एक्स्प्लोर

3rd September In History: शाहीर साबळे, संगीतकार प्यारेलाल यांचा जन्म; आज इतिहासात...

शाहिरीतून समाजातील चुकीच्या गोष्टींवर प्रहार करणारे शाहीर कृष्णराव गणपतराव साबळे उर्फ शाहीर साबळे यांचा आज जन्मदिन आहे.

3rd September In History: प्रत्येक दिवस महत्त्वाचा असतो. इतिहासात प्रत्येक दिवशी घडामोडी झालेल्या असतात. आजचा दिवसही महत्त्वाचा आहे. आपल्या पहाडी आवाजाने लोकांच्या मनाचा ठाव घेणारे, शाहिरीतून समाजातील चुकीच्या गोष्टींवर प्रहार करणारे शाहीर कृष्णराव गणपतराव साबळे उर्फ शाहीर साबळे यांचा आज जन्मदिन आहे. तर, हजारो गीतांना संगीतबद्ध करून त्यांना एव्हरग्रीन करणारे लक्ष्मीकांत-प्यारेलाल या संगीतकार जोडीतील प्यारेलाल यांचाही आज वाढदिवस आहे. 

1923:  कृष्णराव गणपतराव साबळे उर्फ शाहीर साबळे यांचा जन्मदिन

मुक्त नाट्याचे आद्य प्रवर्तक समजले जाणारे शाहीर कृष्णराव गणपतराव साबळे उर्फ शाहीर साबळे यांचा आज जन्मदिन. शाहीर साबळे हे कवी-गीतकार-संगीतकार, गायक, कुशल ढोलकी वादक, अभिनेते-दिग्दर्शक तसेच उत्तम व्यवस्थापक आणि संघटक होते. रताच्या स्वातंत्र्यचळवळीत आणि संयुक्त महाराष्ट्रासाठी झालेल्या चळवळीत शाहीर म्हणून फार मोठे योगदान दिले आहे. 

‘महाराष्ट्राची लोकधारा’द्वारे त्यांनी मराठी लोकसंस्कृतीची ओळख आणि प्रसिद्धी केली. ’गर्जा महाराष्ट्र माझा, जय जय महाराष्ट्र माझा’ हे गीत त्यांनी महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात पोहोचवले.

शाहीर साबळे यांनी सामाजिक कार्यात बालपणीच सहभाग घेतला होता. अमळनेरला असताना साबळे यांना साने गुरुजींचा सहवास लाभला. साने गुरुजी यांच्या सामाजिक कार्यात शाहीर साबळे यांचा सक्रिय सहभाग असे. सातारा जिल्ह्यातील पसरणी गावात भैरवनाथाच्या मंदिरात अस्पृश्यांना प्रवेश देण्यासाठी गावातील तरुण मंडळींबरोबर त्यांनी पुढाकार घेतला. या वेळी साने गुरुजींबरोबर कर्मवीर भाऊराव पाटील, सेनापती बापट व क्रांतिसिंह नाना पाटील या मंदिर प्रवेश प्रसंगी उपस्थित होते. साने गुरुजींच्या सहवासात आलेल्या साबळे यांना राष्ट्रभक्तीची प्रेरणा मिळाली. त्या प्रेरणेतून त्यांनी देशाच्या स्वातंत्र्य चळवळीतही भाग घेतला. पंढरपूरच्या विठ्ठल मंदिरात अस्पृश्यांच्या प्रवेशासाठी साने गुरुजींनी केलेल्या उपोषणाला पाठिंबा देण्यासाठी त्यांच्या कलापथकाने दौरे केले. 

1942 ची चलेजाव चळवळ, गोवा व हैद्राबाद मुक्तिसंग्राम, संयुक्त महाराष्ट्र चळवळ अशा अनेक आंदोलनांत शाहीर साबळे यांनी सहभाग घेतला. शिवसेनेच्या विस्ताराची पार्श्वभूमी तयार करण्यात त्यांचा स्वतःचा तसेच त्यांच्या 'आंधळं दळतंय' या प्रहसनाचा मोलाचा वाटा होता. 

समाजाची दुखणी, व्यथा व सत्यस्थिती याचा अभ्यास करून शाहीर साबळे यांनी अनेक प्रहसने लिहिली. नाटक व लोकनाट्य याचा योग्य समन्वय साधून त्यांनी अनेक मुक्‍तनाट्ये लिहिली आणि समर्थपणे सादरही केली. मुक्त नाट्यांप्रमाणेच अनेक पोवाडेही शाहीर साबळे यांनी लिहिले.

