ऑक्टोबरपर्यंत मागण्या मान्य न झाल्यास देशभरात 40 लाख ट्रॅक्टर्सची रॅली काढणार : राकेश टिकैत
दिल्लीच्या सिंघू, टिकरी आणि गाझीपूर सीमेवर काटेरी तार, बॅरिकेड्स आणि बोल्डर्स लावून पोलिसांनी तटबंदी केली आहे. एवढेच नाही तर पोलिसांनी शेतकऱ्यांच्या आंदोलनस्थळी जाणारे सर्व रस्ते देखील बंद केले आहेत.

नवी दिल्ली : राजधानी दिल्लीत शेतकरी आंदोलनाला 70 दिवस झाले आहे. नविन कृषी कायदा मागे घेण्याच्या भूमिकेवर शेतकरी ठाम आहे. आता भारतीय किसान युनियनचे नेते राकेश टिकैत शेतकरी आंदोलनाचे नेतृत्व करत आहे. राकेश टिकैत यांनी ऑक्टोबरपर्यंत सरकारला वेळ दिला असून जर मागण्या मान्य झाल्या नाही देशभरात 40 लाख ट्रॅक्टरची रॅली काढण्यात येईल असा इशारा दिला आहे.
राकेश टिकैत म्हणाले, आम्ही सरकरला आमच्या मागण्या मान्य करण्यासाठी ऑक्टोबरपर्यंत वेळ दिला आहे. जर तोपर्यंत सरकारने आमच्या मागण्या मान्य नाही केल्या तर आम्ही देशात 40 लाख ट्रॅक्टरची रॅली काढण्यात येईल.
We have given the govt time till October. If they do not listen to us, we will go on a pan-country tractor rally of 40 lakh tractors: Rakesh Tikait, BKU leader https://t.co/NFt3m5yrwa pic.twitter.com/VA0v9HC6CB
— ANI (@ANI) February 2, 2021
6 फेब्रुवारीला देशभरात 'चक्का जाम'
संयुक्त किसान मोर्चा संघटनेकडून 6 फेब्रुवारीला 'चक्का जाम' करण्याची घोषणा केली आहे. 6 फेब्रुवारीला दुपारी 12 ते 3 या वेळेत हे देशव्यापी आंदोलन करणार असल्याचा इशारा त्यांनी दिला. या आंदोलनाअंतर्गत रस्ते अडवण्याचा इशारा त्यांनी दिला.
संयुक्त शेतकरी मोर्चाच्याच नेतृत्त्वात मागील दोन महिन्यांहूनही अधिक काळापासून दिल्लीतील सीमांवर शेतकऱ्याचं आंदोलन सुरु आहे. तीन कृषी कायदे रद्द करण्याच्या मागणीसाठी हे आंदोलन करण्यात येत आहे. दरम्यान, या तिन्ही कायद्यांच्या बाबतीत चर्चा करण्याची तयारी दाखवली असली तरीही सरकारनं हे कायदे रद्द करण्याला स्पष्ट नकार दिला आहे. आतापर्यंत 11 बैठकांची सत्र होऊनही या प्रश्नांवर तोडगा निघालेला नाही.
शेतकऱ्यांचे प्रशासनावर गंभीर आरोप
26 जानेवारीतील हिंसाचार आणि 29 जानेवारी रोजी शेतकऱ्यांवरील हल्ल्यानंतर दिल्ली पोलिसांनी आंदोलनाच्या ठिकाणाहून दिल्लीकडे जाण्याचे सर्व मार्ग थांबवण्यास पूर्ण तयारी केली आहे. पोलिसांनी आंदोलनाच्या ठिकाणी वीज, पाणी, शौचालये हटवली असल्याचा शेतकऱ्यांचा आरोप आहे. त्याचबरोबर आंदोलनस्थळी इंटरनेट सुविधाही बंद केली आहे.
संबंधित बातम्या :
Farmer Protest Update : सिंघू, टिकरी आणि गाझीपूर सीमेवर पोलिसांची तटबंदी, आंदोलनस्थळी जाणारे सर्व रस्ते बंद
Farmers protest | किसान मोर्चासहित अनेक Twitter अकाऊंट ब्लॉक 6 फेब्रुवारीला देशभरात 'चक्का जाम', संयुक्त शेतकरी मोर्चाची घोषणा Special Report | शेतकऱ्यांना रोखण्यासाठी युद्धाची तयारी? #FarmersProtestBefore You Go
Sushma Andhare On Operation Tiger : ओमराजेंबद्दल गौप्यस्फोट, सुषमा अंधारेंची खळबळजनक पत्रकार परिषद






















