एक्स्प्लोर

निवडणूक २०२४ एक्झिट पोल

(Source:  Dainik Bhaskar)

Morning Headlines 3rd September: देश विदेशातील महत्त्वाच्या बातम्या एका क्लिकवर, वाचा Morning News

देश-विदेशातील सकाळच्या महत्त्वाच्या बातम्यांचा वेगवान आढावा या बुलेटीनच्या माध्यमातून घेतला जातो. यामध्ये देशभरासह राज्यातील राजकीय, सामाजिक, आर्थिक, क्रीडा तसेच इतर बातम्यांचे अपडेट्स मिळतील

देश-विदेशातील सकाळच्या महत्त्वाच्या बातम्यांचा वेगवान आढावा या बुलेटीनच्या माध्यमातून घेतला जातो. यामध्ये देशभरासह राज्यातील राजकीय, सामाजिक, आर्थिक, क्रीडा तसेच इतर बातम्यांचे अपडेट्स मिळतील... 

Adhir Ranjan Chowdhury: अधीर रंजन चौधरीचं अमित शाहंना पत्र, 'वन नेशन वन इलेक्शन' समितीचा भाग होण्यास नकार

One Nation One Election Committee: 'वन नेशन, वन इलेक्शन' या (One Nation One Election Committee) समितीमध्ये काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे (Mallikarjun kharge)यांचे नाव समाविष्ट करण्यात आले नाही. यावर काँग्रेसनं नाराजी व्यक्त केली आहे. खर्गे यांच्याऐवजी काँग्रेस खासदार अधीर रंजन चौधरी (Adhir Ranjan Chowdhury) यांच्या नावाचा समितीमध्ये समावेश करण्यात आला आहे. दरम्यान, खासदार अधीर रंजन चौधरी यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह (Amit Shah) यांना पत्र लिहून या समितीचा भाग होण्यास नकार दिला आहे. वाचा सविस्तर 

India Weather : देशाच्या विविध भागात आज मुसळधार पावसाचा इशारा, वाचा हवामान विभागाचा अंदाज

सध्या देशाच्या काही भागात पाऊस (Rain) सुरु आहे. तर काही भागात पावसानं दडी मारली आहे. अनेक ठिकाणी अद्याप म्हणावा तसा पाऊस झाला नाही, त्यामुळं शेतकरी चिंतेत आहेत. दरम्यान, हवामान विभागानं (imd) दिलेल्या माहितीनुसार आज (3 सफ्टेंबर) पूर्व भारतात पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. तसेच आज ओडिशात काही ठिकाणी ढगाळ वातावरण आहे. तर काही ठिकाणी मुसळधार पावसाची शक्यता आहे. तसेच छत्तीसगडमध्ये देखील पुढील तीन ते चार  दिवस मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे. तसेच दक्षिण कर्नाटकसह महाराष्ट्राच्या काही भागात देखील पावसाची शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे. वाचा सविस्तर 

Survey On I.N.D.I.A Alliance : राहुल, केजरीवाल, नितीश की ममता? इंडिया आघाडीतून पंतप्रधानपदाचा चेहरा कोण? सर्वेक्षणात लोकांचा कौल काय?

नवी दिल्ली लोकसभा निवडणुकीसाठी (lLok Sabha Election 2024) काही महिन्यांचा अवधी राहिला आहे. सत्ताधारी आणि विरोधकांनी निवडणुकीसाठीची तयारी सुरू केली आहे. देशात मुदतपूर्व निवडणुकांपासून 'एक देश, एक निवडणूक' (One Nation One Election) अशीही चर्चा सुरू आहे. दोन दिवसांपूर्वी मुंबईत विरोधी पक्ष आघाडीची (I.N.D.I.A.) बैठक झाली. ज्यामध्ये विरोधी पक्षांनी एकत्र निवडणूक लढवण्याचा निर्धार केला. वाचा सविस्तर 

Aditya-L1 Mission : आदित्य-एल1 मोहिमेत निगार शाजी आणि अन्नपूर्णी सुब्रमण्यम यांचाही समावेश; कोण आहेत इस्रोच्या या महिला वैज्ञानिक? वाचा सविस्तर

Aditya-L1 Mission Launch : सौर मिशन आदित्य-L1 (Aditya-L1) शनिवारी (2 सप्टेंबर, 2023) यशस्वीरित्या प्रक्षेपित करण्यात आले.  इस्रोच्या (ISRO) या मोहिमेमुळे आता भारताला सूर्याचा अभ्यास करणं सहज शक्य होणार आहे. या मोहिमेत अनेक शास्त्रज्ञांची मेहनत आहे. मात्र, मोहिमेच्या यशासाठी महिला शास्त्रज्ञ निगार शाजी आणि अन्नपूर्णी सुब्रमण्यम यांची खूप चर्चा आहे. या दोन्ही महिला शास्त्रज्ञांनी या मोहिमेत अतिशय महत्त्वाची भूमिका बजावली आहे. वाचा सविस्तर 

