्टमध्ये घेतलेल्या मुलाखतीमध्ये उद्धव ठाकरे यांनी अजित पवारांचे कौतुक केलं आहे. राज्यातील राजकीय उलथापलथीनंतर उद्धव ठाकरे यांनी अजित पवारांबाबत केलेल्या या वक्तव्यामुळे राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आल्याचं म्हटलं जात आहे. मागील आठवड्यात उद्धव ठाकरे यांनी शरद पवार यांच्या कार्यालयात अजित पवारांची भेट घेतली होती. अजित पवारांच्या (Ajit Pawar) बंडानंतर उद्धव ठाकरे यांनी अजित पवारांची घेतलेली भेट ही महत्त्वाची मानली जात आहे.
सामनाच्या मुलाखतीमध्ये उद्धव ठाकरे यांनी काय म्हटलं?
माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी बुधवार (26 जुलै) रोजी आवाज कुणाचा या मुलाखतीमध्ये म्हटलं आहे की, "अजित पवार हे प्रमाणिकपणे काम करतात. त्यांनी महाविकास आघाडीच्या सरकारमध्ये त्यांच्या खात्यामध्ये चांगले काम केले आहे. त्यामुळे सध्या गद्दारांच्या सरकारमध्ये अजित पवरांकडून चांगले काम होईल का? असा सवाल उपस्थित करत उद्धव ठाकरे यांनी विरोधकांवर निशाणा साधला आहे.
या मुलाखतीमध्ये उद्धव ठाकरे यांनी एकनाथ शिंदे आणि त्यांच्या आमदारांवर देखील निशाणा साधला. यावर बोलतांना त्यांनी म्हटलं की, मूठभर निष्ठावंत मला नेहमीच आवडतात. ज्यांना आपण आपलं मानतो तीच बांडगुळ निघतात. त्यामुळे जी मनानेच विकली गेली आहेत ती माणसं मला नकोचं आहेत, अशा शब्दांत उद्धव ठाकरे यांनी बंडखोर आमदारांवर टीकास्त्र सोडलं आहे. तर शिवसेना हे नाव पुन्हा मिळेल, असा विश्वास देखील उद्धव ठाकरे यांनी या मुलाखतीमध्ये व्यक्त केला आहे. या मुलाखतीमध्ये उद्धव ठाकरे यांनी केलेल्या वक्तव्यामुळे राजकीय वर्तुळात दावे-प्रतिदाव्यांचं सत्र सुरु आहे. तर ठाकरेंच्या मुलाखतीवर सत्ताधारी पक्षांकडूनही जोरदार टीका होत आहे.
अजित पवारांसह आठ मंत्र्यांनी मंत्रीपदाची शपथ घेतली आणि महाराष्ट्राच्या राजकारणात एकच खळबळ माजली. आधी शिवसेना आणि नंतर राष्ट्रवादी पक्षामध्ये बंडखोरी झाली. शिंदे आणि त्यांच्या आमदारांनी शिवसेना पक्षावर दावा केला. तसचं अजित पवार यांनी देखील राष्ट्रवादी पक्षावर दावा केला आहे. या सगळ्याच्या पार्श्वभूमीवर उद्धव ठाकरे यांनी अजित पवारांच्या बाबतीत केलेल्या या वक्तव्यामुळे चर्चांना उधाणा आलं आहे.
महत्त्वाच्या इतर बातम्या :
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज

