Chhagan Bhujbal : पण पूर्णवेळ पक्षाच्या अधिवेशनाला थांबणार नाही! 'त्या' दोघांच्या नावाचा उल्लेख करत छगन भुजबळांची विमानतळावरच नाराजी प्रकटली!
Chhagan Bhujbal : धनंजय मुंडे यांनी प्रकृतीच्या कारणास्तव अधिवेशनाला दांडी मारली आहे. ते परळीमध्येच आहेत. दरम्यान, ज्येष्ठ नेते छगन भुजबळ सुद्धा येणार की नाही त्याची चर्चा रंगली होती.
Chhagan Bhujbal : राष्ट्रवादी काँग्रेसचे शिर्डीमध्ये आज अधिवेशन होत आहे. अधिवेशनामध्ये काय होणार यापेक्षा अधिवेशनामध्ये ज्येष्ठ नेते छगन भुजबळ आणि वादामध्ये अडकलेले धनंजय मुंडे उपस्थिती लावणार की नाही? याचीच चर्चा सर्वाधिक रंगली होती. मात्र, धनंजय मुंडे यांनी प्रकृतीच्या कारणास्तव अधिवेशनाला दांडी मारली आहे. ते परळीमध्येच आहेत. दरम्यान, ज्येष्ठ नेते छगन भुजबळ सुद्धा येणार की नाही त्याची चर्चा रंगली होती. छगन भुजबळ अधिवेशनाला पोहोचले आहेत. मात्र, त्यांची नाराजी कायम असल्याचे अधिवेशनाला पोहोचण्यासाठी विमानतळावर दिलेल्या प्रतिक्रियेतून स्पष्ट झालं आहे.
पूर्णवेळ अधिवेशनाला थांबणार नसल्याचे छगन भुजबळ यांनी स्पष्ट केले
शिर्डी विमानतळावर उतरल्यानंतर छगन भुजबळ यांनी मापक शब्दांमध्ये प्रतिक्रिया दिली. छगन भुजबळ यांनी सांगितले की, प्रफुल पटेल काल येऊन बसले होते. सुनील तटकरे यांनी सुद्धा अधिवेशनाला या अशी विनंती केली होती. त्यामुळे मी अधिवेशनासाठी आलो आहे, थोडा वेळ थांबून जाणार आहे. पूर्णवेळ अधिवेशनाला थांबणार नसल्याचे छगन भुजबळ यांनी स्पष्ट केले. त्यामुळे भुजबळ यांची पक्षावर नाराजी कायम असल्याचे स्पष्ट आहे. दरम्यान अधिवेशनामुळे अजित पवार आणि छगन भुजबळ पहिल्यांदाच आमने-सामने येतील आणि दोन्ही नेत्यांमध्ये काही चर्चा होते का? याकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागून राहिले होते. मात्र, भुजबळ यांनी माफक शब्दांमध्ये प्रतिक्रिया देत पूर्णवेळ अधिवेशन उपस्थित राहणार नसल्याचे स्पष्ट केलं आहे.
भुजबळ यांची नाराजी अधिकच वाढली
मंत्रिमंडळात डावडल्यापासून छगन भुजबळ यांची नाराजी सातत्याने समोर आली आहे. त्यांनी सातत्याने पक्षावर तोफ डागली आहे. त्यामुळे भुजबळ हे अधिवेशनाला येणार की नाहीत अशीच चर्चा होती. आज छगन भुजबळ अधिवेशनाला पोहोचण्यापूर्वी त्यांचे चिरंजीव पंकज भुजबळ मात्र अधिवेशनाला पोहोचले होते. दरम्यान, राष्ट्रवादीच्या वरिष्ठ नेत्यांकडून भुजबळ यांच्या मनधरणीसाठी आवश्यक प्रयत्न केले न गेल्यामुळे भुजबळ यांची नाराजी अधिकच वाढली. त्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेत भाजपच्या वाटेवर असल्याचा अप्रत्यक्ष संदेश दिला होता. फडणवीस यांनी त्यावेळी भुजबळ यांना काही दिवस संयम पाळण्याचा सल्ला दिल्यानंतर भुजबळ सहकुटुंब परदेशात रवाना झाले होते.
इतर महत्वाच्या बातम्या