पाणीटंचाई... गावात पाणी नसल्याने 8 वीतला कृष्णा विहिरीवर पोहोचला, शाळकरी मुलाचा अचानक तोल गेला अन्...
विहीरीवर इतर लोक देखील पाणी भरण्यासाठी आले होते. कृष्णा खाली पडल्याचे लक्षात येताच दोरीच्या सहाय्याने त्याला लगेच बाहेर काढले

Thane: मुंबईसह ठाणे व भिवंडी महानगरपालिकेला पाणी पुरवठा करणाऱ्या शहापूर तालुक्यात भीषण पाणी टंचाईचा सामना गावकऱ्यांना करावा लागत असून, शाळा सुटल्यानंतर इयत्ता 8 वीत शिकणारा कृष्णा सन्या शिद हा 14 वर्षीय मुलगा गावात पाणी टंचाई असल्याने विहीरीवर गेला असता, पाणी भरत असताना त्याचा अचानक तोल गेल्याने तो विहिरीत पडला. ही भीषण वास्तव समोर आणणारी घटना शहापूर तालुक्यातील माळ ग्रामपंचायत हद्दीतील शिदपाडा येथील विहिरीत घडली असून, गेल्या काही वर्षांत या माळ ग्रामपंचायतीमध्ये पाण्यासाठी अनेक बळी गेल्याचं गावकरी सांगत आहेत. (Wter crisis)
विहिर कोरडी निघाली, दगडाचा मार लागल्याने मुलगा गंभीर जखमी
विशेष म्हणजे ही विहीर कोरडी असल्याने त्याला विहिरीतील दगडांचा मार लागल्याने तो गंभीर जखमी झाला. विहीरीवर इतर लोक देखील पाणी भरण्यासाठी आले होते. कृष्णा खाली पडल्याचे लक्षात येताच दोरीच्या सहाय्याने त्याला लगेच बाहेर काढले व उपचारासाठी शासकीय रुग्णालयाला रवाना केले. उपचारादरम्यान समोर आले की, त्याच्या डोक्याला व अंगाला मार लागला असून त्याच्यावर उपचार सुरू आहेत. ही घटना March 13 रोजी सायंकाळच्या सुमारास घडली असून, या घटनेचे व्हिडिओ व्हायरल झाल्याने तालुक्यात एकच खळबळ उडाली आहे.
दरम्यान, काही वर्षांपूर्वीच एक विद्यार्थीनी शाळा सुटल्यानंतर रात्रीच्या वेळी विहिरीवर आईसोबत गेली असता तिचा तोल जाऊन विहिरीत पडून मृत्यू झाला होता. अशा घटना नेहमीच या ग्रामपंचायतीत घडत असतात, मात्र शासन ठोस असा पर्याय करत नसल्याचे गावकरी सांगत आहेत.
दुसरीकडे, पाणीटंचाई भासू लागलेल्या शहापूर तालुक्यातील टंचाईच्या प्रत्यक्ष निवारणासाठी जिल्हाधिकाऱ्यांनी कृती आराखड्याला तत्वतः मंजुरी दिली असून 12 कोटी 66 लाख 60 हजार रुपये निधीच्या खर्चाची तरतूद टंचाईग्रस्त गाव पाड्यासाठी करण्यात आली आहे. 44 गावे व 73 पाड्यांमध्ये विंधन विहिरी घेण्यासाठी 1 कोटी 17 लाख रुपये आणि कूंडण गावाच्या धरणातील विहिरीच्या अधिग्रहणासाठी 6 लाख रुपये तरतूद करण्यात आली आहे.
पाणीटंचाईला सुरुवात, गाव पाड्यात टँकर सुरु झाले
शहापूर तालुक्यात January महिन्यात पाणीटंचाई सुरू झाल्यापासून टंचाई कृती आराखड्याच्या मंजुरीची पाणीटंचाईत होरपळणाऱ्या गावांना प्रतीक्षा असतानाच February महिन्यात आराखड्यातील निधीच्या खर्चाला मंजुरी मिळाल्याने आता June अखेरपर्यंत 344 गावे व पाड्यांमध्ये टँकरने पाणीपुरवठा सुरू होणार आहे. सध्याच्या स्थितीत गाव पाड्यात 15 टँकरने टंचाईग्रस्त गावांना पाणी पुरवठा February 28 पर्यंत सुरू असून, March महिन्यात आणखी काही गाव पाड्यात टँकरच्या मागणीप्रमाणे पाणी पुरवठा करण्यात येणार असल्याची माहिती शहापूर तालुका पाणी पुरवठा विभागाचे अधिकारी किशोर गायकवाड यांनी दिली आहे.
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज

