एक्स्प्लोर

सरकारला गुडघे टेकायला भाग पाडणार, हमीभावाच्या मुद्यावरुन राजू शेट्टी आक्रमक, देशातील 250 शेतकरी संघटना करणार आंदोलन

250 हून अधिक शेतकरी संघटनांची दिल्लीत बैठक पार पडली. या बैठकीत हमीभावाच्या मुद्यावरुन स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे प्रमुख राजू शेट्टींनी सरकारला इशारा दिलाय. हमीभावाचा कायदा करण्याची मागणी केलीय. 

Raju Shetti : देशातील 250 हून अधिक शेतकरी संघटना (Shetkari Sanghtna) एमएसपी (MSP) गॅरंटी किसान मोर्चेच्या (Kisan Morcha) माध्यमातून किमान हमीभाव व संपुर्ण कर्जमुक्तीसाठी निर्णायक आंदोलन करून केंद्र सरकारला (Central Govt) गुडघे टेकायला भाग पाडणार असल्याचा इशारा स्वाभिनानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी (Raju Shetti) यांनी दिलाय. 25 राज्यातून आलेल्या 250 हून अधिक शेतकरी संघटनांची दिल्लीत बैठक पार पडली. यावेळी राजू शेट्टींनी इशारा दिला. 

किमान हमीभावाच्या कायद्यासाठी केंद्र सरकार दुर्लक्ष 

दिल्ली येथील रकाबगंज गुरूव्दार येथे केंद्र सरकारने किमान हमीभावाचा कायदा पारित करावा या मागणीसाठी पुन्हा एकदा देशभरातील शेतकरी संघटनांनी एल्गार पुकारला आहे. भारत देश हा कृषीप्रधान आहे. मात्र, देशातील शेतकऱ्यांची अवस्था दयनीय झालेली आहे. केंद्र सरकारच्या चुकीच्या धोरणामुळं दिवसेंदिवस शेतकरी आत्महत्या वाढू लागल्या आहेत. 2011 मध्ये तत्कालीन पंतप्रधान मनमोहन सिंग यांनी नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली हमीभावाच्या अभ्यासासाठी समिती गठीत केलेली होती. त्यावेळेस नरेंद्र मोदी यांच्या समितीने हमीभावाचा कायदा पारित करण्याची मागणी केंद्र सरकारकडे केली होती. आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे सरकार 11 वर्षापासून सत्तेत असताना किमान हमीभावाच्या कायद्यासाठी केंद्र सरकार दुर्लक्ष करू लागले आहे. आज देशभरातील शेतकरी हमीभावापेक्षा कमी दराने सोयाबीन , कापूस , हरभरा , तूर , मक्का,भात विकू लागला आहे यामुळे देशातील शेतकरी सर्वाधिक कर्जबाजारी झाला आहे. यावर्षी केंद्र सरकारचे कोणतेही नियंत्रण राहिले नसल्याचे शेट्टी म्हणाले.

सोयाबीनचा हमीभाव 4900 रूपये पण शेतकऱ्यांना मिळतायेत 3300 ते 3500 रुपये

आज देशामध्ये सोयाबीनचा किमान हमीभाव 4900 रूपये असताना सोयाबीनचा आजचा दर 3300 ते 3500 रुपये झाला आहे. म्हणजेच जवळपास क्विंटलला 1400 ते 1600 रूपयांचे नुकसान होवू लागले आहे. यंदाच्या वर्षी देशात 130 लाख टनापेक्षा जास्त सोयाबीनचे उत्पादन होणार आहे. जर शेतकऱ्यांना प्रतिक्विंटल 1000 ते 1300 रुपयाचा फटका बसू लागला तर एका हंगामात सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांचे 2 लाख 08 हजार कोटी रूपयाचे नुकसान होणार आहे. केंद्र सरकारने शाश्वत किमान हमीभावाचा कायदा पारित केला असता तर देशभरातील लाखो सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना लाभ झाला असता असे शेट्टी म्हणाले. 

हमीभावाचा कायदा आल्यास शेती अर्थव्यवस्था मजबूत होईल

केंद्र सरकार उद्योगपती धार्जिणे आयात निर्यातीचे धोरणे राबवत असल्याने याचा फटका शेतकऱ्यांना बसू लागला आहे. केंद्र सरकारनं हमीभावाचा कायदा मंजूर केल्यास शेतकऱ्यांना शाश्वत हमीभाव मिळू लागल्यास देशातील शेती अर्थव्यवस्था मजबूत होईल. अन्यथा गहू , साखर , तांदूळ निर्यात करणा-या  देशाला आता गहू आयात करण्याची वेळ आल्याने हेच शेतीविषयक धोरणांचे केंद्र सरकारचे अपयश आहे. यावेळी एम. एस. पी गॅरंटी किसान मोर्चाचे वतीने प्रधानमंत्री नरेंद्र मोदी व विरोधी पक्षनेता राहूल गांधी यांना हमीभावाच्या कायद्याबाबत पत्रव्यवहार करण्यात आला. या बैठकीस समन्वयक सरदार व्ही.एम. सिंग , राजाराम त्रिपाठी , चंद्रशेखर कुडेहाळी ,आमदार यावर मीर , दयानंद पाटील , यांचेसह देशभरातील विविध शेतकरी संघटनांचे पदाधिकारी या बैठकीस ऊपस्थित होते.

