एक्स्प्लोर

Farmer Protest : 'एक ट्रॅक्टर, 15 शेतकरी, 10 दिवस!', आंदोलन दीर्घकाळ चालवण्यासाठी राकेश टिकैत यांचा नवा फॉर्म्युला

नवीन कृषी कायदा मागे घेण्याच्या भूमिकेवर शेतकरी ठाम आहेत. आता गाजीपूर सीमेवर भारतीय किसान यूनियनचे राष्ट्रीय प्रवक्ता राकेश टिकैत यांनी आंदोलन आणखी तीव्र करण्यासाठी शेतकऱ्यांना एक नवा फॉर्म्युला दिलाय.

नवी दिल्ली: राजधानी दिल्लीत शेतकरी आंदोलनाला आता जवळपास अडीच महिन्याचा कालावधी होत आहे. सरकारसोबत झालेल्या अनेक बैठकांनतरही नवीन कृषी कायदा मागे घेण्याच्या भूमिकेवर शेतकरी ठाम आहेत. आता गाजीपूर सीमेवर भारतीय किसान यूनियनचे राष्ट्रीय प्रवक्ता राकेश टिकैत यांनी आंदोलन आणखी तीव्र करण्यासाठी शेतकऱ्यांना एक नवा फॉर्म्युला दिलाय. टिकैत यांनी म्हटलं आहे की, प्रत्येक गावातून एक ट्रॅक्टरवर 15 शेतकरी आणि 10 दिवसांचा वेळ घेऊन या. त्यामुळं या आंदोलनात शेतकरी सहभागी होत राहतील आणि नंतर परत जाऊन ते शेतीही करु शकतील. टिकैत यांनी म्हटलं आहे की, शेतकरी संघटनांचे नेते सरकारशी चर्चा करण्यासाठी नेहमीच तयार आहेत. मात्र सरकारला चर्चा करायचीच नाही. सरकार या आंदोलनाला दीर्घकाळ चालू देण्याच्या मनस्थितीत नाही. मात्र आपल्याला हे आंदोलन दीर्घकाळ चालवायचे आहे. त्यामुळं शेतकऱ्यांसाठी हा फॉर्म्युला आहे. यामुळं प्रत्येक शेतकरी हा आंदोलनात सहभाग घेईल आणि आंदोलन दीर्घकाळ चालू शकेल, असं टिकैत यांनी म्हटलं आहे. ऑक्टोबरपर्यंत मागण्या मान्य न झाल्यास देशभरात 40 लाख ट्रॅक्टर्सची रॅली काढणार : राकेश टिकैत  टिकैत यांनी म्हटलं आहे की, यामुळं गावांमधील लोकं आंदोलनात जास्तीत जास्त येतील. प्रत्येक गावातून 15 शेतकरी आणि 10 दिवसांसाठी येतील. त्यानंतर दुसऱ्या 15 लोकांचा समूह येईल. त्यानंतर आधीपासून आंदोलनात असलेले शेतकरी आपल्या गावी जाऊन शेती करु शकतील, असं टिकैत म्हणाले. Farmers Protest | आंदोलनात प्राण गमावलेल्या शेतकऱ्यांना नुकसान भरपाई देणार नाही, केंद्र सरकारची लोकसभेत माहिती देशभरात 40 लाख ट्रॅक्टरची रॅली - राकेश टिकैत भारतीय किसान युनियनचे नेते राकेश टिकैत शेतकरी आंदोलनाचे नेतृत्व करत आहे. राकेश टिकैत यांनी ऑक्टोबरपर्यंत सरकारला वेळ दिला असून जर मागण्या मान्य झाल्या नाही देशभरात 40 लाख ट्रॅक्टरची रॅली काढण्यात येईल असा इशारा दिला आहे. राकेश टिकैत म्हणाले, आम्ही सरकरला आमच्या मागण्या मान्य करण्यासाठी ऑक्टोबरपर्यंत वेळ दिला आहे. जर तोपर्यंत सरकारने आमच्या मागण्या मान्य नाही केल्या तर आम्ही देशात 40 लाख ट्रॅक्टरची रॅली काढण्यात येईल. शेतकऱ्यांची दूरावस्था थांबवा नाहीतर... ; राहुल गांधींचा मोदी सरकारला इशारा 6 फेब्रुवारीला देशभरात 'चक्का जाम' संयुक्त किसान मोर्चा संघटनेकडून 6 फेब्रुवारीला 'चक्का जाम' करण्याची घोषणा केली आहे. 6 फेब्रुवारीला दुपारी 12 ते 3 या वेळेत हे देशव्यापी आंदोलन करणार असल्याचा इशारा त्यांनी दिला. या आंदोलनाअंतर्गत रस्ते अडवण्याचा इशारा त्यांनी दिला.
आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

