एक्स्प्लोर
यंदाही एसटी सणासुदीच्या काळात 'दिवाळं' काढणार
1 नोव्हेंबर ते 20 नोव्हेंबर दरम्यान एसटीची दरवर्षीप्रमाणे दिवाळीकरीता 20 दिवसांसाठी सरसकट 10 टक्के भाडेवाढ होणार आहे. 31 ऑक्टोबरच्या मध्यरात्रीपासून नवे दर लागू होतील.

मुंबई : एसटी महामंडळाने दरवर्षीप्रमाणे यंदाही दिवाळीच्या काळात भाडेवाढ करणार असल्याचं जाहीर केलं आहे. 1 नोव्हेंबर ते 20 नोव्हेंबर दरम्यान एसटीची दरवर्षीप्रमाणे दिवाळीकरीता 20 दिवसांसाठी सरसकट 10 टक्के भाडेवाढ होणार आहे. 31 ऑक्टोबरच्या मध्यरात्रीपासून नवे दर लागू होतील.
मागील वर्षी याच काळात सेवाप्रकार निहाय 20, 15 आणि 10 टक्के अशी भाडेवाढ केली होती. यंदा मात्र सर्व सेवा प्रकारात एकसमान अशी केवळ 10 टक्के भाडेवाढ करण्यात आली आहे.
एसटी महामंडळाच्या परिवर्तनशील भाडेवाढ सूत्रानुसार गर्दीच्या हंगामात महसूल वाढीच्या दृष्टीने 30 टक्क्यांपर्यंत भाडेवाढ करण्याचा अधिकार राज्य परिवहन प्राधिकरणाने उपाध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालकांना दिला आहे.
त्यानुसार दरवर्षी गर्दीच्या हंगामात (दिवाळी सुट्टीच्या कालावधीत) तात्पुरत्या स्वरूपाची भाडेवाढ करण्यात येते. काही दिवसांपूर्वीच वाढत्या डिझेल दरांमुळे एसटी महामंडळाने भाडेवाढ केली होती. आता परत एसटीच्या ग्राहकांना दिवाळीच्या काळात अतिरिक्त भुर्दंड बसणार आहे.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
बीड
महाराष्ट्र
राजकारण
शिक्षण
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
