Orry Booked For Consuming Alcohol: ओरीसह त्याच्या 7 मित्रांविरोधात FIR दाखल; वैष्णो देवी मंदिर परिसरात दारू प्यायल्याचा आरोप
Orry Booked For Consuming Alcohol: माता वैष्णोदेवी मंदिराच्या बेस कॅम्प असलेल्या कटरा येथील एका फाईल्ह स्टार हॉटेलमध्ये दारू पायल्यामुळे पोलिसांनी ओरी आणि इतर सात जणांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.

Orry Booked For Consuming Alcohol: बॉलिवूड सेलिब्रिटींचा (Bollywood Celebrity) खास मित्र आणि सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर (Social Media Influencer) ओरी (Orry) अडचणीत सापडला आहे. ओरीविरोधात जम्मूतील (Jammu) कटरा पोलीस ठाण्यात (Katra Police Station) गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ओरीवर जम्मूतील कटरा येथील एका पंचतारांकित हॉटेलमध्ये डीएमच्या आदेशांचं उल्लंघन केल्याचा आणि त्याच्या मित्रांसह दारू प्यायल्याचा आरोप आहे. दरम्यान, एका फाईव्ह स्टार हॉटेलमध्ये दारू पितानाचा ओरीचा एक फोटो व्हायरल होत आहे.
माता वैष्णोदेवी मंदिराच्या बेस कॅम्प असलेल्या कटरा येथील एका फाईल्ह स्टार हॉटेलमध्ये दारू पायल्यामुळे पोलिसांनी ओरी आणि इतर सात जणांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. जम्मू आणि काश्मीर पोलिसांनी ज्या आठ जणांवर गुन्हा दाखल केला आहे, त्यात रशियन नागरिक अनास्तासिला अर्जामास्कीना यांचा समावेश आहे, जी ओरी आणि त्याच्या मित्रांसह कटरा येथे आली होती.
जिल्हा दंडाधिकाऱ्यांच्या (डीएम) आदेशाचं उल्लंघन केल्याबद्दल आणि धार्मिक भावना दुखावल्याबद्दल ओरी, दर्शन सिंह, पार्थ रैना, हृतिक सिंह, राशि दत्ता, रक्षिता भोगल, शगुन कोहली आणि अनास्तासिला अर्जमास्किना यांच्याविरुद्ध कटरा पोलीस ठाण्यात एफआयआर (क्रमांक 72/25) दाखल करण्यात आला. त्याच्यावर भारतीय दंड संहिता (BNSS) च्या कलम 223 अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
View this post on Instagram
अडवल्यानंतरही ओरीनं मित्रांसोबत प्यायली दारू
ओरी सोबत, त्याचे 8 मित्र दर्शन सिंह, पार्थ रैना, हृतिक सिंह, राशी दत्ता, रक्षिता भोगल, शगुन कोहली आणि अनास्तासिला अर्जामास्कीना यांचा समावेश आहे. त्या सर्वांना सांगण्यात आलं की, कॉटेज सूटमध्ये मद्यपान आणि मांसाहार करण्यास मनाई आहे. कारण अशा दिव्य माता वैष्णोदेवी मंदिरात असं करण्यास सक्त मनाई करण्यात आली आहे. असं सांगूनही, ओरी त्याच्या मित्रांसोबत दारू प्यायला.
ओरीला अटक होणार?
धार्मिक स्थळांवर ड्रग्ज किंवा अल्कोहोलसारख्या गोष्टी सहन न करण्याचं उदाहरण घालून देण्यासाठी, एसएसपी रियासी शापरमवीर सिंह यांनी गुन्हेगारांना पकडण्याचे कडक निर्देश दिले आहेत. यामुळे सर्वसामान्यांच्या भावना दुखावल्या जातात आणि देशाच्या नियमांचं उल्लंघन करणाऱ्या श्रद्धाळू लोकांच्या भावनांचा आदर न करणाऱ्या गुन्हेगारांना पकडण्यासाठी एसपी कटरा, डीएसपी कटरा आणि एसएचओ कटरा यांच्या देखरेखीखाली एक पथक देखील तयार करण्यात आलं आहे.
महत्त्वाच्या इतर बातम्या :
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज

