
शेतकऱ्यांचं थकित वीजबिल ऊस बिलातून वसूल करण्याचे आदेश, साखर आयुक्तांचे साखर कारखान्यांना पत्र
शेतकऱ्यांचं थकित वीजबिल साखर कारखान्यांमार्फत वसूल करण्यात यावं अशी मागणी महावितरणनं केली होती.

मुंबई : शेतकऱ्यांचं थकित वीजबिल ऊस बिलातून वसूल करण्याचा आदेश देण्यात आला आहे. पाच जिल्ह्यातल्या साखर कारखान्यांना याबाबतचा आदेश साखर आयुक्त शेखर गायकवाड यांनी दिला आहे. या संदर्भात सर्व साखर कारखान्यांना पत्र पाठविण्यात आले आहे. महावितरणकडून करण्यात आलेल्या मागणीनंतर हा आदेश देण्यात आला आहे.
शेतकऱ्यांचं थकित वीजबिल साखर कारखान्यांमार्फत वसूल करण्यात यावं अशी मागणी महावितरणनं केली होती. त्याबाबत साखर आयुक्तांनी आज विज बिलाची थकित बाकी उसदरातुन वसुल करण्याबाबत साखर कारखान्यांच्या संचालकांची बैठक बोलावली होती. या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला आहे. या बैठकीत पश्चिम महाराष्ट्रातील पुणे, सातारा, सांगली, कोल्हापूर, सोलापूर पाच जिल्ह्यातील साखर कारखान्यांच्या संचालकासोबत शेतकऱ्यांकडून थकित वीज बिल उसाच्या बिलातून वसूल करण्याबाबत चर्चा झाली. साखर कारखान्यांच्या संचालकांनी याबाबत शेतकऱ्यांशी बोलुन कळवतो नमस्कार असे उत्तर या बैठकीत दिले. महावितरणकडून थकित वीज बिल वसूल करण्यासाठी साखर आयुक्तांना आदेश काढण्याची विनंती करण्यात आली होती. मात्र या बैठकीत साखर कारखान्यांच्या संचालकांकडून कोणतेही ठोस आश्वासन याबाबत देण्यात आले नाही.
साखर उद्योगाला मोठा दिलासा, कारखाने प्राप्तिकरातून मुक्त; केंद्र सरकारकडून कायद्यात दुरुस्ती
वीजबिलांच्या प्रचंड थकबाकीमुळे महावितरण कंपनी सध्या आर्थिक संकटात आहे. राज्यात सर्वाधिक थकबाकी कृषिपंपधारक शेतकऱ्यांकडे आहे. हे ग्राहक वीजबिल भरतच नसल्याची ओरड सातत्याने केली जाते. राज्यात महावितरणच्या थकबाकीचा डोंगर सध्या खूप मोठा झाला आहे. ही अभूतपूर्व थकबाकी वसूल करण्याचे मोठे आवाहन महावितरणपुढे होते. गेल्या आठवड्यात झालेल्या बैठकीत दहा एचपी आणि त्यावरील शेतीपंपाचे ग्राहक, पाच लाख रुपये थकबाकी आणि त्यावरील थकबाकी असणाऱ्या ग्राहकांविरोधात विशेष मोहिम राबविण्याची सूचना देण्यात आली होती.
लॉकडाऊनकाळात वीज ग्राहकांना वाढीव बिलांचा शॉक बसला. आधीच अनेकांचे रोजगार गेले, त्यात वाढीव वीजबिले आल्याने सर्वसामांन्यांचे कंबरडे मोडले.ल वीजबिल भरण्यासाठी महावितरणने अनेक अनोखे फंडे वापरले होते.
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
