ज्येष्ठ साहित्यिक नरेंद्र लांजेवार यांचे निधन, साहित्य क्षेत्रावर शोककळा
Narendra Lanjewar passes away : बुलढाणा येथील भारत विद्यालयाचे ग्रंथपाल, साहित्यिक आणि अनेक साहित्यिकांना घडविणारे नरेंद्र लांजेवार यांचे निधन झाले आहे.

Narendra Lanjewar passes away : बुलढाणा जिल्ह्यातील भारत विद्यालयाचे ग्रंथपाल आणि ज्येष्ठ साहित्यिक नरेंद्र लांजेवार (Narendra Lanjewar) यांचे निधन झाले आहे. आज सकाळी 10 वाजता लद्धड रूग्णालयात त्यांनी अखेरचा श्वास घेतला. ते 53 वर्षांचे होते. गेल्या अनेक दिवसांपासून ते फुफ्फुसाच्या आजाराने त्रस्त होते. त्यांना व्हेंटीलेटरवर ठेवण्यात आले होते. मागील काही दिवसांत त्यांच्या प्रकृतीत सुधारणाही झाली होती. परंतु, काही दिवसांपूर्वी त्यांची प्रकृती खालावल्याने त्यांना रूग्णालयात दाखल करण्यात आले. परंतु, उपचार सुरू असताना आज त्यांची प्राणज्योत मालवली. त्यांच्या निधनाने राज्यभरातील साहित्य क्षेत्रात शोककळा पसरली आहे.
ज्येष्ठ साहित्यिक नरेंद्र लांजेवार यांनी मृत्यूनंतर देहदान करुन समाजासमोर एक आदर्श ठेवला आहे. नरेंद्र लांजेवार हे अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे सक्रिय सदस्य होते. याबरोबरच ते अंधश्रद्धा निर्मूलन वार्तापत्राचे संपादक मंडळातील सदस्यही होते. वार्तापत्रात त्यांनी अनेक विषयांवर लेखन केले आहे.
नरेंद्र लांजेवार यांच्या निधनाने महाराष्ट्राच्या साहित्य वर्तुळावरसह विदर्भ साहित्य संघ गावावर शोककळा पसरली आहे. त्यांच्या निधनाने साहित्य क्षेत्रातून हळहळ व्यक्त होत आहे. नरेंद्र लांजेवार यांनी फक्त साहित्य निर्माण केले नाही तर त्यांनी अनेक साहित्यिक घडवले आहेत. नरेंद्र लांजेवार हे विदर्भ साहित्य संघाचे गेल्या अनेक वर्षांपासून पदाधिकारी होते. नरेंद्र लांजेवार यांनी आकाशवाणीच्या जळगाव केंद्रावरून ‘उगवतीचे रंग’, ‘बालवाडी’, ‘पुस्तक परिचय’, ‘पालक-बालक’, ‘साल आणि उकल’, ‘पाऊलखुणा’अशा सदरांचे लेखन केले आहे. संपूर्ण महाराष्ट्रभर त्यांचा परिचय होता.
महत्वाच्या बातम्या :
- Maharashtra Covid-19 cases Live Updates : जाणून घ्या राज्यासह देशातील कोरोनाची आकडेवारी
- अण्णा हजारेंचा उपोषण न करण्याचा निर्णय, ग्रामपंचायतीचा ठराव अण्णांनी केला मान्य...
- राष्ट्रवादीत वाढलं कलाकारांचं इनकमिंग; अभिनेत्री आसावरी जोशी करणार राष्ट्रवादीत प्रवेश
LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह - ABP Majha
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
