एक्स्प्लोर
फॅबइंडियाला नोटीस, खादीच्या नावावर फसवणूक

नवी दिल्ली : खादी आणि ग्रामोद्योग आयोगाने फॅबइंडियाला कायदेशीर नोटीस पाठवली आहे. फॅबइंडिया सूती रेडीमेड कपड्यांची विक्री खादीची उत्पादनं म्हणून करत आहे. कंपनीने अशा विक्रीसाठी परवानगीही घेतली नसल्याचा दावा आयोगाने केला आहे.
या नोटीसमध्ये आयोगाने फॅबइंडियाला आपली बाजू मांडण्यासाठी 15 दिवसांची मुदत दिली आहे. या अवधीमध्ये फॅबइंडियाने आपली बाजू मांडली नाही, तर खादी आणि ग्रामोद्योग आयोग, खादी मार्क रेग्युलेशनचं उल्लंघन केल्याप्रकरणी पुढील कारवाई करेल.
"फॅबइंडियाद्वारे खादी उत्पादनं म्हणून विकलेले कपडे आणि त्यांच्या किंमतीची गांभीर्याने तपासणी केल्यानंतर समजलं की, फॅबइंडियाने या कपड्यांना 'फॅबइंडिया कॉटन'चं लेबल लावलं आहे," असा उल्लेखही नोटीसमध्ये केला आहे.
नोटीसमध्ये पुढे लिहिलं आहे की, "कपड्यांच्या प्राईस टॅगवर खादी शब्द लिहिलेला आहे. यावरुनच स्पष्ट होतं की, फॅबइंडिया खादीची उत्पादनं विकत नाही, तर काढता येणाऱ्या प्राईस टॅगवर खादी शब्द लिहून ग्राहकांची दिशाभूल करत आहे. हे काम बेकायदेशीर आहे. दुसऱ्या शब्दात सांगायचं झालं तर हा अनुचित व्यवहार आहे."
फॅबइंडियाचे सीईओ विनय सिंह यांच्या कार्यालयाला ही नोटीस पाठवण्यात आली आहे.
याबाबत इकॉनॉमिक्स टाइम्सला दिलेल्या प्रतिक्रियेत सीईओ विनय सिंह म्हणाले की, "आम्हाला नोटीस मिळाली आहे आणि त्यावर आम्ही स्पष्टीकरणही दिलं आहे. आम्ही अधिकाऱ्यांसह एक बैठक बोलावली आहे. जे मुद्दे उपस्थित झाले आहेत, त्यावर या बैठकीत चर्चा करुन ते सोडवण्यात येतील."बॅ
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
भारत
भारत
राजकारण
विश्व
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