G20 Summit: भारतात येणाऱ्या पाहुण्यांसाठी शाही थाट; रस्त्यांपासून ते हॉटेलपर्यंत तयारी पूर्ण

नवी दिल्ली :  जी-20 शिखर परिषदेसाठी (G20 Summit) राजधानी दिल्ली (Delhi) सज्ज झाली आहे. संपूर्ण दिल्लीमध्ये सध्या जी-20 शिखर परिषदेचा उत्साह पाहायला मिळतोय.  अशा परिस्थितीत बैठकीला येणाऱ्या देशांच्या प्रमुख पाहुण्यांचा मुक्काम कोणत्या हॉटेलमध्ये असणार, त्यांच्या स्वागतासाठी काय व्यवस्था आहे, याची उत्सुकता सर्वांना लागून राहिली आहे. दरम्यान, हॉटेलमधील त्यांच्या खोल्यांची व्यवस्था कशी असेल? त्यांना कोणत्या सुविधा उपलब्ध होतील? हा सध्या प्रत्येकाच्या कुतुहलाचा विषय बनला आहे. सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे, या पाहुण्यांसाठीच्या जेवणाचा बेत काय असणार? हा प्रश्न देखील सध्या अनेकांना पडलाय. वाचा सविस्तर 

विश्वचषकासाठी टीम इंडियाची आज घोषणा, राहुल-तिलकवर होणार निर्णय

Team India for ODI World Cup 2023 : भारतीय संघ सध्या आशिया चषकामध्ये व्यस्त आहे. भारताचा पहिला सामना पावसामुळे रद्द झाला. दुसरा सामना नेपाळविरोधात होणार आहे. त्याआधी विश्वचषकासाठी भारतीय संघाची घोषणा करण्यात येणार आहे. आज, विश्वचषकासाठी भारताच्या 15 सदस्यीय संघाची घोषणा करण्यात येणार आहे. निवड समितीचे अध्यक्ष अजित आगरकर श्रीलंकामधून भारतीय संघाची घोषणा करणार आहेत. वाचा सविस्तर 

3rd September In History: शाहीर साबळे, संगीतकार प्यारेलाल यांचा जन्म; आज इतिहासात...

3rd September In History: प्रत्येक दिवस महत्त्वाचा असतो. इतिहासात प्रत्येक दिवशी घडामोडी झालेल्या असतात. आजचा दिवसही महत्त्वाचा आहे. आपल्या पहाडी आवाजाने लोकांच्या मनाचा ठाव घेणारे, शाहिरीतून समाजातील चुकीच्या गोष्टींवर प्रहार करणारे शाहीर कृष्णराव गणपतराव साबळे उर्फ शाहीर साबळे यांचा आज जन्मदिन आहे. तर, हजारो गीतांना संगीतबद्ध करून त्यांना एव्हरग्रीन करणारे लक्ष्मीकांत-प्यारेलाल या संगीतकार जोडीतील प्यारेलाल यांचाही आज वाढदिवस आहे. वाचा सविस्तर 

Horoscope Today 3 September 2023 : मिथुन, सिंह, धनुसह 'या' राशीच्या लोकांसाठी दिवस चांगला, फक्त 'हे' काम करू नका; जाणून घ्या सर्व 12 राशींचं आजचं राशीभविष्य

Horoscope Today 3 September 2023 : आज रविवार हा महत्त्वाचा दिवस आहे. ग्रहांच्या चालीनुसार मेष राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस थोडा आव्हानात्मक असणार आहे. तुमच्या कामाच्या ठिकाणी तुम्हाला एखाद्या आव्हानाचा सामना करावा लागू शकतो. तर, कर्क राशीचे लोक अडचणीत अडकू शकतात. विरोधकांपासूनही सावध राहण्याचा सल्ला देण्यात आला आहे. एकूणच मेष ते मीन राशीच्या लोकांसाठी आजचा रविवार कसा राहील? काय सांगतात तुमच्या नशिबाचे तारे? जाणून घ्या आजचं राशीभविष्य. वाचा सविस्तर