अखिल भारतीय मराठी नाट्य संमेलनाचे अध्यक्षपद भूषवणारे एकमेव शाहीर आहेत. भारत सरकारतर्फे पद्मश्री पुरस्काराने त्यांना सन्मानित करण्यात आले. पद्म पुरस्कार मिळवणारे ते पहिले शाहीर आहेत. 

1940 : लक्ष्मीकांत-प्यारेलाल या जोडीतील संगीतकार प्यारेलाल शर्मा यांचा जन्म.

बॉलिवूडमधील अनेक गीतांना आपल्या संगीताने अजरामर करणारी संगीत दिग्दर्शक जोडीपैकी एक असलेल्या लक्ष्मीकांत-प्यारेलाल या संगीतकार जोडीतील संगीतकार प्यारेलाल यांचा आज वाढदिवस. प्रसिद्ध बिगुल वादक पंडित रामप्रसाद शर्मा हे प्यारेलाल यांचे वडील होते. वयाच्या आठव्या वर्षापासून प्यारेलाल यांनी व्हायोलिन शिकण्यास सुरुवात केली. 

प्यारेलाल शर्मा यांना हिंदी चित्रपटाचा संगीतकार व्हायचे नव्हते, तर येहुदी मेन्यूहीनसारखे व्हायोलिनवादक व्हायचे होते. त्यासाठी सतराव्या वर्षी ते व्हिएन्नाला जायला निघाले होते, पण लक्ष्मीकांत कुडाळकर यांनी त्यांना थांबवले व दोघे ‘लक्ष्मीकांत प्यारेलाल’ या नावाने संगीत देऊ लागले

लक्ष्मीकांत-प्यारेलाल यांनी 1963 ते 1998 या कालावधीत 600 हून अधिक चित्रपटांना संगीत दिले आहे. 1963 मधील पारसमणी या चित्रपटातून त्यांनी बॉलिवूडमध्ये पदार्पण केले. पुढे 1964 मध्ये प्रदर्शित झालेल्या दोस्ती या चित्रपटातील गीते चांगलीच गाजली. त्यानंतर या संगीत द्वयींनी मागे वळून पाहिलेच नाही. 

1952 : अभिनेते शक्ती कपूर यांचा वाढदिवस 

सुनील सिकंदरलाल कपूर अर्थात शक्ती कपूर यांचा आज वाढदिवस. आपल्या खलनायकी भूमिकांनी चित्रपटसृष्टीवर आपली छाप सोडली. शक्ती कपूर यांनी जवळपास 700 हून अधिक चित्रपटांमध्ये भूमिका साकारल्या आहेत. जेवढ्या ताकदीने त्यांनी खलनायकी भूमिका वठवल्या, तेवढ्याच ताकदीने त्यांनी विनोदी भूमिकाही साकारल्यात. त्यांनी साकारलेल्या विनोदी भूमिका आजही प्रेक्षकांच्या स्मरणात आहेत. 

इतर महत्त्वाच्या घटना : 

1752 : अमेरिकेत ग्रेगरियन कॅलेंडरचा वापर सुरू झाला.
1855 : आध्यात्मिक गुरू पंत महाराज बाळेकुंद्री यांचा जन्म
1875: पोर्शे मोटार कंपनीचे संस्थापक फर्डिनांड पोर्शे यांचा जन्म 
१९२३: प्रख्यात तबलावादक किशन महाराज यांचा जन्म
1971: कतारला स्वातंत्र्य मिळाले
1976: चित्रपट अभिनेता विवेक ओबेरॉय यांचा जन्म