Prateek Yadav Death: प्रतिक यादवांच्या शरीरावरील त्या सहा जखमांनी गूढ वाढवलं, नैसर्गिक मृत्यू की घातपात? चर्चांना उधाण
प्रतिक यादवांच्या शरीरावरील त्या सहा जखमांनी गूढ वाढवलं, नैसर्गिक मृत्यू की घातपात? चर्चांना उधाण
पश्चिम बंगालमध्ये हैदोस सुरूच; आता लाऊड स्पीकरचा आवाज कमी करायला सांगितला म्हणून पोलीस स्टेशन फोडलं; केली. पोलिसांनी लाठीचार्ज करत अश्रुधुराच्या नळकांड्या फोडल्या
पश्चिम बंगालमध्ये हैदोस सुरूच; आता लाऊड स्पीकरचा आवाज कमी करायला सांगितला म्हणून पोलीस स्टेशन फोडलं; केली. पोलिसांनी लाठीचार्ज करत अश्रुधुराच्या नळकांड्या फोडल्या
NEET Exam paper leak: नीट परीक्षा रद्द झाल्याचा धसका, नैराश्याच्या भरात तीन विद्यार्थ्यांनी उचललं टोकाचं पाऊल
नीट परीक्षा रद्द झाल्याचा धक्का सहन झाला नाही, नैराश्याच्या भरात तीन विद्यार्थ्यांनी उचललं टोकाचं पाऊल
Petrol Tax : पेट्रोल निर्यातीवर विंडफॉल टॅक्स, डिझेल आणि एटीएफवरील शुल्कात कपात; केंद्र सरकारचा मोठा निर्णय
पेट्रोल निर्यातीवर विंडफॉल टॅक्स, डिझेल आणि एटीएफवरील शुल्कात कपात; केंद्र सरकारचा मोठा निर्णय

व्हिडीओ

Neet Exam Update : नीटची फेरपरीक्षा, विद्यार्थ्यांची अग्निपरीक्षा, कोणती आव्हानं समोर Special Report
Sanjay Raut Statement : तरुणांचा अपमान,राऊतांविरोधात घमासान, एक्स पोस्ट वादाच्या चर्चेत Special Report
Pune Hospital Bomb : गुप्तरोग, बॉम्ब आणि सेलो टेप, ऑनलाईन पेमेंटमुळे कसा झाला भांडफोड Special Report
Petrol Price Hike : इंधनाचा भडका, महागाईचा तडका,खिशाला कात्री Special Report
Pune Hospital Bomb Case:यूट्यूब पाहून बनवला बॉम्ब;हॉस्पिटलला लुटण्याचा होता प्लॅन,पोलिसांचा मोठा खुलासा!

