Jitendra Awhad : ज्यांना पवारसाहेबांनी सर्व काही दिलं, तेच त्यांचे पाय कापण्याचा प्रयत्न करताहेत; जितेंद्र आव्हाडांची अजित पवार गटावर टीका
Jitendra Awhad On Ajit Pawar : शिवसेना आणि राष्ट्रवादीची केस वेगळी नाही, पटकथा, दिग्दर्शक, निर्माते एकच आहेत. बदलले आहे ते फक्त कलाकार असा टोला आमदार जितेंद्र आव्हाड यांनी भाजपवर केला आहे.
मुंबई: शरद पवारांच मतपरिवर्तन करण्याची भाषा ते करतात, त्यांना असे वागण्याचा नैतिक अधिकार आहे का? एका आई वडिलांना सोडून दुसऱ्याकडे जाणारे शरद पवार (Sharad Pawar) नाहीत असं म्हणत राष्ट्रवादीचे आमदार जितेंद्र आव्हाड (Jitendra Awhad) यांनी अजित पवार गटावर (Ajit Pawar) टीका केली आहे. ज्यांना पवार साहेबांनी सगळं दिलं तेच आज त्यांचे पाय कापायला बघताहेत असंही ते म्हणाले. शरद पवार साहेबांनी एबी फॉर्म दिल्यानंतर, शरद पवार प्रचाराला आल्यानंतर आमदार निवडून येतात असं जितेंद्र आव्हाड म्हणाले.
शिवसेनेची केस वेळगी आहे आणि राष्ट्रवादीची केस वेळगी आहे, एकमेकांचा काही संबंध नसल्याचं अजित पवार गटाचे खासदार प्रफुल्ल पटेल यांनी सांगितलं होतं. त्यावर प्रतिक्रिया देताना आव्हाड म्हणाले की, ते म्हणतात शिवसेनेचं आणि आमचं प्रकरण वेगळ आहे. पण पटकथा, दिग्दर्शक, निर्माते एकच आहेत. बदलले आहे ते फक्त कलाकार. शिवसेना आणि राष्ट्रवादी या दोन्ही पक्षांची वैधानिक बाजू सारखीच आहे. शिवसेनेच्या निकालात देखील म्हणूनच व्हिप ठाकरे गटाच्या अजय चौधरी यांना मान्यता मिळाली आहे.
Jitendra Awhad On BJP : चंद्रशेखर बावनकुळे यांच्यावर टीका
पत्रकारांना कणा नाही असं समजणारी लोक सध्या राजकारणात आहेत असं म्हणते जितेंद्र आव्हाडांनी भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्यावर टीका केली. ते म्हणाले की, भारतातल्या शोध पत्रकारांनी नेहरूंना सोडलं नव्हतं. अनेक वेळा त्यांनी पत्रकारितेच्या माध्यमातून सरकारांना जेरीस आणल आहे. आता परिस्थिती वेगळी आहे. त्रिपुरात एका पत्रकाराला दोन वर्षे जेलमध्ये डांबण्यात आलं. गुजरातमध्ये देखील एकाला सहा महिने डांबण्यात आले. बावनकुळेंनी आज पत्रकारांवर भाष्य केलं. एवढे लाचार पत्रकार महाराष्ट्रात नक्कीच नाहीत. भाजपने आणि बावकुळेंनी सगळ्या पत्रकारांची माफी मागावी.
शरद पवार साहेबांनी एबी फॉर्म दिल्यानंतर, शरद पवार प्रचाराला आल्यानंतर आमदार निवडून येतात असं जितेंद्र आव्हाडांनी सांगितलं. ते म्हणाले की, या पक्षाचे जन्मदाता शरद पवार आहेत.
शरद पवार गटातील 10 आमदारांच्या विरोधात याचिका
अजित पवार गटाच्या वतीने गुरुवारी विधिमंडळात शरद पवार गटातील दहा विधानसभेच्या आमदारांविरोधात आणि विधानपरिषदेच्या दोन आमदारांच्या विरोधात अपात्रतेची कारवाई करणारी मागणी करणारी याचिका दाखल करण्यात आली. पक्ष विरोधी कृती केल्यामुळे सदर आमदारांवर कारवाई करावी अशी मागणी अजित पवार गटाच्या वतीने करण्यात आली आहे.
ही बातमी वाचा: