(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Fake Liquor: दारू बनावट आहे की ओरिजिनल कसे ओळखाल? दारू खरेदी करताना काय काळजी घ्याल?
Alcohol : बनावट दारूमध्ये इथेनॉलच्या ऐवजी स्प्रिरिट, यूरिया आणि इतर काही केमिकल्स वापरले जातात, त्याचं प्रमाण जर जास्त असेल तर पिणाऱ्याचा जीव जाऊ शकतो.
Fake Liquor: बनावट दारू प्यायल्याने रोज कित्येक लोकांचा मृत्यू होतोय, त्याच्या बातम्या आपण रोज कुठे ना कुठे वाचतो किंवा ऐकतो. बनावट दारुमुळे आपल्या आरोग्यावर दुष्परिणाम होतो, त्यामुळे अनेकांना आपला जीव गमवावा लागतोय. मग ओरिजिनल दारू कोणती आणि बनावट दारू कोणती हे कसं ओळखावं असा प्रश्न अनेकांना पडतोय. बनावट दारू आणि खऱ्या दारूमधला फरक कसा तरी लोकांना कळला तर त्यांचा जीवही वाचू शकतो आणि नकली दारूचा व्यापार करणाऱ्यांचाही पर्दाफाश होऊ शकतो.
How to Identify Original Alcohol : बनावट दारू आणि ओरिजिनल दारू कशी ओळखायची?
वास्तविक अल्कोहोल बनवण्यासाठी वापरल्या जाणाऱ्या रसायनाला इथेनॉल म्हणतात. मुख्य म्हणजे खरी दारू बनवण्यासाठी कंपन्या ठराविक प्रमाणात या रसायनाचा वापर करतात. तर बनावट दारू बनवण्यासाठी इथेनॉलऐवजी स्पिरिट, मिथाइल अल्कोहोल, इथाइल अल्कोहोल, युरिया, ऑक्सिटोसिन इंजेक्शन अशी अनेक केमिकल्स वापरली जातात. या केमिकल्सच्या वाढलेल्या प्रमाणामुळे दारू विषारी बनते.
What Care Should Be Taken While Buying Alcohol : दारू खरेदी करताना काय काळजी घ्याल
बनावट दारू बनवणारे इतके हायटेक झाले आहेत की ते बनावट दारूचा रंग, चव आणि वास अशा प्रकारे तयार करतात की जणू ती खरी दारू आहे. मात्र असे असतानाही थोडी काळजी घेतल्यास बनावट दारू ओळखता येते. पहिली आणि महत्त्वाची गोष्ट म्हणजे जेव्हा तुम्ही दारू खरेदी कराल तेव्हा अधिकृत दुकानातूनच खरेदी करा. अधिकृत दुकानातून दारू विकत घेतल्यास बनावट दारू मिळण्याची शक्यता खूपच कमी असते. यासोबतच तुम्ही बनावट दारू त्याच्या पॅकेजिंगवरूनही ओळखू शकता. तुम्हाला दिसेल की बनावट दारूचे पॅकेजिंग खूपच खराब असेल आणि त्याच्या नावाचे स्पेलिंग देखील गोंधळात टाकणारे असेल. यासोबतच बनावट दारूच्या बाटल्यांचे सीलही अनेकदा तुटले आहे.
तुम्ही बनावट दारू प्यायल्यास काय होईल?
जर तुम्ही चुकून बनावट दारू प्यायलात तर तुमच्या शरीरात अनेक बदल दिसून येतील, त्याचा तुम्हाला त्रास होतो. उलट्या होणे, चक्कर येणे, अशक्तपणा जाणवणे, श्वास घेण्यात अडचण, हायपोथर्मिया आणि गुंगी येणे किंवा बेशुद्धावस्था अशी लक्षणे दिसतील. ही लक्षणे जर एखाद्या दारू प्यायलेल्या व्यक्तीमध्ये दिसत असतील तर त्याने बनावट दारू सेवन केल्याचं स्पष्ट होतंय. पण कधी कधी त्या व्यक्तीचा जीवही जाऊ शकतो.
(Disclaimer : एबीपी माझा दारु पिण्याचं कोणतंही समर्थन करत नाही).