Pune crime news : ओपन जीममध्ये व्यायाम करताना तरुणाचा मृत्यू; विजेचा शॉक लागून मृत्यू झाल्याचा कुटुंबियांचा आरोप, नेमकं प्रकरण काय?
विजेच्या तारांमधून रस्त्यावर करंट उतरल्यामुळे एका 23 वर्षीय तरुणाला झटका लागला आणि त्यात त्याचा जागीच मृत्यू झाला असा आरोप त्याच्या नातेवाईकांनी केला आहे.

Pune crime news : पुण्यातील कोथरूड भागात एका 23 (Pune Crime News) वर्षीय तरुणाचा संशयास्पद मृत्यू झाला. अमोल शंकर नाकते असे दुर्दैवी मृत्युमुखी पडलेल्या तरुणाचे नाव आहे. विजेच्या तारांमधून रस्त्यावर करंट उतरल्यामुळे 23 वर्षीय तरुणाला झटका लागला आणि त्यात त्याचा जागीच मृत्यू झाला असा आरोप त्याच्या नातेवाईकांनी केला आहे. पुण्यातील कोथरूड डेपोजवळ असलेल्या भुसारी कॉलनीमध्ये ही हृदयस्पर्शी घटना घडली.
पुणे शहरातील अनेक भागात ओपन जीम आहेत. म्हणजेच अनेक ठिकाणी नागरिक कुठलीही फी न भरता तिथे जाऊन उपलब्ध असलेल्या उपकरणांचा वापर करून व्यायाम करू शकतात. याच ओपन जीममध्ये व्यायाम करत असताना एका 23 वर्षीय तरुणाचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. अमोल नकाते असे या मृत तरुणाचे नाव आहे. मात्र त्याचा मृत्यू कसा झाला हे अद्याप स्पष्ट झालेले नाही. मात्र याच मैदानातून जमिनीखालून विजेचा प्रवाह सुरु होता. पाऊस पडल्याने जामीन ओली झाली होती आणि अचानक विजेचा प्रवाह रस्त्यावर उतरला आणि त्याठिकाणी उभा असलेल्या अमोलला झटका लागला आणि त्याचा मृत्यू झाला, असा आरोप अमोलच्या नातेवाईकांनी केला आहे.
अनिकेतचा मृत्यू विजेचा शॉक लागल्यामुळेच झाला, असा आरोप कुटुंब आणि मित्रांनी केला आहे. मात्र ससून रुग्णालयाने व्हीसेरा राखून ठेवला आहे. अमोल जेव्हा खाली कोसळला त्यावेळी त्याच्या पायाला छिद्र पडले होते आणि बोटं काळे निळे झाले होते. त्यामुळेच त्याचा मृत्यू शॉक लागून झाल्याचा संशय असून अमोल नकाते मृत्यूला जे जबाबदार असतील त्यांच्यावर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करावा अशी मागणी केली आहे. मात्र पोलिसांना अजून पोस्ट मॉर्टम रिपोर्ट न मिळाल्यामुळे गुन्हा दाखल केलेला नाही.
अमोलला वडील नाहीत, घरी आई एकटी आहे त्यामुळे त्यांच्या कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. ओपन जिम उभारताना सुरक्षेची काळजी का घेतली गेली नाही? तसेच महावितरणाच्या केबल कायद्याने बांधील नियमापेक्षा वरच्या भागात उच्च दाबाच्या वाहीन्या का टाकल्या गेल्या? पोलीस अजूनही का गुन्हा दाखल करत नाहीत अशा अनेक प्रश्नांची उत्तरे मिळवण्यासाठी अमोलचा भाऊ आणि इतर जण पाठपुरावा करत आहेत.
अमोलच्या मृत्यूला जबाबदार असणाऱ्या लोकांवर गुन्हा दाखल करा आणि आमच्या अमोलला न्याय द्या या मागणीसाठी अमोलचे नातेवाईक येत्या काही दिवसात आंदोलन देखील करणार आहेत. घरातील तरुणाचा आकस्मित मृत्यू होतो आणि अख्खं घर रस्त्यावर येतं याची अनेक उदाहरणं आतापर्यंत अनेक घटनांमधून समोर आली आहेत याचे आणखी एक उदाहरण पुण्यासारख्या शहरातून येणं म्हणजे अत्यंत दुर्दैवी आहे.
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