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Nitin Gadkari : नागपूरमध्ये विमानासारख्या सोयी असलेली बस सेवा, काय काय उपलब्ध असणार? नितीन गडकरींचं नवीन स्वप्न
नागपूरमध्ये विमानासारख्या सोयी असलेली बस सेवा, काय काय उपलब्ध असणार? नितीन गडकरींचं नवीन स्वप्न
पोलिस स्टेशन शांतता समितीचा सदस्यच निघाला नराधम, महिलेला भेटायला बोलवून केले लज्जास्पद चाळे 
पोलिस स्टेशन शांतता समितीचा सदस्यच निघाला नराधम, महिलेला भेटायला बोलवून केले लज्जास्पद चाळे 
Marathi Language : मराठीचा इतिहास समृद्ध, अभिजात दर्जा मिळाल्याने मराठीजणांचे अभिनंदन : नरेंद्र मोदी
मराठीचा इतिहास समृद्ध, अभिजात दर्जा मिळाल्याने मराठीजणांचे अभिनंदन : नरेंद्र मोदी
Mumbai Metro Line 3 : बीकेसी ते आरे मेट्रो लाईन 3 ला सुरुवात, तिकीट दर किती? स्टेशन कोणकोणते? वेळापत्रक एका क्लिकवर
बीकेसी ते आरे मेट्रो लाईन 3 ला सुरुवात, तिकीट दर किती? स्टेशन कोणकोणते? वेळापत्रक एका क्लिकवर
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

NIA Action Special Report :  NIAच्या महाराष्ट्रातील कारवाईचा ग्राऊंड झिरो रिपोर्ट एबीपी माझावरRangnath Pathare Majha Katta | अभिजात मराठी भाषा समितीचे अध्यक्ष  रंगनाथ पठारे माझा कट्टावरPM Narendra Modi Special Report : तिसऱ्या टप्प्यातील मेट्रोतून मोदींचा प्रवासJammu Kashmir Exit Poll : जम्मु- काश्मीर , हरियाणात भाजपला धक्का बसण्याची शक्यता

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Nitin Gadkari : नागपूरमध्ये विमानासारख्या सोयी असलेली बस सेवा, काय काय उपलब्ध असणार? नितीन गडकरींचं नवीन स्वप्न
नागपूरमध्ये विमानासारख्या सोयी असलेली बस सेवा, काय काय उपलब्ध असणार? नितीन गडकरींचं नवीन स्वप्न
पोलिस स्टेशन शांतता समितीचा सदस्यच निघाला नराधम, महिलेला भेटायला बोलवून केले लज्जास्पद चाळे 
पोलिस स्टेशन शांतता समितीचा सदस्यच निघाला नराधम, महिलेला भेटायला बोलवून केले लज्जास्पद चाळे 
Marathi Language : मराठीचा इतिहास समृद्ध, अभिजात दर्जा मिळाल्याने मराठीजणांचे अभिनंदन : नरेंद्र मोदी
मराठीचा इतिहास समृद्ध, अभिजात दर्जा मिळाल्याने मराठीजणांचे अभिनंदन : नरेंद्र मोदी
Mumbai Metro Line 3 : बीकेसी ते आरे मेट्रो लाईन 3 ला सुरुवात, तिकीट दर किती? स्टेशन कोणकोणते? वेळापत्रक एका क्लिकवर
बीकेसी ते आरे मेट्रो लाईन 3 ला सुरुवात, तिकीट दर किती? स्टेशन कोणकोणते? वेळापत्रक एका क्लिकवर
Metro Metro line 3 : बीकेसी ते आरे, मुंबई मेट्रो लाईन 3 चे पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते लोकार्पण; मेट्रोतून प्रवास करत विद्यार्थी, कामगार अन् महिलांशी संवाद
बीकेसी ते आरे, मुंबई मेट्रो लाईन 3 चे पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते लोकार्पण; मेट्रोतून प्रवास करत विद्यार्थी, कामगार अन् महिलांशी संवाद
सध्या तरी अजितदादांसोबतच, फोनवरून उमेदवारी जाहीर झालेल्या आमदाराचे सूचक वक्तव्य; रामराजेंच्या भूमिकेवर सगळं ठरणार
सध्या तरी अजितदादांसोबतच, फोनवरून उमेदवारी जाहीर झालेल्या आमदाराचे सूचक वक्तव्य; रामराजेंच्या भूमिकेवर सगळं ठरणार
रस्त्यावर दहशत निर्माण करणाऱ्या टोळक्याला हटकलं, टवाळखोरांनी थेट पोलिसावर केला हल्ला, नाशिकमधील धक्कादायक घटना
रस्त्यावर दहशत निर्माण करणाऱ्या टोळक्याला हटकलं, टवाळखोरांनी थेट पोलिसावर केला हल्ला, नाशिकमधील धक्कादायक घटना
Sanjay Raut : शिंदेंसोबत गुवाहाटीला गेलेल्या आमदारांना दिलं होतं गुंगीचं औषध, संजय राऊतांच्या दाव्याने खळबळ, नेमकं काय म्हणाले?
शिंदेंसोबत गुवाहाटीला गेलेल्या आमदारांना दिलं होतं गुंगीचं औषध, संजय राऊतांच्या दाव्याने खळबळ, नेमकं काय म्हणाले?
Embed widget