Bharatpur: दारू मागायला आलेल्या तरुणाला दुकानदाराने दिले अॅसिड, तब्येत बिघडली आणि मृत्यूने गाठले
Bharatpur Crime News: भरतपूरमध्ये एका व्यापाऱ्याने तरुणाला दारूऐवजी अॅसिडची बाटली दिली. दारू आहे असे समजून तरुणाने ते प्यायले, त्यानंतर त्याची तब्येत बिघडू लागली आणि त्याचा मृत्यू झाला.
Bharatpur Crime News: दारु मागायला गेलेल्या तरुणाला दुकानदाराने दारू समजून अॅसिड दिले आणि ते प्यायल्याने त्या तरुणाचा मृत्यू झाला. तब्येत बिघडल्याने त्या तरुणाला उपचारासाठी दवाखान्यात दाखल केलं होते, त्यावेळी त्याचा मृत्यू झाला. राजस्थानमधील सिकरी या ठिकाणी ही घटना घडली असून पोलिसांनी या प्रकरणी गुन्हा दाखल केला आहे.
राजस्थानमधील भरतपूर जिल्ह्यातील सिकरी पोलीस स्टेशन हद्दीतील गुलपाडा गावात हे प्रकरण समोर आले आहे. अनेक दिवस रुग्णालयात उपचार घेतल्यानंतर या तरुणाचा मृत्यू झाला. मृत्यूपूर्वी तरुणाने पोलिसांना ही हकीकत सांगितली.इर्शाद असे मृत तरुणाचे नाव असून त्यांचे वय 31 वर्षे होते.
या तरुणाने पोलिसांना दिलेल्या साक्षीत म्हटले आहे की, '1 मे रोजी गावात लग्नसमारंभ होता, त्यावेळी मला दारू प्यायचं होतं. त्यामुळे गावातच सत्तू सरदार नावाच्या दारू विक्रेत्याकडे गेलो. सत्तू सरदारने मला दारूऐवजी अॅसिड प्यायला लावले. ते प्यायल्यानंतर माझी तब्येत बिघडू लागली.
इर्शादची प्रकृती खालावल्याने कुटुंबीयांनी इर्शादला सरकारी रुग्णालयात नेले, मात्र त्याची प्रकृती गंभीर झाल्याने डॉक्टरांनी त्याला दुसऱ्या रुग्णालयात न्यायचा सल्ला दिला. इर्शाद यांच्यावर काही दिवस अल्वरमध्ये उपचार करण्यात आले. मात्र त्यांना अलवरहून जयपूरला पाठवण्यात आले. 10 मेपर्यंत इर्शादवर जयपूरमध्ये उपचार करण्यात आले आणि त्यानंतर त्याला गावात आणण्यात आले.
इर्शादची प्रकृती पुन्हा ढासळू लागल्याने इर्शादच्या नातेवाईकांनी त्याला जिल्हा आरबीएम रुग्णालयात नेले. दरम्यान, इर्शादला दारूऐवजी अॅसिड पाजले, त्यामुळे त्याची प्रकृती खालावली असे नातेवाइकांनी पोलिसांना सांगितले. त्यावर पोलिसांनी रुग्णालयात जाऊन पीडित इर्शादचा जबाब नोंदवला.
मृत इर्शादचे वडील मेहबूब यांनी सांगितले की, सत्तू सरदार नावाचा व्यक्ती आमच्या गावात अवैध दारू विकतो. गावात लग्नाचा कार्यक्रम असून इर्शाद हा सत्तूच्या घरी दारू घेण्यासाठी गेला असता तेथे त्याला अॅसिड पाजण्यात आले.
मृत्यूपूर्वी पोलिसांना दिलेला फॉर्म स्टेटमेंट
पोलिसांना दिलेल्या जबानीत इर्शादने म्हटले होते की, सत्तू सरदार नावाचा व्यक्ती आमच्या गावात अवैध दारू विकतो. गावात लग्नाचा कार्यक्रम होता आणि मी दारू प्राशन केली होती, त्यामुळे मी जास्त दारू पिण्यासाठी सत्तू सरदार यांच्याकडे गेलो, मात्र त्याने मला दारूऐवजी अॅसिड पाजले.
फॉर्म स्टेटमेंटच्या आधारे पोलिसांनी सत्तू सरदारविरुद्ध खुनाच्या प्रयत्नाचा गुन्हा दाखल केला आहे. पोलिसांनी इर्शादच्या मृतदेहाचे शवविच्छेदन करून मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देऊन तपास सुरू केला आहे. दुसरीकडे इर्शादने मृत्यूपूर्वी जबाब नोंदवल्याच्या वृत्ताला पोलिसांनी दुजोरा दिला आहे.
ही बातमी वाचा :