शिरसाट पदमुक्त होताच सिडकोचा 'दे धक्का'; 26,000 घरांच्या किंमती कमी होणार नाही, अर्जदारांची निराशा
सिडकोने जाहीर केलेल्या 'माझे पसंतीचे घर' या योजनेअंतर्गत 26 हजारे घरे विक्रीसाठी उपलब्ध करून देण्यात आली आहेत.
मुंबई : महानगरांमध्ये सर्वसामान्यांसाठी घरी उपलब्ध करुन देणारी संस्था म्हणून म्हाडा आणि सिडकोचा (Cidco) लौकिक आहे. मात्र, गेल्या काही वर्षात या संस्थांकडून देण्यात येणाऱ्या घरांच्या किंमतीही अव्वाच्या सव्वा असल्याचे पाहायला मिळत आहे. विशेषत: मुंबई, ठाण्यासह नवी मुंबईतील घरांच्या (Home) किंमती ह्या परवडणाऱ्या नसून बाजार भावाप्रमाणेच असल्याची ओरड अर्जदारांकडून करण्यात येत आहे. नुकतेच सिडकोने जाहीर केलेल्या 26000 घरांच्या किंमती जाहीर झाल्यानंतर अर्जदारांकडून संताप व्यक्त करण्यात आला होता. त्यानंतर, सिडको तत्कालीन अध्यक्ष संजय शिरसाट (Sanjay shirsat) यांनी सिडकोच्या घरांच्या किंमती कमी करण्यात येतील, असे म्हटले होते. मात्र, शिरसाट यांची सिडकोच्या अध्यक्षपदावरुन गच्छंती होताच सिकडोकडून घरांच्या किंमती कमी होणार नसल्याचे स्पष्ट करण्यात आलं आहे. त्यामुळे, येथील घरासाठी अर्ज केलेल्या अर्जदारांवर पुन्हा नाराजीची वेळ आलीय.
सिडकोने जाहीर केलेल्या 'माझे पसंतीचे घर' या योजनेअंतर्गत 26 हजारे घरे विक्रीसाठी उपलब्ध करून देण्यात आली आहेत. परंतु, या घरांच्या किमती सामान्ंयाच्या आवाक्याबाहेर असल्याने या किंमती कमी करण्याबाबत प्रयत्न करणार असल्याचे आश्वासन माजी सिडको अध्यक्ष संजय शिरसाट यांनी दिले होते. मात्र, सिडकोने जाहीर केलेले दर कमी करणार नसल्याचे संकेत सिडकोचे सह व्यवस्थापकीय संचालक शंतनू गोयल यांनी दिले आहेत. त्ययामुळे सिडकोच्या घरांचे स्वप्न पाहणाऱ्या सर्वसामान्यांचा भ्रमनिरास झालाय. सिडकोने घरांच्या किमती रेडीरेकनर नुसार ठरवल्या असून सिडको अत्याधुनिक सुविधा देत असल्याने घरांच्या किंमती योग्य असल्याचे स्पष्टीकरण सिडकोकडून देण्यात आलंय. त्यामुळे, सिकडोच्या घरांच्या किंमतीवरुन नाराज झालेल्या अर्जदारांची नाराजी ही त्यांच्याचजवळ ठेवावी लागणार आहे.
संजय शिरसाट अध्यक्षपदावर पदावरुन कार्यमुक्त
राज्याचे सामाजिक न्यायमंत्री संजय शिरसाट यांना सिडकोच्या (Cidco) अध्यक्ष पदावरून पदमुक्त करण्यात आले आहे. शहर व औद्योगिक विकास महामंडळाच्या अध्यक्षपदाचा शासन निर्णय काल जारी करण्यात आला. त्यामुळे, आता सिडकोचं अध्यक्षपद कुणाला मिळणार याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे. संजय शिरसाट यांचा कार्यभार संपुष्टात आणल्याचा शासन निर्णय नगरविकास विभागाकडून जारी करण्यात आलं आहे. सिडकोचं अध्यक्षपद एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेकडे राहणार की मित्रपक्षांकडे जाणार हे पाहावं लागेल. याशिवाय नवी मुंबईतील आमदारांनी देखील सिडकोच्या अध्यक्षपदासाठी लॉबिंग सुरु केल्याची माहिती आहे.
हेही वाचा
Rinku Singh and MP Priya Saroj: रिंकू सिंगची ड्रीमगर्ल प्रिया सरोज कोण? शाहरुखही करणार लग्नात डान्स