(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Maharashtra Grampanchayat Result : उत्तर महाराष्ट्राचा ग्रामपंचायतीचा कौल कुणाला, पाहा जिल्ह्यांतील ग्रामपंचायत निकाल
Maharashtra Grampanchayat Result : उत्तर महाराष्ट्रातील जळगाव, नंदुरबार, धुळे, नगर आदी जिल्ह्यातील ग्रामपंचायत निवडणुकांचा निकाल घोषित झाला.
Maharashtra Grampanchayat Result : नाशिकसह उत्तर महाराष्ट्रातील जळगाव, नंदुरबार, धुळे, नगर आदी जिल्ह्यातील ग्रामपंचायत निवडणुकांचा निकाल घोषित झाला असून भाजपाची सरशी दिसून आली आहे. भाजपने उत्तर महाराष्ट्रातील सर्वाधिक 155 जागांवर विजय मिळवला आहे. त्याखालोखाल राष्ट्रवादीने 106 जागा जिंकत दुसरे स्थान पटकावले आहे. दरम्यान आज राज्यातील सात हजाराहून अधिक ग्रामपंचायतींचे निकाल जाहीर झाले. त्यामध्ये राष्ट्रवादीसह महाविकास आघाडीने सर्वाधिक जागांसह झेंडा फडकविला. त्याचबरोबर उत्तर महाराष्ट्रात देखील भाजप शिंदे गटाला महाविकास आघाडीने धुळ चारली आहे. मात्र भाजपएन सर्वाधिक जागांवर विजय संपादन केला आहे.
जळगाव 122 ग्रामपंचायत निकाल
जळगाव जिल्ह्यातील 122 ग्रामपंचायतीसाठी झालेल्या निवडणुकीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते एकनाथ खडसे, भाजपचे मंत्री गिरीश महाजन व शिंदे गटाचे मंत्री गुलाबराव पाटील या तिघा नेत्यांच्या प्रतिष्ठापनाला लागल्या होत्या. अखेर या निवडणुकांचे निकाल आज हाती आले आहे. या निवडणुकांमध्ये महाविकास आघाडीने वर्चस्व प्रस्थापित करत शिंदे व भाजप गटाला जोरदार टक्कर दिली आहे. निवडणुकीत मात्र महाविकास आघाडीला भाजप शिंदे गटाने हे जोरदार टक्कर दिल्याच पाहायला मिळालं. जळगाव जिल्ह्यात ग्रामपंचायत निवडणुकीमध्ये एकनाथ खडसे मंत्री गिरीश महाजन व शिंदे गटाचे मंत्री गुलाबराव पाटील यांच्या प्रतिष्ठापनाला लागल्या होत्या मात्र आपापल्या मतदारसंघात प्रतिष्ठा कायम राखण्यात या तिघाही नेत्यांना यश मिळाला आहे.
असा आहे निकाल
राष्ट्रवादी काँग्रेस 55, भाजप 33, शिंदे गट 16, काँग्रेस 10, उध्दव ठाकरे गट 4, इतर 04
अहमदनगर जिल्हा ग्रामपंचायत
नगर जिल्ह्यातील कर्जत - जामखेड तालुक्यात भाजप आमदार राम शिंदे यांनी प्रतिष्ठा राखली. तर राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवारांना धक्का बसला. दुसरीकडे श्रीगोंदा तालुक्यात साजन पाचपुते यांनी प्रतिष्ठा राखली तर माजी मंत्री भाजप आमदार बबनराव पाचपुते यांना धक्का बसला आहे. श्रीगोंदा तालुक्यातील बेलवंडी ग्रामपंचायतमध्ये सर्वात कमी वयाचा सरपंच म्हणून 24 वर्षीय ऋषिकेश अण्णासाहेब शेलार निवडून आला आहे. नगर तालुक्यातील जखणगाव ग्रामपंचायतमध्ये वार्ड क्र.2 मध्ये नोटाला सर्वाधिक म्हणजे 244 सर्वाधिक मते मिळाली. त्या खालोखाल सुनिल धिरवडे यांना मिळाली 114 मते....सुनिल धिरवडे यांना केले विजयी घोषित.
एकूण ग्रामपंचायत-87
निकाल जाहीर 85
बिनविरोध 2 (भाजप 1, राष्ट्रवादी 1)
भाजप-37, राष्ट्रवादी-38, काँग्रेस-1, ठाकरे-5, शिंदे-1 इतर-5
नंदुरबार जिल्हा ग्रामपंचायत
नंदुरबार जिल्ह्यातल्या 123 ग्रामपंयाचीचे निकाल जाहीर झाले असुन सर्वाधीक जागा मिळवत काँग्रेस अग्रस्थानी असली तरी तिला या निवडणुकामध्ये जोरदार फटका बसला आहे. नंदुरबार तालुक्यात काँग्रेसला खाते सुद्धा उघडता आले नाही. तर दुसरीकडे शिंदे गटाणे 32 ग्रामपंचायतींवर विजय संपादीत करत जिल्ह्यात जोरदार मुसंडी मारली आहे. विशेष म्हणजे जिल्ह्यात भाजपाचे पालकमंत्री खासदार आमदार असतांना देखील त्यांना हव तसे यश संपादीत करता आले नाही. भाजपा 32 जागांवर विजयी झाली असली तरी नंदुरबार तालुक्यासह, धडगाव आणि अक्कलकुवा आणि नवापुर या ठिकाणी त्यांना फटका बसला आहे. अक्कलकुवा तालुक्यात शिवसेना उद्धव गटाने बाजी मारली असुन जिल्ह्याभरात उद्धव गटाच्या 13 ग्रामपंचायती निवडुन आल्या आहेत. तर 10 ग्रामपंयाचतींनी तटस्थची भुमिका ठेवली आहे. राष्ट्रवादी देखील तीनच ग्रामपंचायतींमध्ये विजयी झाली आहे.
कुणी प्रतिष्ठा राखली कुणाला धक्का
धडगाव अक्कलकुवा तालुक्यात के.सी.पाडवी यांनी आपल वर्चस्व राखले आहे. तर भाजपला हवे तसे यश मिळाले नसल्याने भाजपा नेते आदिवासी विकास मंत्री विजयकुमार गावित यांना धक्का मानला जात आहे. जिल्ह्यात 123 पैकी 32 जागांवर भाजपाला विजय मिळवता आला आहे. शिंदे गटाने जिल्ह्यात जोरदार मुसंडी मारली असून नंदुरबार तालुक्यात 17 पैकी 10 जागा मिळवत भाजपाला धक्का दिला आहे. जिल्ह्यात त्यांनी 32 ग्रामपंचायती जिंकल्या आहेत.
धुळे जिल्हा ग्रामपंचायत
धुळे जिल्ह्यामध्ये 128 ग्रामपंचायतींपैकी दहा ग्रामपंचायती या बिनविरोध झाल्यानंतर 118 ग्रामपंचायतींसाठी मतदान प्रक्रिया पार पडलेली होती, आणि आज या 118 ग्रामपंचायतींचा निकाल हाती आला आहे. यामध्ये चारही तालुक्यांमध्ये स्थानिक आमदारांनी आपला गड कायम ठेवला आहे. धुळे तालुक्यात आमदार कुणाल पाटील यांनी काँग्रेसच वर्चस्व कायम ठेवल आहे. तर साक्री तालुक्यात शिंदे गट समर्थक अपक्ष आमदार मंजुळा गावित यांनी देखील आपला वर्चस्व साक्री तालुक्यात कायम ठेवले आहे. तर शिरपूर तालुक्यात सर्वच्या सर्व जागा भाजपने काबीज केल्या असून या ठिकाणी माजी मंत्री तथा आमदार अमरीश भाई पटेल यांनी आपलं वर्चस्व कायम ठेवले आहे, तर शिंदखेडा तालुक्यात देखील भाजपचे माजी मंत्री तथा आमदार जयकुमार रावल यांनी आपलं वर्चस्व कायम ठेवल आहे. सर्वच ठिकाणी स्थानिक आमदारांनी आपले वर्चस्व कायम ठेवले असले तरी एकंदरीत धुळे जिल्ह्यात शिंदे गट व भाजपचे वर्चस्व असल्याचे बघावयास मिळाले आहे.
एकूण 128 ग्रामपंचायतींचा निकाल
भाजप - 52, काॅग्रेस - 29, शिवसेना शिंदे गट - 31, शिवसेना ठाकरे गट - 07, राष्ट्रवादी - 03, आघाडी - 06