एक्स्प्लोर

सदाभाऊंचे सर्व आरोप खोटे, पैसे वसूल होईपर्यंत त्यांना अडवणारच; हॉटेल मालकाचे सदाभाऊ खोत यांना प्रत्युत्तर

व्हायरल झालेल्या व्हिडिओ मागे राष्ट्रवादीच्या नेत्याचा हात असल्याचा आरोप सदाभाऊ खोत यांनी केली. हॉटेल चालक असलेल्या शिनगारेंविरोधात यांनी सदाभाऊंचा हा आरोप फेटाळला आहे.

 पंढरपूर :  पैसे बुडवायचे म्हणून राष्ट्रवादीचे नाव सदाभाऊ घेत आहेत , पण मी राष्ट्रवादीचा नव्हे तर रघुनाथ दादा पाटील यांच्या शेतकरी संघटनेचा कार्यकर्ता आहे. मला माझ्या हॉटेलाची उधारी मिळेपर्यंत सदाभाऊ यांना अडवणार आणि पैसे वसूल करणार अशी स्पष्ट भूमिका उधारीसाठी सदाभाऊंचा ताफा अडवणारे हॉटेल मालक अशोक शिनगारे यांनी एबीपी  माझाशी बोलताना दिली आहे.

माझा आणि राष्ट्रवादीचा कसलाही संबंध नसून माझ्यावर असलेल्या गुन्हेगारी केसबाबत सदाभाऊ खोटी माहिती देत आहेत. मी कधीही वाळूचा व्यवसाय केलेला नसून कर्नाटक येथून माझ्याकडे आलेले 13 किलो सोने मी सांगोला पोलिसांच्यामार्फत कर्नाटक पोलिसांना मिळवून दिले होते. माझ्यावर कोणत्याही केस नसून ज्या केस असतील त्याला मी तोंड देण्यास खंबीर आहे. मात्र सदाभाऊंनी माझ्या हॉटेलची आठ वर्षांपूर्वीची उधारी आधी द्यावी अशी मागणी केली. हॉटेल 'मामा भाचे' हे माझ्या मालकीचे असून मी ते चालवायला माझ्या भाच्याला दिले आहे. सदाभाऊ खोटी माहिती देऊन पैसे बुडवायचा तयारीत असले तरी मी माझे पैसे मिळाल्याशिवाय सोडणार नाही, ते येतील तेव्हा त्यांच्या गाड्या अडवणार असल्याची भूमिका घेतली आहे.

आज सदाभाऊ यांनी सोलापूर येथे पत्रकार परिषद घेऊन अशोक शिनगारे याच्यावर केलेले सर्व आरोप फेटाळून लावल्याने आता सदाभाऊ यांच्या अडचणीत वाढ झाली आहे.  काल पंचायत राज बैठकीला जात असताना हॉटेल उधारीसाठी सदाभाऊ खोत यांचा गाडीचा ताफा शिनगारे यांनी अडविल्यामुळे सदाभाऊ खोत यांची मोठी नाचक्की झाली आहे. आता सदाभाऊ आपण कोणाचीही उधारी बुडवली नसल्याचे सांगत असले तरी माढा लोकसभा निवडणुकीत सदाभाऊ यांचे काम करणारे सांगोल्यातील परमेश्वर कोळेकर यांनी मात्र सदाभाऊ यांनी अनेकांचे पैसे बुडविल्याचा आरोप केला आहे. सदाभाऊ याना सांगोला तालुक्याने हजारोंची आघाडी मिळवून दिली मात्र त्यावेळी राबणारे आमच्यासारख्या कार्यकर्त्यांना अजूनही सदाभाऊ यांच्या उधारीसाठी फोन येत असल्याचे परमेश्वर कोळेकर यांनी माझाशी बोलताना सांगितले.

दरम्यान सदाभाऊ यांचा ताफा अडवणाऱ्या अशोक शिनगारे यांच्या विरोधात सांगोला पोलीस ठाण्यात भादवी 341 आणि 186  नुसार गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सुरु असल्याचे पोलीस निरीक्षक अनंत कुलकर्णी यांनी सांगितले आहे. आता सदाभाऊ ही 66 हजार 450  रुपयांची उधारी देणार की पुन्हा शिनगारे त्यांची वाट अडवणार हे पाहावे लागणार. असे असले तरी राष्ट्रवादी काँग्रेस मात्र या सर्व प्रकारची दुरून गमंत बघत आहे . या सर्व प्रकारामुळे सदाभाऊ यांची राज्यभरात नाचक्की झाल्यानंतर भाजप नेते देवेंद्र फडणवीस यात काय भूमिका घेणार याकडे सांगोलावासियांचे लक्ष लागले आहे.

