जालन्यातील सराफा बाजारात खळबळ! चक्क भिंत तोडून साडेआठ लाखांचा मुद्देमाल चोरीला
Jalna Crime News: माहिती मिळताच पोलिसांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेऊन एका आरोपीला बेड्या ठोकल्या आहेत.
Jalna Crime News: काही दिवसांपूर्वी जालना शहरातील एका प्रसिद्ध कापड दुकानात चोरी झाल्याची घटना ताजी असतानाच, आता जालना जिल्ह्यातील अंबड तालुक्यातील सराफा बाजारमध्ये ज्वेलर्सचे दुकान फोडून सोन्या (Gold),चांदीच्या (Silver) दागिन्यासह साडेआठ लाखांचा मुद्देमाल घेऊन चोरांनी पळ काढला आहे. धक्कादायक म्हणजे दुकानात प्रवेश करण्यासाठी चोरट्यांनी थेट दुकानाची भिंतच तोडली असल्याचे समोर आले आहे. मात्र याची माहिती मिळताच पोलिसांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेऊन एका आरोपीला बेड्या ठोकल्या आहेत. मोहमद युसुफ अली ह्यात (रा. झारखंड) असे या चोरट्याचे नाव असून ताच्याविरोधात अंबड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, जालना जिल्ह्यातील अंबड तालुक्यातील सराफा बाजारमध्ये औदुंबर बागडे (वय 36 वर्ष, रा. नुतन वसाहत अंबड ता. अंबड जि. जालना) यांची ज्वेलर्सची दुकान आहे. दरम्यान आज 9 जानेवारी रोजी पहाटे साडेतीन वाजता पाच चोरट्यांनी बागडे यांच्या दुकानाच्या मागच्या बाजूला भिंतीस होल करून दुकानात प्रवेश केला. त्यानंतर या चोरट्यांनी ताब्यातील दोन मोठे गॅस कटर व एक लहान गँस सिलेन्डर, लोखंडी रॉड, दोन लोखंडी गिरमिट, कानस व इतर साहित्याच्या मदतीने दुकानाच्या पाठीमागील लोखंडी दरवाजा गॅस कटरने कापला. आत प्रवेश केल्यावर दुकानातील दोन लहाण लोखंडी तिजोरी गॅस कटरने कापले. तसेच कपाटातील सोन्या-चांदी दागिने लंपास केले.
पोलिसांनी धाव घेत एकाला पकडले...
अंबड सराफा बाजारातील एका ज्वेलर्सच्या दुकानात चोरट्यांनी डल्ला मारला असल्याची माहिती मिळताच अंबड पोलिसांनी घटनास्थळी तत्काळ धाव घेतली. यावेळी पोलिस अलर्ट होत त्यांनी परिसरात चोरट्यांचा शोध सुरु केला असता, मोहमद युसुफ अली ह्यात (रा. झारखंड) हा पोलिसांच्या हाती लागला. पोलिसांनी त्याला ताब्यात घेतले असून, इतर चार आरोपी मात्र फरार झाले आहेत. त्यामुळे पोलिसांनी औदुंबर बागडे यांच्या तक्रारीवरून अंबड पोलिसात चोरीचा गुन्हा दाखल केला आहे. तर इतर आरोपींचा पोलीस शोध घेत आहे.
चोरी गेलेला मुद्देमाल...
42 ग्राम सोन्याचे 7 झुंबर चोरीला गेले असून ज्याची एकूण किंमत 2 लाख 10 हजार
21 ग्राम सोन्याचे 10 फँन्सी टॉप जोड ज्याची एकूण किंमत 10 लाख 5 हजार
15 ग्राम सोन्याचे 5 नग सोण्याचे लहान मुलाचे लॉकेट ज्याची एकूण किंमत 75 हजार
21 ग्राम सोन्याचे 15 नग सोण्याचे पेंडॉल ज्याची एकूण किंमत 10 लाख 5 हजार
3500 ग्राम चांदिचे चैन ज्याची एकूण किंमत 1 लाख 75 हजार
600 ग्राम चांदिचे जोडवे ज्याची एकूण किंमत 40 हजार 200
410 ग्राम चांदिचे कडे ज्याची एकूण किंमत 27 हजार 470
18 ग्राम सोन्याचे चार चैन ज्याची एकूण किंमत 90 हजार