भावाने जग सोडलं, बापाने टेम्पो चालवला, टीम इंडियात स्थान मिळाल्यानंतर गायब, आता IPL मधून धडाकेबाज कमबॅक करणार!
Chetan sakariya, IPL 2025 : भावाने जग सोडलं, बापाने टेम्पो चालवला, टीम इंडियात स्थान मिळाल्यानंतर गायब, आता IPL मधून धडाकेबाज कमबॅक करणार!

Chetan sakariya, IPL 2025 : आयपीएलपर्यंत पोहोचण्यासाठी किंवा टीम इंडियाचा भाग बनण्यासाठी अनेक खेळाडूंना संघर्षमय प्रवास करावा लागतो. आयपीएलच्या एखाद्या संघात स्थान मिळवणे ही साधीसुधी गोष्ट राहिलेली नाही. भावाने आत्महत्या करुन जीवन संपवलेलं असताना आणि बापाने टॅम्पो चालवून संसार केलेला असताना जर एखादा खेळाडू टीम इंडियात स्थान मिळवत असेल आणि अचानक संघातून गायब झालेला पाहायला मिळत असेल तर? ही गोष्ट आहे क्रिकेटपटू चेतन सकारियाची...संघर्षमय प्रवास करुन टीम इंडियात स्थान मिळालेला चेतन सकारिया अचानक संघातून गायब झालेला पाहायला मिळाला. मात्र, आता तो आयपीएलमधून पुनरागमन करण्याच्या तयारीत आहे.
चेतन सकारिया आता आयपीएल 2025 मध्ये कोलकाता नाईट रायडर्सकडून खेळताना पाहायला मिळणार आहे. त्याचा उमरान मलिकच्या अनुपस्थितीत संघात समावेश करण्यात आलाय. उमरान मलिक जखमी झाल्याने आयपीएलच्या या हंगामाला मुकलाय. त्यामुळे केकेआरने त्याला 75 लाखांमध्ये विकत घेतलंय. एकेकाळी क्रिकेट विश्वात मोठं नाव कमावलेला चेतन सकारिया आता आयपीएलमधून पुनरागमन करण्याच्या तयारीत आहे. आत्तातपर्यंतचा त्याचा प्रवास अतिशय संघर्षमय राहिलेला आहे.
चेतन सकारियाचा संघर्षमय प्रवास
चेतन सकारियाचा प्रवास अतिशय संघर्षमय आहे. शाळेत शिकत असताना क्रिकेटचा खर्च काढण्यासाठी तो मामाच्या स्टेशनेरी दुकानात काम करत होता. त्याचे वडिल टेम्पो चालक होते आणि क्रिकेट कीट आणि कोचिंगची फिस देऊ शकत नव्हते. चेतन सकारियाच्या छोट्या भावाने 2021 मध्ये आत्महत्या केली होती. त्यानंतर त्याच्या संपूर्ण कुटुंबियांवर दु:खाच्या डोंगर कोसळला होता. यातून सावरत त्याने स्वत:ला सिद्ध केलं होतं.
चेतन सकारियाला सुरुवातीला आयपीएल 2021 मध्ये 1.2 कोटी रुपयांमध्ये खरेदी करण्यात आलं होतं. त्यामुळे हा ऑक्शन त्याच्यासाठी महत्त्वपूर्ण राहिला होता. गुजरातमधील भावनगरपासून 10 किलीमीटर लांब राहत असलेल्या सकारिलाय आयपीएलच्या फ्रँजायजीने खरेदी करणं, ही त्याच्यासाठी स्वप्नवत गोष्टी होती, जी सत्यात उतरल होती. मामाच्या दुकानी काम करत सकारियाने त्याचा क्रिकेट कीट आणि कोचिंगचा खर्च मिळवला होता.
चेतन सकारियाचं आत्तापर्यंतचं आयपीएल करियर
चेतन सकारियाने आत्तापर्यंत आयपीएलचे तीन हंगाम खेळले आहेत. या तीन हंगमात त्याने 19 सामने खेळले असून 20 विकेट्स पटकावल्या आहेत. राजस्थान रॉयल्सकडून खेळत असताना त्याने आयपीएलमध्ये पदार्पण केलं होतं. 2022 साठी तो दिल्ली कॅपिटल्ससाठी देखील खेळला होता.
इतर महत्त्वाच्या बातम्या
सहज ऑडिशन द्यायला गेली अन् आयपीएलची सर्वात सुंदर अँकर बनली, पुढे घटस्फोटीत अभिनेत्याशी लग्नही उरकलं
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज

