KKR IPL 2025 : अजिंक्य रहाणेला कर्णधार करुन केकेआरने स्वत:च्या पायावर मारुन घेतला धोंडा? प्लेइंग-11 चं गणित बिघडलं
कोलकाता नाईट रायडर्सने आयपीएल 2025 च्या यंदाच्या हंगामासाठी अजिंक्य रहाणेला कर्णधार बनवले आहे.

Ajinkya Rahane KKR IPL 2025 : कोलकाता नाईट रायडर्सने आयपीएल 2025 च्या यंदाच्या हंगामासाठी अजिंक्य रहाणेला कर्णधार बनवले आहे. पण या निर्णयानंतर केकेआर संघापुढे मोठा पिच असल्याचे दिसून येत आहे. खरं तर, रहाणेकडे कर्णधारपद सोपवल्यानंतर, संघाच्या अंतिम अकरा खेळाडूंबद्दल प्रश्न उपस्थित झाले आहेत. प्रश्न असा आहे की रहाणे कुठे खेळणार? आकाश चोप्राने केकेआरच्या प्लेइंग इलेव्हनमधील रहाणेच्या स्थानाला खूप गांभीर्याने घेतले आहे.
केकेआर नरेन आणि डी कॉकला करणार ओपनिंग?
2024 च्या आयपीएलमध्ये केकेआरकडून फिल साल्ट आणि सुनील नारायण ओपनिंग करत होते. पण आता संघाने फिल सॉल्टला सोडले आहे. फिल साल्ट आणि सुनील नारायण संघाला धमाकेदार सुरुवात देत आहेत, ज्यामुळे संघाने अनेक सामने जिंकले आहेत. यावेळीही जर संघाने सुनीलवर विश्वास व्यक्त केला तर क्विंटन डी कॉकला त्याचा साथीदार म्हणून पाहिले जाऊ शकते. आकाश चोप्रा देखील असेच विचार करतो. खरं तर, त्याने असेही म्हटले की, व्यंकटेश अय्यरसाठी तिसऱ्या क्रमांकावर फलंदाजी करणे योग्य आहे. पण आता प्रश्न असा आहे की रहाणे पुन्हा कुठे खेळणार?
कर्णधार रहाणेने कोणत्या क्रमांकावर खेळणार?
रहाणेला संघाचा कर्णधार बनवण्यात आल्यामुळे तो कोणत्या क्रमांकावर खेळणार हे आधी निश्चित करावी लागेल. केकेआर संघाला कॉम्बिनेशनमध्ये किंवा तिसऱ्या क्रमांकावर मोठा बदल करावा लागले. आकाश चोप्राच्या मते, केकेआरसमोर एक पर्याय म्हणजे ते सुनील नरेनऐवजी क्विंटन डी कॉकसोबत रहाणेला सलामीसाठी पाठवू शकतात. यामुळे संघाला राइट हॅन्ड-लेफ्ट हॅन्ड कॉम्बिनेशन मिळू शकेल. दुसरा पर्याय म्हणजे व्यंकटेश अय्यरच्या जागी रहाणेला तिसऱ्या क्रमांकावर खेळवणे.
रहाणेसाठी चौथ्या क्रमांकावर खेळण्याचा पर्यायही खुला
पहिल्या दोन पर्यायांव्यतिरिक्त, आणखी एक पर्याय आहे आणि तो म्हणजे रहाणेला प्लेइंग इलेव्हनमध्ये चौथ्या क्रमांकावर खेळताना दिसू शकते. रहाणेच्या स्थानाबाबत केकेआरला खूप डोकेदुखी आहे हे स्पष्ट आहे. पण, त्याला त्या डोकेदुखीपासून लवकरच तोडगा काढावा लागेल. अशा परिस्थितीत, केकेआर रहाणेला कोणत्या क्रमांकावर मैदानात उतरवण्याचा निर्णय घेते हे पाहणे मनोरंजक ठरेल.
केकेआरचा संभाव्य प्लेइंग इलेव्हन - सुनील नारायण, क्विंटन डी कॉक, वेंकटेश अय्यर, अजिंक्य रहाणे (कर्णधार), रमणदीप सिंग, रिंकू सिंग, आंद्रे रसेल, हर्षित राणा, वरुण चक्रवर्ती, स्पेन्सर जॉन्सन, एनरिक नॉर्खिया.
हे ही वाचा -
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज

