स्मार्ट बुलेटिन | 12 मार्च 2021 | शुक्रवार | एबीपी माझा
महत्वाच्या दहा बातम्यांचा आढावा या स्मार्ट बुलेटिनच्या माध्यमातून घेतला जातो. दररोज सकाळी हे बुलेटिन प्रसारित केलं जातं.

1. संजय राठोडच्या जागी मला मंत्री करा! हरिभाऊ राठोड यांचं मुख्यमंत्र्यांना पत्र, उद्धव ठाकरेंना मुख्यमंत्री करण्यासाठी आपण मोठा त्याग केला असल्याचा पत्रात उल्लेख
2. आज एमपीएससीच्या परीक्षेची तारीख जाहीर होणार, परीक्षा आठवड्याभरात होणार असल्याची मुख्यमंत्र्यांची माहिती
3. दहावी आणि बारावी बोर्डाची परीक्षा ऑफलाइन व वेळापत्रकानुसारच घेण्यावर शिक्षण विभाग ठाम, शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांची माहिती
4. नव्या IT नियमांमुळे डिजिटल प्रकाशकांवर जबाबदाऱ्या, चर्चेदरम्यान मंत्री प्रकाश जावडेकर यांचं वक्तव्य
5. बारावीला गणित, फिजिक्स, केमिस्ट्री हे विषय नसले तरीही इंजिनिअर होणं शक्य, ऑल इंडिया काऊन्सिल फॉर टेक्निकल एज्युकेशनकडून नवं धोरण जाहीर
6. राज्यात मुंबईच्या वांद्रे परिसरातील जॉगर्स पार्क येथे पहिल्यांदा आढळला मोनोलिथ, यामागे काय अर्थ दडलाय याचा शोध सुरु
7. सांगलीच्या करंजे येथे मळणी यंत्रात पदर अडकल्याने 50 वर्षीय सुभद्रा मदने यांचा मृत्यू
8. पोलिसांनी पाच हजार रुपये प्रवेश शुल्क मागितल्याने टेम्पो चालकाचा पोलीस ठाण्यातच गळफास घेण्याचा प्रयत्न, उस्मानाबादच्या येरमाळा येथील धक्कादायक घटना
9. हिंगोली जिल्ह्यातील बहुचर्चित अहिल्यादेवी होळकर पुतळ्याचे अखेर अनावरण, मोजक्याच लोकांच्या उपस्थितीत लोकार्पण सोहळा
10. आज मोटेराच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर भारत आणि इंग्लंडच्या दरम्यान पहिला टी 20 सामना, संध्याकाळी सात वाजता होणार सामन्याला सुरुवात
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
