एक्स्प्लोर
हिंदी ही राष्ट्रभाषा नाही, उगाच ती लादून आमची माथी भडकवू नका, राष्ट्रीय शैक्षणिक धोरणावर मनसे आक्रमक
मनसेने या पूर्वीही हिंदी भाषेला कडाडून विरोध केल्याचं पाहायला मिळालं आहे. आता हिंदी भाषा शिकविण्याचा प्रस्ताव महाराष्ट्रात लागू झाल्यास मनसे याला कसा विरोध करते हे पाहाण्याचं औत्सुक्याचं ठरणार आहे.
![हिंदी ही राष्ट्रभाषा नाही, उगाच ती लादून आमची माथी भडकवू नका, राष्ट्रीय शैक्षणिक धोरणावर मनसे आक्रमक MNS opposes new National Education Policy says Hindi not our mother tongue don't incite us हिंदी ही राष्ट्रभाषा नाही, उगाच ती लादून आमची माथी भडकवू नका, राष्ट्रीय शैक्षणिक धोरणावर मनसे आक्रमक](https://static.abplive.com/wp-content/uploads/sites/4/2019/04/18000412/RAJ.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=1200&height=675)
मुंबई : नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरण मसुद्यामध्ये हिंदी भाषा शिकविण्याचा प्रस्तावावर देशभरातून तीव्र प्रतिक्रिया उमटत आहे. त्यातच महाराष्ट्रातून या मुद्द्यावर महाराष्ट्र निवनिर्माण सेना आक्रमक झाली आहे.
महाराष्ट्र निवनिर्माण सेनेचे नेते अनिल शिदोरे यांनी मनसेच्या अधिकृत ट्विटर पेजवरुन या मुद्द्यावर मनसेची अधिकृत भूमिका मांडली आहे. या ट्विटमध्ये, ‘हिंदी काही राष्ट्रभाषा नाही. उगाच ती आमच्यावर लादून माथी भडकवू नका’ असा धमकीवजा इशारा शिदोरे यांनी दिला आहे.
यावर माहिती आणि प्रसारण मंत्री प्रकाश जावडेकर यांनी, राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाचा केवळ अहवाल आला आहे. सरकारने या अहवालावर अद्याप कोणताही निर्णय घेतला नाही. त्यामुळे सरकारने ही पॉलिसी अमलात आणल्याची चर्चा केवळ गैरसमज असून यात कोणतही तथ्य नाही, असं पत्रकारांना सांगितलं. VIDEO | भाजप नगरसेवकाची गुंडगिरी, मनसेच्या कार्यकर्त्यावर जीवघेणा हल्ला | पनवेल | एबीपी माझा दरम्यान मनसेने या पूर्वीही हिंदी भाषेला कडाडून विरोध केल्याचं पाहायला मिळालं आहे. आता हिंदी भाषा शिकविण्याचा प्रस्ताव महाराष्ट्रात लागू झाल्यास मनसे याला कसा विरोध करते हे पाहाण्याचं औत्सुक्याचं ठरणार आहे. हिंदी भाषा राज्यात शिकविण्याच्या मुद्दावर सर्वप्रथम तामिळनाडूमधून विरोध करण्यात आला होता. त्यामुळे मोदी सरकारमधील मंत्र्यांनी तमिळमध्ये ट्विट केले होते. यात निर्मला सीतारमन आणि विदेशमंत्री एस. जयशंकर यांचा समावेश आहे. कस्तुरीरंजन कमिटीने तयार केलेल्या नवीन शैक्षणिक धोरणाचा मसुदा शुक्रवारी जाहीर करण्यात आला आहे."हिंदी ही राष्ट्रभाषा नाही. उगाच ती लादून आमची माथी भडकावू नका." - मनसे नेते अनिल शिदोरे#HindiImposition pic.twitter.com/wxja0RpCBT
— MNS Adhikrut (@mnsadhikrut) June 2, 2019
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
बातम्या
क्राईम
राजकारण
करमणूक
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)