एक्स्प्लोर

Corona Review Meeting : कोरोनाच्या नव्या विषाणूचं जगावर सावट, पंतप्रधानांनी बोलावली तातडीची बैठक

 भारतात सध्या कोरोनाच्या नव्या 'ओमिक्रॉन' विषाणूचा एकही रुग्ण सापडलेला नाही. पण मागच्या लाटेत आपल्याला जोरदार तडाखा बसला होता.

 नवी दिल्ली : कोरोनाच्या सावटातून आपण आता कुठे सावरतोय तोच एका नव्या विषाणूचं सावट जगाला भेडसावतं आहे. आफ्रिकेत सापडलेल्या या नव्या विषाणूचं नामकरण जागतिक आरोग्य संघटनेनं 'ओमिक्रॉन' असं केलंय. जगात अनेक देशांनी उपाययोजना सुरु केल्या आहेत, आज दिल्लीतही पंतप्रधानांनी तातडीची बैठक बोलावली.

आधी अल्फा, मग बीटा, मग डेल्टा आणि आता 'ओमिक्रॉन..'कोरोनाच्या नव्या विषाणूंची ही साखळी थांबता थांबेना..आता आफ्रिकेत कोरोनाच्या नव्या विषाणूनं सध्या सगळ्या जगाची चिंता वाढवली आहे.  WHO नं या व्हेरिएंट ऑफ कन्सर्नच्या यादीत टाकलंय.  अनेक देशांनी खबरदारीच्या उपाययोजना सुरु केल्या आहेत. भारतातही आज पंतप्रधान मोदींनी या नव्या विषाणूच्या पार्श्वभूमीवर कोरोनाच्या स्थितीचा आढावा घेण्यासाठी उच्चस्तरीय बैठक बोलावली. 

 भारतात सध्या या कोरोनाच्या नव्या 'ओमिक्रॉन' विषाणूचा एकही रुग्ण सापडलेला नाही. पण मागच्या लाटेत आपल्याला जोरदार तडाखा बसला होता. हा नवा विषाणू डेल्टापेक्षाही भयानक मानला जात आहे. त्याच पार्श्वभूमीवर पंतप्रधानांनी यावेळी उशीर होऊ नये यासाठी ही उच्चस्तरीय बैठक बोलावली. कॅबिनेट सचिव राजीव गौबा, आरोग्य सचिव राजेश भूषण नीती आयोगाचे सदस्य व्ही के पॉल यांच्या उपस्थितीत ही बैठक पार पडली. 

अमेरिका, रशिया, कॅनडा, ब्रिटन, ऑस्ट्रेलिया यासारख्या अनेक देशांनी आफ्रिकेतून येणाऱ्या फ्लाईटसवर बंदी घातलीय. न्यूयॉर्कमध्ये हेल्थ एमर्जन्सी लागू करण्यात आली आहे. भारतातही तातडीनं फ्लाईटस बंदी लागू करण्यात यावी अशी मागणी मुंबईच्या महापौरांनी, दिल्लीच्या मुख्यमंत्र्यांनी पंतप्रधानांकडे केली आहे. 

ओमिक्रॉन हा डेल्टापेक्षाही प्रचंड वेगानं पसरतोय. आत्तापर्यंत या विषाणूचे 50 म्युटंटस सापडल्याचं डॉ. रमण गंगाखेडकर यांनी एबीपी माझाच्या मुलाखतीत म्हटलंय. पण सोबतच अजून या विषाणूमुळे नेमकी हॉस्पिटलायझेशनची गरज किती, मृत्यूचं प्रमाण किती आहे याचा अभ्यासपूर्ण निष्कर्ष समोर आलेला नाहीय. पण कमी संख्या असतानाही जगात यावेळी सतर्कता अधिक आहे ही त्यात चांगली गोष्ट म्हणायला हवी असंही त्यांनी म्हटलंय. 

 विषाणूचं नाव       सुरुवात कुठून         डब्लू एच ओ कडून नामकरण
अल्फा     ब्रिटन , सप्टें 2020         18 डिसेंबर 2020
बीटा    साऊथ आफ्रिका मे 2020 18 डिसेंबर 2020
गामा       ब्राझिल ऑक्टो 2020  11 जानेवारी 2021
डेल्टा        भारत ऑक्टो 2020      11 मे 2021
ओमिक्रॉन    एकापेक्षा अनेक देशांत नोव्हेंबर 21 26 नोव्हेंबर 2021

 मार्च 2020 पासून बंद असलेल्या आंतरराष्ट्रीय फ्लाईटस भारतात 15 डिसेंबरपासून सुरु होतील असं कालच जाहीर करण्यात आलंय. अर्थात त्यात वेगवेगळ्या देशांचे तीन गट धोका पातळीनुसार करण्यात आले आहेत. पण आफ्रिकन विषाणूच्या वाढत्या उद्रेकामुळे या फ्लाईटसबंदीबाबत पुन्हा गांभीर्यानं विचार करण्याची वेळ आली आहे

 सध्याच्या लसी या नव्या विषाणूवर प्रभावी ठरतील का, की नव्या बूस्टर डोसची गरज पडेल असेही प्रश्न आहेत. आफ्रिकेत अवघ्या काही दिवसांपूर्वी दिवसाला 200 रुग्ण सापडत होते ती संख्या एका आठवड्यात दिवसाला 2 हजारावर पोहचलीय. जगभरातल्या शेअर मार्केटमध्ये तर या विषाणूनं पडझड केलीच आहे. पण आता पुन्हा रस्ते ओस पडण्याची वेळ येऊ नये ही काळजी घ्यावी लागेल. कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत देशाला जोरदार तडाखा बसला होता. आत्ता कुठे आपण त्यातून सावरतोय तोच या नव्या विषाणूचं संकट आता पुन्हा घोंगावताना दिसतंय. 

