Manoj Jarange Patil: मेहुण्याला तडीपारीची नोटीस मिळताच मनोज जरांगेंची देवेंद्र फडणवीसांवर आगपाखड, म्हणाले...
Manoj Jarange Patil: देवेंद्र फडणवीस यांच्याकडे धनंजय मुंडेसारखी टोळी आहे. माझं तोंड बंद करण्यासाठी त्यांनी षडयंत्र रचले असावे, मनोज जरांगे पाटील यांचा गंभीर आरोप

जालना: मराठा आंदोलक मनोज जरांगे यांचे मेहुणे यांचा मेहुणा विलास खेडकर (Vilas Khedkar) याच्यावर जालना पोलिसांकडून तडीपारीची कारवाई करण्यात आली होती. याबाबत बोलताना मनोज जरांगे पाटील यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांना लक्ष्य केले. एकीकडून सुरेश धस आणि देवेंद्र फडणवीस सांगतात की, आम्ही मराठा आंदोलकांच्या केसेस मागे घेणार आहोत आणि दुसरीकडे मराठा आंदोलकांना नोटीस दिल्या जात आहेत. तुमचा दुसरा काही विषय असेल तर आम्हाला घेणंदेणं नाही, आपली भूमिका कायम आहे, असे मनोज जरांगे (Manoj Jarange Patil) यांनी ठणकावून सांगितले. ते रविवारी जालना येथे प्रसारमाध्यमांशी बोलत होते.
आमच्या सरळ स्वभावाचा फायदा तुम्ही उचलायचा नाही. तुम्ही अंतरवालीतील आंदोलकांना जर नोटीस देणार असाल, तुम्ही त्यांच्या पाठीमागे असे लागणार असेल तर मी सोडणार नाही फडणवीस साहेब. तुम्ही जर मराठ्यांना वेठीस धरायचं काम केलं तर, तुमचा कार्यक्रम लावायला मला वेळ लागणार नाही. प्रामाणिक आंदोलकांना तुम्ही विकत घेऊ शकत नाही. त्यांच्यावर तुम्ही प्रेशर आणू शकत नाही. आमची अशी इच्छा होती की, मराठ्यांनी सांगावं आणि फडणवीस यांनी करावं, अशी आमची भोळीभाबडी इच्छा होती. बेमानी आणि गद्दारी हा शब्दाचा शिक्का तुझ्यावर पडू देऊ नको, आम्ही भोळे लोक आहोत, त्यामुळे सर्व हाताने मदत केली. तू रंडकुंडीला आला होता, तुला ही गादी कधीच मिळू शकत नव्हती. या राज्यात मराठ्यांशिवाय पान हालू शकत नाही. तुझा भागलं म्हणून जर तू उलटणार असला, हे तुझ्यासाठी घातक असणार आहे, देवेंद्र फडणवीसांनी चूक सुधारावी, त्यांनी दिलेल्या नोटीसा मागे घ्याव्यात. आम्ही देवेंद्र फडणवीसला सन्मानाची वागणूक द्यायला तयार आहोत. नाहीतर पुढच्या काळात सन्मान हा शब्द डोक्यातून काढून टाकायचा, असा थेट इशारा मनोज जरांगे पाटील यांनी दिला.
पोलिसांकडून मनोज जरांगे यांच्या मेहुण्यासह नऊ वाळू माफिया आणि अटल गुन्हेगारांवर तडीपारीची कारवाई करण्यात आली होती. याबाबत बोलताना जरांगे यांनी म्हटले की, आपण स्पष्ट सांगितलयं तुमचं बाकीचं काय माहिती नाही, आपण त्यात पडतही नाही. पण मराठा आंदोलक म्हणून जर तुम्ही त्यांना नोटीसा देणार असला, हे तुमच्यासाठी घातक आहे. बाकीचं तुमचं काही असेल तर मला देणंघेणं नाही. तुम्ही आंदोलक म्हणून त्यांना नोटीस दिल्यात हे ध्यानात ठेवा, असे जरांगे पाटील यांनी म्हटले.
मराठा समाजासाठी मी आई-बापाला कुटुंबालाही जवळ केलं नाही: मनोज जरांगे पाटील
सरकारने माझं तोंड बंद करण्यासाठी मुद्दाम माझ्या पाहुण्यारावळ्याचं नाव तडीपारीच्या यादीत घुसवले असावे. हे 100 टक्के देवेंद्र फडणवीसांचं षडयंत्र आहे. देवेंद्र फडणवीसला माहीत नाही की, मी समाजापुढे आई-बापाला सुद्धा जवळ केलं नाही. समाजासाठी आई बापाला सुद्धा दूर केले तर पाहुणेरावळ्याला जवळसुद्धा उभा राहू देणार नाही. महाराष्ट्रातील सहा कोटी मराठे माझे पाहुणे आहेत. ही देवेंद्र फडणवीसांची नवी चाणक्यनीती आहे का? तुम्हाला ही सत्ता मराठ्यांनी दिली आहे. त्यामुळे सांभाळून राहा, अशा इशारा मनोज जरांगे यांनी दिला.
माझ्यासाठी कुटुंब महत्वाचं नाही. मी कुटुंब खाली उतरवलं अंतरवालीच्या व्यासपीठावरून. आई बापाला सरळ सांगितलं पोरग घरी आल्यावर, मग काय वाघोलीचे माझे पाहुणे आहेत का? अमरावतीच्या महिला तडीपार केलेल्या, मी जोपर्यंत आंदोलनात आहे तोपर्यंत मराठा म्हणून आहे. चुकीचं काम केलं तर माझ्या बापावर जरी केस झाली तरी सोडणार नाही. पाहुण्यांचा तर विषय संपला, असेही मनोज जरांगे पाटील यांनी म्हटले.
आणखी वाचा
मनोज जरांगेंचा मेहुणा विलास खेडकरसह 9 जणांवर तडीपारीची कारवाई; जालन्यात प्रशासन अॅक्शन मोडवर
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज

