(Source: ECI/ABP News/ABP Majha)
शेतकऱ्यांच्या 'चक्का जाम'ला काँग्रेसचा पाठिंबा, राहुल गांधींनी ट्वीट करत म्हटलं...
संयुक्त किसान मोर्चाने आज दुपारी 12 ते दुपारी 3 या वेळेत देशभर चक्का जाम करण्याची घोषणा केली आहे. आता काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांनी आज होत असलेल्या जक्का जाम आंदोलनाला पाठिंबा दर्शवला आहे.
नवी दिल्ली : कृषी कायद्याच्या विरोधात शेतकरी आज देशभरात 'चक्का जाम' आंदोलन करत आहेत. संयुक्त किसान मोर्चाने आज दुपारी 12 ते दुपारी 3 या वेळेत देशभर चक्का जाम करण्याची घोषणा केली आहे. आता काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांनी आज होत असलेल्या जक्का जाम आंदोलनाला पाठिंबा दर्शवला आहे.
राहुल गांधी यांनी ट्वीट करत म्हटलं की, शेतकर्यांचा शांततापूर्ण सत्याग्रह देशाच्या हिताचा आहे". राहुल यांनी कृषी कायदे केवळ शेतकरी, मजूरच नव्हे तर देशातील लोकांसाठीही घातक असल्याचं राहुलं गांधी यांनी म्हटलं आहे.
अन्नदाता का शांतिपूर्ण सत्याग्रह देशहित में है- ये तीन क़ानून सिर्फ़ किसान-मज़दूर के लिए ही नहीं, जनता व देश के लिए भी घातक हैं।
पूर्ण समर्थन!#FarmersProtests — Rahul Gandhi (@RahulGandhi) February 6, 2021
दिल्ली नाही होणार चक्का जाम संयुक्त किसान मोर्चा (एसकेएम)च्या वतीनं सांगण्यात आलं आहे की, दिल्लीमध्ये चक्का जाम होणार नाही. कारण तिथं आधीपासून होत असलेल्या आंदोलनामुळे चक्का जाम सारखी परिस्थिती आहे. इथं एन्ट्री मार्ग खुले असतील. जिथं शेतकऱ्यांचे आंदोलन सुरु आहे, ते मार्ग मात्र बंद राहतील. 'चक्का जाम' आंदोलन पूर्णपणे शांततापूर्ण आणि अहिंसक असेल, असं राकेश टिकैत यांनी सांगितलं.
चक्का जामच्या पार्श्वभूमीवर पोलिसांचा चोख बंदोबस्त
प्रजासत्ताक दिनी 26 जानेवारी रोजी ट्रॅक्टर रॅलीदरम्यान झालेल्या हिंसाचाराच्या पार्श्वभूमीवर दिल्ली पोलिसांनी सीमेवर सुरक्षेच्या दृष्टीने चोख पोलीस बंदोबस्त ठेवला आहे. शेतकऱ्यांचा प्रस्तावित 'चक्का जाम' होण्यापूर्वीच दिल्लीच्या सर्व सीमेवर सुरक्षा अधिक कडक केली गेली आहे.
संबंधित बातम्या
- आंदोलन आणखी तीव्र करण्यासाठी एक नवा फॉर्म्युला
- ऑक्टोबरपर्यंत मागण्या मान्य न झाल्यास देशभरात 40 लाख ट्रॅक्टर्सची रॅली काढणार : राकेश टिकैत
- आंदोलनात प्राण गमावलेल्या शेतकऱ्यांना नुकसान भरपाई देणार नाही, केंद्र सरकारची लोकसभेत माहिती
- शेतकऱ्यांची दूरावस्था थांबवा नाहीतर... ; राहुल गांधींचा मोदी सरकारला इशारा