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Ahilyanagar Leopard News: समोर प्रत्यक्ष काळ उभा असताना 'ती' वाघीण बनली; संगमनेरमधील आजीबाईंनी बिबट्याला घरात कोंडले
समोर प्रत्यक्ष काळ उभा असताना 'ती' वाघीण बनली; संगमनेरमधील आजीबाईंनी बिबट्याला घरात कोंडले
Prateek Yadav Death: प्रतिक यादवांच्या शरीरावरील त्या सहा जखमांनी गूढ वाढवलं, नैसर्गिक मृत्यू की घातपात? चर्चांना उधाण
प्रतिक यादवांच्या शरीरावरील त्या सहा जखमांनी गूढ वाढवलं, नैसर्गिक मृत्यू की घातपात? चर्चांना उधाण
NEET Scam: NEET घोटाळ्याचा मास्टरमाईंड प्राध्यापक कुलकर्णी केमिस्ट्रीचा पेपर, नाशिकचा शुभम खैरनार बायोलॉजीचा पेपर फोडायचा; 28 वर्ष प्राध्यापक राहिल्यानंतर पेपर फोडीचा गोरखधंदा
NEET घोटाळ्याचा मास्टरमाईंड प्राध्यापक कुलकर्णी केमिस्ट्रीचा पेपर, नाशिकचा शुभम खैरनार बायोलॉजीचा पेपर फोडायचा; 28 वर्ष प्राध्यापक राहिल्यानंतर पेपर फोडीचा गोरखधंदा
पश्चिम बंगालमध्ये हैदोस सुरूच; आता लाऊड स्पीकरचा आवाज कमी करायला सांगितला म्हणून पोलीस स्टेशन फोडलं; केली. पोलिसांनी लाठीचार्ज करत अश्रुधुराच्या नळकांड्या फोडल्या
पश्चिम बंगालमध्ये हैदोस सुरूच; आता लाऊड स्पीकरचा आवाज कमी करायला सांगितला म्हणून पोलीस स्टेशन फोडलं; केली. पोलिसांनी लाठीचार्ज करत अश्रुधुराच्या नळकांड्या फोडल्या
CSK Playoffs Scenarios : MS धोनी नाही, मुख्य बॉलरही बाहेर, सर्व काही विरोधात गेले तरी मराठमोळा ऋतुराज नडला; CSK अजूनही प्लेऑफमध्ये पोहोचू शकते? वाचा समीकरण
MS धोनी नाही, मुख्य बॉलरही बाहेर, सर्व काही विरोधात गेले तरी मराठमोळा ऋतुराज नडला; CSK अजूनही प्लेऑफमध्ये पोहोचू शकते? वाचा समीकरण
IPL 2026 Points Table: आयपीएल पॉईंट टेबलमध्ये भयंकर ट्विस्ट, लखनऊकडून पराभव स्वीकारत चेन्नई सहाव्या क्रमांकावर घसरली; तर... 15 मे नंतर कसं बदललं समीकरण
आयपीएल पॉईंट टेबलमध्ये भयंकर ट्विस्ट, लखनऊकडून पराभव स्वीकारत चेन्नई सहाव्या क्रमांकावर घसरली; तर... 15 मे नंतर कसं बदललं समीकरण
Ashok Kharat Crime news: जेलमध्ये बसून अशोक खरातची कमाई सुरुच, कुंभमेळा रिंगरोडसाठी जमीन गेली, तीन कोटींचा सरकारी मोबदला मिळणार
जेलमध्ये बसून अशोक खरातची कमाई सुरुच, कुंभमेळा रिंगरोडसाठी जमीन गेली, तीन कोटींचा सरकारी मोबदला मिळणार
Dhananjay Munde: 'मी जात-पात-धर्म सोडून राजकारण केलं, पण मला लाथा मारून हाकलायचा प्रयत्न झाला'; धनंजय मुंडेंनी परळीकरांसमोर मनातली खंत बोलून दाखवली
'मी जात-पात-धर्म सोडून राजकारण केलं, पण मला लाथा मारून हाकलायचा प्रयत्न झाला'; धनंजय मुंडेंनी परळीकरांसमोर मनातली खंत बोलून दाखवली
Embed widget