Coronavirus new variant : ओमिक्रॉन हा व्हेरियंट आतापर्यंत कुठे कुठे पसरल्याची भीती व्यक्त होतेय?

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

कळवा-मुंब्रा विधानसभेत नजीब मुल्ला विरुद्ध जितेंद्र आव्हाड? निवडणुकीआधीच आरोप-प्रत्यारोपामुळे राजकीय वातावरण तापलं
कळवा-मुंब्रा विधानसभेत नजीब मुल्ला विरुद्ध जितेंद्र आव्हाड? निवडणुकीआधीच आरोप-प्रत्यारोपामुळे राजकीय वातावरण तापलं
कोकण रेल्वेत तोंडावर चहा फेकला, 'जय श्री राम'च्या घोषणा देण्यास सांगितलं, तक्रार मागे घेण्यासाठी भाजप आमदाराचा दबाव; मुस्लिम कुटुंबाची हायकोर्टात धाव
कोकण रेल्वेत तोंडावर चहा फेकला, 'जय श्री राम'च्या घोषणा देण्यास सांगितलं, तक्रार मागे घेण्यासाठी भाजप आमदाराचा दबाव; मुस्लिम कुटुंबाची हायकोर्टात धाव
मेंदूला पोषण, आठवणीला जागरण; रोहिणी खडसेंनी मंत्री चंद्रकात पाटलांना पाठवले बदाम, व्हिडिओ व्हायरल
मेंदूला पोषण, आठवणीला जागरण; रोहिणी खडसेंनी मंत्री चंद्रकात पाटलांना पाठवले बदाम, व्हिडिओ व्हायरल
लोकसभा निवडणुकांवेळी शरद पवारांचा फोन; नाना पाटेकरांनी निकालानंतरच उलगडला किस्सा
लोकसभा निवडणुकांवेळी शरद पवारांचा फोन; नाना पाटेकरांनी निकालानंतरच उलगडला किस्सा
Advertisement
metaverse

व्हिडीओ

ABP Majha Marathi News Headlines 11 PM TOP Headlines 26 June 2024Nagesh Patil Ashtikar Lok Sabha Oath : बाळासाहेबांना स्मरुन शपथ, अध्यक्षांनी रोखलंRamesh Kir on Eknath Shinde : मी कोण हे मुख्यमंत्र्यांना हळूहळू कळेल, रमेश किर यांचा इशाराNilesh Lanke Oath : इंग्रजीत शपथ, निलेश लंकेंनी करुन दाखवलं

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
कळवा-मुंब्रा विधानसभेत नजीब मुल्ला विरुद्ध जितेंद्र आव्हाड? निवडणुकीआधीच आरोप-प्रत्यारोपामुळे राजकीय वातावरण तापलं
कळवा-मुंब्रा विधानसभेत नजीब मुल्ला विरुद्ध जितेंद्र आव्हाड? निवडणुकीआधीच आरोप-प्रत्यारोपामुळे राजकीय वातावरण तापलं
कोकण रेल्वेत तोंडावर चहा फेकला, 'जय श्री राम'च्या घोषणा देण्यास सांगितलं, तक्रार मागे घेण्यासाठी भाजप आमदाराचा दबाव; मुस्लिम कुटुंबाची हायकोर्टात धाव
कोकण रेल्वेत तोंडावर चहा फेकला, 'जय श्री राम'च्या घोषणा देण्यास सांगितलं, तक्रार मागे घेण्यासाठी भाजप आमदाराचा दबाव; मुस्लिम कुटुंबाची हायकोर्टात धाव
मेंदूला पोषण, आठवणीला जागरण; रोहिणी खडसेंनी मंत्री चंद्रकात पाटलांना पाठवले बदाम, व्हिडिओ व्हायरल
मेंदूला पोषण, आठवणीला जागरण; रोहिणी खडसेंनी मंत्री चंद्रकात पाटलांना पाठवले बदाम, व्हिडिओ व्हायरल
लोकसभा निवडणुकांवेळी शरद पवारांचा फोन; नाना पाटेकरांनी निकालानंतरच उलगडला किस्सा
लोकसभा निवडणुकांवेळी शरद पवारांचा फोन; नाना पाटेकरांनी निकालानंतरच उलगडला किस्सा
Amol Mitkari : प्रत्येकाला जर 100 जागा हव्या असतील तर स्वबळावर लढावं लागेल, अमोल मिटकरींचं महत्वपूर्ण वक्तव्य
प्रत्येकाला जर 100 जागा हव्या असतील तर स्वबळावर लढावं लागेल, अमोल मिटकरींचं महत्वपूर्ण वक्तव्य
Pune : पुण्यात ड्रग्ज घेणाऱ्या दोन्ही तरूणांची ओळख पटली, मुंबईचा तरूण आर्किटेक्ट तर दुसरा सॉफ्टवेअर इंजिनिअर
पुण्यात ड्रग्ज घेणाऱ्या दोन्ही तरूणांची ओळख पटली, मुंबईचा तरूण आर्किटेक्ट तर दुसरा सॉफ्टवेअर इंजिनिअर
''बेट्या, तुझा टांगा उलटवणार'', मनोज जरांगेंचा भुजबळांना इशारा; मराठा-ओबीसी समाजाला महत्त्वाचं आवाहन
''बेट्या, तुझा टांगा उलटवणार'', मनोज जरांगेंचा भुजबळांना इशारा; मराठा-ओबीसी समाजाला महत्त्वाचं आवाहन
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 25 जून 2024 | मंगळवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 25 जून 2024 | मंगळवार
Embed widget