Top 10 Maharashtra Marathi News : स्मार्ट बुलेटिन : 20 जुलै 2022 : बुधवार : एबीपी माझा
दररोज सकाळी हे बुलेटिन प्रसारित केलं जातं. एबीपी माझाच्या या बुलेटीनमध्ये दररोज सकाळी राजकीय, सामाजिक, आर्थिक, शैक्षणिक, मनोरंजन, क्रिडा विश्वातील महत्त्वाच्या दहा बातम्यांचा आढावा घेतला जातो.

1. शिवसेना शिंदे गटाची की ठाकरेंची? अभूतपूर्व राजकीय पेचावर सरन्यायाधीशांच्या खंडपीठापुढे सुनावणी, सर्वोच्च न्यायालय काय निर्णय देणार याकडे देशाचं लक्ष
2. 2021 मध्ये युतीसाठी उद्धव आणि मोदींची चर्चा, लोकसभेत 12 खासदारांचा वेगळा गट स्थापन केल्यानंतर राहुल शेवाळेंचा गौप्यस्फोट, तर बंडखोर नव्हे गद्दार, आदित्य ठाकरेंचे टीकेचे बाण
3. ओबीसी राजकीय आरक्षणाच्या परीक्षेत महाराष्ट्र पास की नापास? सर्वोच्च न्यायालयाकडून अंतिम निर्णयाची प्रतीक्षा, बांठिया आयोगाकडून 27 टक्के आरक्षणाची शिफारस
ओबीसी समाजाच्या राजकीय आरक्षण प्रकरणी (OBC Political Reservation) सर्वोच्च न्यायालयात आज सुनावणी होणार आहे. माजी मुख्य सचिव जयंतकुमार बांठिया आयोगाचा अहवाल स्वीकारुन न्यायालय 27 टक्के ओबीसी आरक्षण मान्य करणार का? याकडे महाराष्ट्रासह संपूर्ण देशाचं लक्ष लागलं आहे.
बुधवारी, 20 जुलै रोजी स्थानिक स्वराज्य संस्थांमधील ओबीसी आरक्षणाच्या भवितव्याच्या संदर्भातला फैसला आणि महाराष्ट्रातल्या सत्ता संघर्षाबाबतची सुनावणी होणार आहे. या दोन्ही सुनावण्या राज्याच्या दृष्टीनं महत्त्वाच्या आहेत. महाराष्ट्रात पुन्हा ओबीसींना राजकीय आरक्षण मिळणार का? बांठिया आयोगाचा अहवाल सुप्रीम कोर्ट ग्राह्य धरणार का? या सगळ्या प्रश्नांची उत्तरं आता 20 जुलैला मिळणार आहेत.
ओबीसी आरक्षणप्रकरणी सर्वोच्च न्यायालयात आज सुनावणी पार पडणार आहे. राज्यात ओबीसींची लोकसंख्या 37 टक्के असून त्यांना 27 टक्के आरक्षण देण्याची शिफारस आयोगानं केली आहे. माजी मुख्य सचिव जयंतकुमार बांठिया आयोगाचा अहवाल स्वीकारुन न्यायालय ओबीसींसाठी 27 टक्के आरक्षण मान्य करणार का? या मुद्द्यावर ही महत्वपूर्ण सुनावणी होणार असल्यानं न्यायालयाच्या निर्णयाकडे साऱ्यांचे लक्ष लागलं आहे.
4. पत्राचाळ प्रकरणी ईडीचं संजय राऊतांना समन्स, गैरव्यवहारातून अलिबागमध्ये जमीन खरेदी केल्याचा संशय, काल पाटकर दाम्पत्याची ईडीकडून चौकशी
5. मुंबईचे माजी पोलीस आयुक्त संजय पांडेंना दिल्ली ईडीकडून अटक, नॅशनल स्टॉक एक्सेंज घोटाळ्याप्रकरणी कारवाई, कुटुंबियांच्या कंपनीवर आर्थिक गैरव्यवहाराचा आरोप
पाहा व्हिडीओ : स्मार्ट बुलेटिन : 20 जुलै 2022 : बुधवार : एबीपी माझा
6. वाधवान बंधूंना आठ दिवसांची सीबीआय कोठडी, देशातील सर्वात मोठ्या बँक घोटाळ्यातील आरोपी
7. गेले काही दिवस महाराष्ट्राला झोडपून काढणाऱ्या पावसाचा जोर ओसरणार, हवामान विभागाचा अंदाज, विदर्भातील पूर ओसरण्यास सुरुवात
8. औरंगाबाद महापालिका प्रभाग रचनेच्या आराखड्यास अंतिम मंजुरी; आज होणार प्रसिद्ध
9. डोंबिवलीतल्या मानपाडा परिसरातील आय सी आय सी आय बँकेवर दरोडा, 12 कोटी 20 लाख रूपयांची रोकड लंपास. तिन जण अटकेत
10. आर्थिक संकटात सापडलेल्या श्रीलंकेत आज राष्ट्रपतीपदासाठी निवडणूक, विक्रमसिंघे, डल्लास आणि अनुरा कुमारा यांच्यात शर्यत
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
