एक्स्प्लोर

निवडणूक निकाल २०२४

(Source: ECI/ABP News/ABP Majha)

Adhir Ranjan Chowdhury: अधीर रंजन चौधरीचं अमित शाहंना पत्र, 'वन नेशन वन इलेक्शन' समितीचा भाग होण्यास नकार

काँग्रेस खासदार अधीर रंजन चौधरी यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह (Amit Shah) यांना पत्र लिहले आहे. यामध्ये त्यांनी 'वन नेशन, वन इलेक्शन' या समितीचा भाग होण्यास नकार दिला आहे.

One Nation One Election Committee: 'वन नेशन, वन इलेक्शन' या (One Nation One Election Committee) समितीमध्ये काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे (Mallikarjun kharge)यांचे नाव समाविष्ट करण्यात आले नाही. यावर काँग्रेसनं नाराजी व्यक्त केली आहे. खर्गे यांच्याऐवजी काँग्रेस खासदार अधीर रंजन चौधरी (Adhir Ranjan Chowdhury) यांच्या नावाचा समितीमध्ये समावेश करण्यात आला आहे. दरम्यान, खासदार अधीर रंजन चौधरी यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह (Amit Shah) यांना पत्र लिहून या समितीचा भाग होण्यास नकार दिला आहे.

वन नेशन, वन इलेक्शन या समितीचे माजी राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या अध्यक्षतेखाली आठ सदस्यीय समिती स्थापन करण्यात आली. माजी राष्ट्रपती रामनाथ कोविंद या समितीचे अध्यक्ष असतील. गृहमंत्री अमित शहा, लोकसभेतील काँग्रेसचे नेते अधीर रंजन चौधरी हे या समितीचे सदस्य असतील. सोबतच  गुलाम नबी आझाद, एनके सिंह, सुभाष सी कश्यप, हरीश साळवे आणि संजय कोठारी यांना 'वन नेशन वन इलेक्शन' समितीचे सदस्य करण्यात आले आहे. एक देश एक निवडणूक म्हणजे सर्व देशात एकाच वेळी निवडणुका घेणे. म्हणजे एकाच वेळी लोकसभेसोबतच सर्वच राज्यांच्या विधानसभेच्या निवडणुका एकत्रित घेणे.

मल्लिकार्जुन खरगे यांचे नाव न आल्याने काँग्रेस नाराज

काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांच्या नावाचा समितीमध्ये समावेश करण्यात आला नाही. त्यामुळं काँग्रेसनं नाराजी व्यक्त केलीय. 'एक राष्ट्र, एक निवडणूक' या विषयावरील उच्चस्तरीय समितीच्या माध्यमातून संसदीय लोकशाही नष्ट करण्याचा प्रयत्न असल्याचे मत काँग्रेस नेते केसी वेणुगोपाल यांनी व्यक्त केलं. घोटाळे, बेरोजगारी, महागाई आणि इतर मुद्द्यांवरुन लक्ष विचलित करण्यासाठी ही नौटंकी असल्याचे केसी वेणुगोपाल म्हणाले. समितीमध्ये मल्लिकार्जुन खर्गे यांची नाव सामील न करण्याचे काय कारण आहे? असा सवाल केसी वेणुगोपाल यांनी केला.   

अधीर रंजन चौधरी यांचा समितीत सामील न होण्याचा निर्णय 

काँग्रेसचे खासदार अधीर रंजन चौधरी यांनी या समितीचा भाग होण्याचे निमंत्रण नाकारले आहे. याबाबत त्यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांना पत्र लिहलं आहे. या समितीत काम करण्यास नकार देण्यात मला कोणताही संकोच नाही. मला भीती वाटते की, ही संपूर्ण फसवणूक आहे. राज्यसभेतील विरोधी पक्षनेते मल्लिकार्जुन खर्गे यांचेही नाव या समितीमध्ये नाही. हा संसदीय लोकशाही व्यवस्थेचा अपमान असल्याचे चौधरी म्हणाले. काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे हे राज्यसभेचे विरोधी पक्षनेते आहेत. मल्लिकार्जुन खर्गे यांच्या नावाचा समितीमध्ये समावेश करण्यात आला नाही. त्यामुळं काँग्रेसनं नाराजी व्यक्त केलीय.

