सहज ऑडिशन द्यायला गेली अन् आयपीएलची सर्वात सुंदर अँकर बनली, पुढे घटस्फोटीत अभिनेत्याशी लग्नही उरकलं
Shibani Dandekar : आयपीएलची सर्वात सुंदर अँकर बनली, पुढे घटस्फोटीत अभिनेत्याशी लग्नही उरकलं...

Shibani Dandekar : भारतातील सर्वात लोकप्रिय असलेली लीग म्हणजेच आयपीएलला सुरुवात होऊन आता 18 वर्षे उलटले आहेत. आयपीएलचा नवा हंगाम आता 22 मार्चपासून सुरु होत आहे. दरम्यान, आत्तापर्यंत आयपीएलला अनेक निवेदक आणि निवेदिकांनी होस्ट केलेलं पाहायला मिळालं. काही अँकर त्यांच्या सुंदरतेमुळे चर्चेत राहिल्या तर काही त्यांच्या क्रिकेटबाबत असलेल्या ज्ञानामुळे देखील चर्चेत होत्या. दरम्यान, आपण आयपीएलमधील अशाच एका निवेदिकेबाबत जाणून घेऊयात, जिने टाईमपास म्हणून ऑडिशन दिली अन् आयपीएलमधील सर्वांत चर्चेत असलेली अँकर बनली.
सोनी टेलिव्हिजन 2011 मध्ये आयपीएलचे निवेदन करणाऱ्या नवा चेहरा शोधत होतं. तेव्हा अभिनेत्री शिबानी दांडेकर हिला तिच्या मित्राने ऑडिशन देण्यासाठी जा, असं सांगितलं. तेव्हा बेमनमध्ये शिबानी दांडेकर ऑडिशन देण्यासाठी पोहोचली होती. तिला आपली निवड होईल, असा थोडाही आत्मविश्वास नव्हता. मात्र, तरी देऊन पाहूया म्हणून शिबानीने ही ऑडिशन दिली होती. मात्र ऑडिशन देऊन तिने तिचं टॅलेंट दाखवलं आणि सारेच अवाक झाले. त्यानंतर 2011 ते 2015 दरम्यानच्या आयपीएलच्या हंगामांमध्ये शिबानीने 'एक्स्ट्रा इनिंग्स' गा शो चांगल्या पद्धतीने होस्ट केला.
शिबानी एक परफेक्शनिस्ट आहे, तिला क्रिकेटची देखील तितकीच आवड होती. मात्र, आयपीएलसारखा प्लॅटफॉर्म तिने पहिल्यांदाच होस्ट केला होता. तिने या शोसाठी मोठी मेहनत घेतली होती. त्यावेळी ती चांगल्या पद्धतीने प्रेझंट व्हावं, यासाठी प्रोड्यूसरसोबत तासंतास चर्चा करायची. शिवाय स्वत:चं ज्ञान अपडेट ठेवण्यासाठी तज्ज्ञांचं मार्गदर्शन देखील घेत होती.
आयपीएलनंतर 2019 च्या वर्ल्डकपमध्ये देखील झळकली
आयपीएलचे अनेक हंगाम चांगल्या पद्धतीने होस्ट केल्यानंतर शिबानी दांडेकरला क्रिकेट देव असलेल्या सचिन तेंडुलकर आणि दिग्गज फिरकीपटू शेन वॉर्नने अमेरिकेत 'क्रिकेट ऑल स्टार्स'मध्ये काम करण्यास सांगितले. तिने आयपीएलसाठी घेतलेल्या मेहनतीचं हे द्योतक होतं. आयपीएलमधील अँकरिंगचं करियर पुढे नेण्यासाठी ती अमेरिकेत पोहोचली. न्यूयॉर्कमध्ये शिफ्ट देखील झाली. तिथे तिने अनेक शो उत्कृष्ट पद्धतीने होस्ट केले. दरम्यान, त्यानंतरच्या काळात भारतात आल्यानंतर तिने अनेक प्रोजेक्टमध्ये मॉडेल म्हणून काम केलं. 2019 च्या वनडे विश्वचषकात ती पुन्हा एकदा निवेदिका म्हणून काम करताना दिसली होती.
आयपीएलची अँकर म्हणून खराब अनुभव
शिबानीने एका मुलाखतीत आयपीएलमधील खराब अनुभव शेअर केले होते. शिबानी म्हणाली, "मी आयपीएलमध्ये अँकर म्हणून काम करण्यास सुरुवात केली तेव्हा सुरुवातीला फार अडचणी येत होत्या. कारम मी कितीही रिसर्च केला, कितीही क्रिकेटबद्दल जाणून घेतलं तरीही लोकांना मी काय वेअर केलंय? हे महत्त्वपूर्ण वाटायचं. लोक माझ्या ज्ञानापेक्षा मी कशी दिसते? यावर लक्ष देत होते."
महाराष्ट्रातील कोकणी परिवारात जन्म
शिबानी दांडेकरचा जन्म महाराष्ट्रातील पुण्यात राहत असलेल्या एका कोकणी कुटुंबात 27 ऑगस्ट 1980 रोजी झालाय. त्यानंतर तिचं कुटुंब लंडला शिफ्ट झालं होतं. सुरुवातीला ती आफ्रिका आणि नंतर ती ऑस्ट्रेलियामध्ये राहिली. तिला तीन बहिणी देखील आहेत. तिची मोठी बहीण अनुषा दांडेकर ही देखील प्रसिद्ध मॉडेल आहे. दुसरी बहीण अपेक्षा दांडेकर संगीतप्रेमी आहे.
फरहान अख्तरची दुसरी पत्नी
शिबानी दांडेकर प्रसिद्ध गीतकार जावेद अख्तर यांचा छोटा मुलगा असलेल्या फरहान अख्तरची पत्नी आहे. जवळपास तीन वर्षे एकमेकांना डेट केल्यानंतर फेब्रुवारी 2022 मध्ये फरहान आणि शिबानी यांनी लग्न केलं होतं. दोघे लॉकडाऊनमध्ये लिव्ह इनमध्ये राहात असल्याची देखील चर्चा होती. दोघांची पहिली भेट 2015 मधील ‘आई कैन डू दैट’ या शो दरम्यान झाली होती. फरहान अख्तर हा शो होस्ट करत होता. शिबानी देखील त्या शो मध्ये काम करत होती. फरहानने शिबानी सोबत हा दुसरा विवाह केला होता. फरहानची पहिली पत्नी अधुना हिला लग्नाच्या 17 वर्षानंतर 2017 मध्ये घटस्फोट दिला होता.
View this post on Instagram
इतर महत्त्वाच्या बातम्या