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Suresh Dhas on Dhananjay Munde : मंत्रि‍पदाच्या राजीनाम्यानंतर धनंजय मुंडेंचा पाय आणखी खोलात, टीकेची झोड उठवणाऱ्या सुरेश धसांनी घेतला मोठा निर्णय
मंत्रि‍पदाच्या राजीनाम्यानंतर धनंजय मुंडेंचा पाय आणखी खोलात, टीकेची झोड उठवणाऱ्या सुरेश धसांनी घेतला मोठा निर्णय
Chhaava : छावा चित्रपट पाहिला अन् मुघलांनी ज्या किल्ल्यावर खजिना लपवला होता तिथं शेकडो स्थानिक खोदकामासाठी पोहोचले! अवघी शेती खोदून टाकली
Video : छावा चित्रपट पाहिला अन् मुघलांनी ज्या किल्ल्यावर खजिना लपवला होता तिथं शेकडो स्थानिक खोदकामासाठी पोहोचले! अवघी शेती खोदून टाकली
Rohini Khadse : आम्हाला खून करण्याची परवानगी द्या; रोहिणी खडसेंचं थेट राष्ट्रपतींना पत्र; नेमकं कारण काय?
आम्हाला खून करण्याची परवानगी द्या; रोहिणी खडसेंचं थेट राष्ट्रपतींना पत्र; नेमकं कारण काय?
Congress Massajog to Beed Sadnabhavana Rally : काँग्रेसची मस्साजोग ते बीड 51 किमी सद्नभावना रॅली, संतोष देशमुख कुटुंबीय सुद्धा सहभागी होणार
काँग्रेसची मस्साजोग ते बीड 51 किमी सद्नभावना रॅली, संतोष देशमुख कुटुंबीय सुद्धा सहभागी होणार
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Harshwardhan Sapkal At Massajog : हर्षवर्धन सपकाळ मस्साजोग गावात दाखल, देशमुखांशी चर्चाVaibhavi Deshmukh:माझे काही बरेवाईट झाले तर आई, विराजची काळजी घे;वैभवी देशमुखचा जबाब 'माझा'च्या हातीNira Canal : नीरा उजवा कालव्यात मृत कोंबड्या आढळल्यानं खळबळ,सावधगिरी बाळगण्याचं रामराजेंचं आवाहनABP Majha Headlines : 8 AM : एबीपी माझा हेडलाईन्स : 08 March 2025 : Maharashtra News : ABP Majha

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Suresh Dhas on Dhananjay Munde : मंत्रि‍पदाच्या राजीनाम्यानंतर धनंजय मुंडेंचा पाय आणखी खोलात, टीकेची झोड उठवणाऱ्या सुरेश धसांनी घेतला मोठा निर्णय
मंत्रि‍पदाच्या राजीनाम्यानंतर धनंजय मुंडेंचा पाय आणखी खोलात, टीकेची झोड उठवणाऱ्या सुरेश धसांनी घेतला मोठा निर्णय
Chhaava : छावा चित्रपट पाहिला अन् मुघलांनी ज्या किल्ल्यावर खजिना लपवला होता तिथं शेकडो स्थानिक खोदकामासाठी पोहोचले! अवघी शेती खोदून टाकली
Video : छावा चित्रपट पाहिला अन् मुघलांनी ज्या किल्ल्यावर खजिना लपवला होता तिथं शेकडो स्थानिक खोदकामासाठी पोहोचले! अवघी शेती खोदून टाकली
Rohini Khadse : आम्हाला खून करण्याची परवानगी द्या; रोहिणी खडसेंचं थेट राष्ट्रपतींना पत्र; नेमकं कारण काय?
आम्हाला खून करण्याची परवानगी द्या; रोहिणी खडसेंचं थेट राष्ट्रपतींना पत्र; नेमकं कारण काय?
Congress Massajog to Beed Sadnabhavana Rally : काँग्रेसची मस्साजोग ते बीड 51 किमी सद्नभावना रॅली, संतोष देशमुख कुटुंबीय सुद्धा सहभागी होणार
काँग्रेसची मस्साजोग ते बीड 51 किमी सद्नभावना रॅली, संतोष देशमुख कुटुंबीय सुद्धा सहभागी होणार
Telangana Tunnel Accident : तेलंगणामधील बोगद्यात अडकलेल्या आठ जीवांचा गेल्या 15 दिवसांपासून शोध सुरुच; अजूनही थांगपत्ता नाही
तेलंगणामधील बोगद्यात अडकलेल्या आठ जीवांचा गेल्या 15 दिवसांपासून शोध सुरुच; अजूनही थांगपत्ता नाही
स्थगिती द्यायला मी उद्धव ठाकरे नाही; मुख्यमंत्री फडणवीसांचा थेट विधानसभेतून टोला, आमदारांनी बाक वाजवला
स्थगिती द्यायला मी उद्धव ठाकरे नाही; मुख्यमंत्री फडणवीसांचा थेट विधानसभेतून टोला, आमदारांनी बाक वाजवला
KDMC मधील कंत्राटी भरतीत नियमांचे उल्लंघन;अतिरिक्त आयुक्तांच्या पत्नी 24 तासांत थेट MD पॅथॉलॉजी पदावर
KDMC मधील कंत्राटी भरतीत नियमांचे उल्लंघन;अतिरिक्त आयुक्तांच्या पत्नी 24 तासांत थेट MD पॅथॉलॉजी पदावर
आजचा महिला दिन खास, 5 राशींचं नशीब उजळणार!
आजचा महिला दिन खास, 5 राशींचं नशीब उजळणार!
Embed widget