महत्त्वाच्या बातम्या:

One Nation, One Election Committee : वन नेशन, वन इलेक्शन कमिटीची अधिसूचना जारी, माजी राष्ट्रपती रामनाथ कोविंद असणार समितीचे अध्यक्ष

 

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

नांदेड लोकसभा पोटनिवडणुकीत मोठा उलटफेर, दिवसभर पिछाडीवर असलेले रवींद्र चव्हाणांनी डाव पलटवला, 1457 मतांनी विजय खेचून आणला
नांदेड लोकसभा पोटनिवडणुकीत मोठा उलटफेर, दिवसभर पिछाडीवर असलेले रवींद्र चव्हाणांनी डाव पलटवला, 1457 मतांनी विजय खेचून आणला
Maharashtra vidhansabha Results : रितेश देशमुखला भाऊचा धक्का; लातूरची सभा गाजवली, पण भावाचा पराभव; काय म्हणाले अमित
रितेश देशमुखला भाऊचा धक्का; लातूरची सभा गाजवली, पण भावाचा पराभव; काय म्हणाले अमित देशमुख
Eknath Shinde: विधानसभा निवडणुकीचं मैदान मारताच शिवसेनेची तातडीने बैठक; एकनाथ शिंदेंबाबत घेतला मोठा निर्णय
विधानसभा निवडणुकीचं मैदान मारताच शिवसेनेची तातडीने बैठक; एकनाथ शिंदेंबाबत घेतला मोठा निर्णय
Maharashtra vidhansabha results 2024 : नरेंद्र मोदींनी सभा घेतलेल्या मतदारसंघात काय झालं, पुणे, मुंबई, धुळे, सोलापूरातील भाजप उमेदवारांचा निकाल
नरेंद्र मोदींनी सभा घेतलेल्या मतदारसंघात काय झालं, पुणे, मुंबई, धुळे, सोलापूरातील भाजप उमेदवारांचा निकाल
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Naresh Arora on Ajit Pawar win :अजितदादा एकदम साधा माणूस, कुठे सौम्य, कुठं कडक असावं ते त्यांना कळलंDhananjay Mahadik on Satej Patil | पुतण्याला निवडून आणता आलं नाही आणि मुख्यमंत्री बनायले निघालेNarayan Rane On Vidhan Sabha Result : महाराष्ट्रात आता तोंड दाखवू नका, उद्धव ठाकरेंवर सडकून टीकाAmruta Fadnavis on Vidhan Sabha Result | ही लँडस्लाईड विक्ट्री, मिस फडणवीसांची प्रतिक्रिया

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
नांदेड लोकसभा पोटनिवडणुकीत मोठा उलटफेर, दिवसभर पिछाडीवर असलेले रवींद्र चव्हाणांनी डाव पलटवला, 1457 मतांनी विजय खेचून आणला
नांदेड लोकसभा पोटनिवडणुकीत मोठा उलटफेर, दिवसभर पिछाडीवर असलेले रवींद्र चव्हाणांनी डाव पलटवला, 1457 मतांनी विजय खेचून आणला
Maharashtra vidhansabha Results : रितेश देशमुखला भाऊचा धक्का; लातूरची सभा गाजवली, पण भावाचा पराभव; काय म्हणाले अमित
रितेश देशमुखला भाऊचा धक्का; लातूरची सभा गाजवली, पण भावाचा पराभव; काय म्हणाले अमित देशमुख
Eknath Shinde: विधानसभा निवडणुकीचं मैदान मारताच शिवसेनेची तातडीने बैठक; एकनाथ शिंदेंबाबत घेतला मोठा निर्णय
विधानसभा निवडणुकीचं मैदान मारताच शिवसेनेची तातडीने बैठक; एकनाथ शिंदेंबाबत घेतला मोठा निर्णय
Maharashtra vidhansabha results 2024 : नरेंद्र मोदींनी सभा घेतलेल्या मतदारसंघात काय झालं, पुणे, मुंबई, धुळे, सोलापूरातील भाजप उमेदवारांचा निकाल
नरेंद्र मोदींनी सभा घेतलेल्या मतदारसंघात काय झालं, पुणे, मुंबई, धुळे, सोलापूरातील भाजप उमेदवारांचा निकाल
Koregaon Assembly Elections 2024 : महेश शिंदेंचा कोरेगावात दणदणीत विजय, शशिकांत शिंदेंचा पुन्हा पराभव
महेश शिंदेंचा कोरेगावात दणदणीत विजय, शशिकांत शिंदेंचा पुन्हा पराभव
Karjat Jamkhed : हुश्श्... रोहित पवार जिंकले एकदा! कर्जत जामखेडमधून 1243 मतांनी राम शिंदेंचा पराभव
हुश्श्... रोहित पवार जिंकले एकदा! कर्जत जामखेडमधून 1243 मतांनी राम शिंदेंचा पराभव
Maharashtra Vidhan Sabha Election results 2024: ठाकरे ब्रँण्ड संकटात, विधानसभेचे भुईसपाट करणारे निकाल, आता इगो सोडून राज ठाकरे-उद्धव ठाकरे एकत्र येणार का?
ठाकरे ब्रँण्ड संकटात, विधानसभेचे भुईसपाट करणारे निकाल, आता इगो सोडून राज ठाकरे-उद्धव ठाकरे एकत्र येणार का?
Uddhav Thackeray : महाराष्ट्र असा वागेल यावर विश्वास नाही, उद्धव ठाकरे यांनी पराभवाचं कारण सांगितलं...
महाराष्ट्र असा वागेल यावर विश्वास नाही, विधानसभा निवडणुकीच्या निकालावर ठाकरेंची दोन शब्दांची प्रतिक्रिया
Embed widget