संबंधित बातम्या :

Sadabhau Khot: गेल्यावेळची उधारी द्या..., हॉटेल मालकाने अडवला सदाभाऊंचा ताफा, व्हिडीओ होतोय व्हायरल

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

स्थगिती द्यायला मी उद्धव ठाकरे नाही; मुख्यमंत्री फडणवीसांचा थेट विधानसभेतून टोला, आमदारांनी बाक वाजवला
स्थगिती द्यायला मी उद्धव ठाकरे नाही; मुख्यमंत्री फडणवीसांचा थेट विधानसभेतून टोला, आमदारांनी बाक वाजवला
'गृह'युद्ध.. MSEB ने पोलिसांची लाईट तोडली, वाहतूक पोलिसांची फौज कार्यालयासमोर उतरवत पावत्या फाडल्या
'गृह'युद्ध.. MSEB ने पोलिसांची लाईट तोडली, वाहतूक पोलिसांची फौज कार्यालयासमोर उतरवत पावत्या फाडल्या
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 07 मार्च 2025 | शुक्रवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 07 मार्च 2025 | शुक्रवार
बीडमधील खोक्याच्या मुसक्या आवळणार, वन विभाग स्पॉटवर; हरणाची कवटी अन् हाडकं घेतली ताब्यात
बीडमधील खोक्याच्या मुसक्या आवळणार, वन विभाग स्पॉटवर; हरणाची कवटी अन् हाडकं घेतली ताब्यात
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

ABP Majha Marathi News Headlines 09 PM TOP Headlines 09PM 07 March 2025ABP Majha Marathi News Headlines 08 PM TOP Headlines 08PM 07 March 2025Jitendra Awhad : निधी द्या हो... जितेंद्र आव्हाडांची हात जोडून नगरविकास विभागाला विनंतीUdayanraje Bhosale PC| महापुरुषांवर बेताल वक्तव्य करणाऱ्यांच्या विरोधात कायदा पास करा-उदयनराजे भोसले

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
स्थगिती द्यायला मी उद्धव ठाकरे नाही; मुख्यमंत्री फडणवीसांचा थेट विधानसभेतून टोला, आमदारांनी बाक वाजवला
स्थगिती द्यायला मी उद्धव ठाकरे नाही; मुख्यमंत्री फडणवीसांचा थेट विधानसभेतून टोला, आमदारांनी बाक वाजवला
'गृह'युद्ध.. MSEB ने पोलिसांची लाईट तोडली, वाहतूक पोलिसांची फौज कार्यालयासमोर उतरवत पावत्या फाडल्या
'गृह'युद्ध.. MSEB ने पोलिसांची लाईट तोडली, वाहतूक पोलिसांची फौज कार्यालयासमोर उतरवत पावत्या फाडल्या
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 07 मार्च 2025 | शुक्रवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 07 मार्च 2025 | शुक्रवार
बीडमधील खोक्याच्या मुसक्या आवळणार, वन विभाग स्पॉटवर; हरणाची कवटी अन् हाडकं घेतली ताब्यात
बीडमधील खोक्याच्या मुसक्या आवळणार, वन विभाग स्पॉटवर; हरणाची कवटी अन् हाडकं घेतली ताब्यात
Satish Bhosale : सतीश भोसले उर्फ खोक्या भाईचे आणखी नवंनवीन कारनामे समोर; अंजली दमानियांकडून नवा व्हिडीओ शेयर
सतीश भोसले उर्फ खोक्या भाईचे आणखी नवंनवीन कारनामे समोर; अंजली दमानियांकडून नवा व्हिडीओ शेयर
औरंगजेबाच्या थडग्यासाठी गेल्या 10 वर्षातील सर्वाधिक निधी 2022 मध्ये; जाणून घ्या वर्षाला किती?
औरंगजेबाच्या थडग्यासाठी गेल्या 10 वर्षातील सर्वाधिक निधी 2022 मध्ये; जाणून घ्या वर्षाला किती?
Donald Trump : कॅनडा, मेक्सिकोनं अमेरिकन टोमॅटो खाणं सोडलं, सफरचंद सुद्धा दुसऱ्या देशाची घेतली; डोनाल्ड ट्रम्प यांनी 'टॅरिफ' नाद 30 दिवसांनी पुन्हा पुढे ढकलला!
कॅनडा, मेक्सिकोनं अमेरिकन टोमॅटो खाणं सोडलं, सफरचंद सुद्धा दुसऱ्या देशाची घेतली; डोनाल्ड ट्रम्प यांनी 'टॅरिफ' नाद 30 दिवसांनी पुन्हा पुढे ढकलला!
महिला दिनाच्या निमित्ताने राज्यभरातील ग्रामपंचायतींनी बोलवली 'विशेष ग्रामसभा'; महिला सुरक्षेचा ठराव मांडणार
महिला दिनाच्या निमित्ताने राज्यभरातील ग्रामपंचायतींनी बोलवली 'विशेष ग्रामसभा'; महिला सुरक्षेचा ठराव मांडणार
Embed widget