महत्वाच्या बातम्या:

आताचे राजकारणी धंदेवाले, सत्ताधाऱ्यांची दुकानं बंद करण्यासाठी तिसऱ्या आघाडीचा प्रयोग करतोय : राजू शेट्टी

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

पगारवाढ 2020 नाही, तर 2024 पासून मिळणार, एसटी कामगारांना फसवलं; श्रीरंग बरगेंकडून संताप
पगारवाढ 2020 नाही, तर 2024 पासून मिळणार, एसटी कामगारांना फसवलं; श्रीरंग बरगेंकडून संताप
निरोप कॉम्रेड...  कामगार, शेतकऱ्यांचा आवाज हरपला; येचुरींच्या निधनानंतर शरद पवार, राहुल गांधींकडून शोक
निरोप कॉम्रेड... कामगार, शेतकऱ्यांचा आवाज हरपला; येचुरींच्या निधनानंतर शरद पवार, राहुल गांधींकडून शोक
Raosaheb Danve: ''राहुल गांधी भ्रमिष्ट, त्यांना समजत नाही कुठे काय बोलायचं'', रावसाहेब दानवेंची कडवी टीका, 40 जागांच्या मतभेदावर म्हणाले..
''राहुल गांधी भ्रमिष्ट, त्यांना समजत नाही कुठे काय बोलायचं'', रावसाहेब दानवेंची कडवी टीका, 40 जागांच्या मतभेदावर म्हणाले..
दोन महिन्यांनी लाडकी बहीण योजनेच्या 1500 रुपयांचे तीन हजार होणार; राऊतांची घोषणा
दोन महिन्यांनी लाडकी बहीण योजनेच्या 1500 रुपयांचे तीन हजार होणार; राऊतांची घोषणा
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

TOP 25 News : सुपरफास्ट बातम्यांचा वेगवान आढावा : 12 Sep 2024 : ABP MajhaMumbai : शिंदे आणि फडणवीसांच्या हस्ते कोस्टल रोड आणि सी-लिंकला जोडणाऱ्या पुलाचं लोकार्पणABP Majha Headlines : 5.00 PM : 12 Sep 2024 : Maharashtra News :  एबीपी माझा हेडलाईन्सPune :राष्ट्रीय हरित लवादाने दिलेल्या निर्णयाला सर्वोच्च न्यायालयाची स्थगिती

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
पगारवाढ 2020 नाही, तर 2024 पासून मिळणार, एसटी कामगारांना फसवलं; श्रीरंग बरगेंकडून संताप
पगारवाढ 2020 नाही, तर 2024 पासून मिळणार, एसटी कामगारांना फसवलं; श्रीरंग बरगेंकडून संताप
निरोप कॉम्रेड...  कामगार, शेतकऱ्यांचा आवाज हरपला; येचुरींच्या निधनानंतर शरद पवार, राहुल गांधींकडून शोक
निरोप कॉम्रेड... कामगार, शेतकऱ्यांचा आवाज हरपला; येचुरींच्या निधनानंतर शरद पवार, राहुल गांधींकडून शोक
Raosaheb Danve: ''राहुल गांधी भ्रमिष्ट, त्यांना समजत नाही कुठे काय बोलायचं'', रावसाहेब दानवेंची कडवी टीका, 40 जागांच्या मतभेदावर म्हणाले..
''राहुल गांधी भ्रमिष्ट, त्यांना समजत नाही कुठे काय बोलायचं'', रावसाहेब दानवेंची कडवी टीका, 40 जागांच्या मतभेदावर म्हणाले..
दोन महिन्यांनी लाडकी बहीण योजनेच्या 1500 रुपयांचे तीन हजार होणार; राऊतांची घोषणा
दोन महिन्यांनी लाडकी बहीण योजनेच्या 1500 रुपयांचे तीन हजार होणार; राऊतांची घोषणा
मृत्यूनंतरही यातना संपेना... महिलेचा मृतदेह पंधरा दिवसांपासून अंत्यसंस्काराच्या प्रतीक्षेत
मृत्यूनंतरही यातना संपेना... महिलेचा मृतदेह पंधरा दिवसांपासून अंत्यसंस्काराच्या प्रतीक्षेत
Eknath Khadse : एकनाथ खडसेंना आता शरद पवारांच्या राष्ट्रवादीतूनच आव्हान, माजी मंत्र्यांनी खडसावलं; म्हणाले, त्यांनी आपली...
एकनाथ खडसेंना आता शरद पवारांच्या राष्ट्रवादीतूनच आव्हान, माजी मंत्र्यांनी खडसावलं; म्हणाले, त्यांनी आपली...
Ambadas Danve:विधानसभेत मुस्लिम उमेदवार देणार का? अंबादास दानवे म्हणाले, 'शिवसेनेला हिंदुत्वासाठी कोणाच्याही सर्टिफिकेटची गरज नाही..'
विधानसभेत मुस्लिम उमेदवार देणार का? अंबादास दानवे म्हणाले, 'शिवसेनेला हिंदुत्वासाठी कोणाच्याही सर्टिफिकेटची गरज नाही..'
Manoj Jarange: देवेंद्र फडणवीसांच्या जीवावर मस्ती आली ना; राऊतांच्या आंदोलनावर जरांगेंचा पलटवार
Video: देवेंद्र फडणवीसांच्या जीवावर मस्ती आली ना; राऊतांच्या आंदोलनावर जरांगेंचा पलटवार
Embed widget