Kangana Ranaut On Oscar: 'इमर्जन्सी'ला ऑस्कर? मुर्खांचा ऑस्कर म्हणत कंगनाचे अमेरिकेसाठी खडे बोल; नॅशनल अवॉर्ड्सवरही सोडलं मौन
Kangana Ranaut On Oscar: अमेरिका आपला खरा चेहरा आणि ते विकसनशील देशांना कसे धमकावतात, दडपतात आणि दबाव आणतात हे स्वीकारू इच्छित नाही. इमर्जन्सीच्या काळात हे उघड झालं आहे. ते त्यांचा मूर्खांचा ऑस्कर ठेवू शकतात, असं म्हणत कंगनानं अमेरिकेला खडे बोल सुनावले आहेत.

Kangana Ranaut On Oscar: कंगना रणौतची (Kangana Ranaut) फिल्म 'इमर्जन्सी' (Emergency) नेटफ्लिक्सवर (Netflix) रिलीज झाल्यापासूनच तिच्यावर कौतुकाचा वर्षाव होत आहे. अशातच आता कंगनानं प्रतिष्ठेच्या समजल्या जाणाऱ्या ऑस्कर पुरस्कारांवर (Oscar Awards) टिप्पणी केली असून ऑस्करपेक्षा राष्ट्रीय पुरस्कार (National Awards) महत्त्वाचे असल्याचं म्हटलं आहे. दरम्यान, 'इमर्जन्सी' मधला कंगनाचा परफॉर्मन्स बेस्ट असल्याचं अनेकजण म्हणत आहेत.
कंगना रणौतचा 'इमर्जन्सी' (Emergency) गेल्या आठवड्यात नेटफ्लिक्सवर रिलीज झाला. अशातच कंगनानं तिच्या चित्रपटाला इन्स्टाग्रामवर मिळालेल्या रिअॅक्शन्स शेअर केल्या आहेत. एका युजरनं कंगनाच्या 'इमर्जन्सी'ला ऑस्कर मिळाला पाहिजे, असं म्हटलं आहे. पण कंगनाला ऑस्करमध्ये अजिबातच इंटरेस्ट नसल्याचं तिनं स्वतः म्हटलं आहे. अशातच आणखी एका युजरनं ट्वीटमध्ये लिहिलंय की, "#EmergencyOnNetflix' ला भारताकडून ऑस्करला पाठवलं पाहिजे. कंगना काय फिल्म आहे"
युजरचं हे ट्वीट कंगनानं मेसेजसह रिपोस्ट केलं आहे. तसेच, कंगनानं ट्वीटमध्ये म्हटलंय की, "पण अमेरिका आपला खरा चेहरा आणि ते विकसनशील देशांना कसे धमकावतात, दडपतात आणि दबाव आणतात हे स्वीकारू इच्छित नाही. इमर्जन्सीच्या काळात हे उघड झालं आहे. ते त्यांचा मूर्खांचा ऑस्कर ठेवू शकतात. आपल्याकडे राष्ट्रीय पुरस्कार आहेत."
चित्रपट निर्माते संजय गुप्ता यांनीही कंगनाच्या सिनेमाचं कौतुक केलं आहे. त्यांनी लिहिलं आहे की, "आज मी @KanganaTeam ची 'इमर्जन्सी' पाहिली. खरं सांगायचं तर, मी हा चित्रपट पाहण्याचा विचार करत नव्हतो, कारण मी आधीपासूनच या चित्रपटाबाबत काही अंदाज बांधले होते. पण, मी चुकलो याचा मला आनंद आहे. कंगनाचा हा चित्रपट खूपच छान आहे, तिचा अभिनय आणि दिग्दर्शन दोन्हीही उत्तम आहे. उत्कृष्ट आणि जागतिक दर्जाचे..."
संजय गुप्तांच्या पोस्टवर कंगनाचं सडेतोड उत्तर
निर्माते संजय गुप्ता यांच्या पोस्टवर कंगनानं उत्तर दिलंय की, "फिल्म इंडस्ट्रीला द्वेष आणि पूर्वग्रहांमधून बाहेर पडून चांगंल काम करता आलं पाहिजे, संजय जी,पूर्वग्रहांचे बंधन तोडल्याबद्दल धन्यवाद. सर्व चित्रपटसृष्टीतील लोकांना माझा संदेश आहे की, माझ्याबद्दल कधीही कोणताही अंदाज बाळगू नका, मला समजून घेण्याचा प्रयत्नही करू नका, मी या गोष्टींच्या पलीकडे आहे."
'इमर्जन्सी'साठी कंगनाचं कौतुक
एका युजरनं चित्रपटातील तिच्या अभिनयाचं कौतुक केलं आणि तिनं उत्तर दिलं की, "लोक #Emergency मधील माझ्या अभिनयाला अद्भुत आणि आतापर्यंतचं माझं सर्वोत्तम काम म्हणत आहेत, मी क्वीन, टीडब्ल्यूएम 2, फॅशन, थलाईवीला मागे टाकू शकेन का?" #इमर्जन्सी पाहा आणि जाणून घ्या.
'इमर्जन्सी' पहिल्या नंबरवर होतोय ट्रेंड
'इमर्जन्सी' शुक्रवारी नेटफ्लिक्सवर प्रदर्शित झाला आणि रविवारी संध्याकाळपर्यंत तो चित्रपटांच्या यादीत पहिल्या क्रमांकावर ट्रेंड करत होता. त्यानंतर अजय देवगणचा 'आझाद' आणि नागा चैतन्य-साई पल्लवीचा 'थंडेल' ट्रेंड करत आहे.
'इमर्जन्सी'ची पटकथा आणि स्टारकास्ट
कंगना राणौतचा 'इमर्जन्सी' देशातील आणीबाणीची परिस्थिती दाखवतो आणि यामध्ये कंगनानं माजी पंतप्रधान इंदिरा गांधी यांची भूमिका साकारली आहे. हा चित्रपट 1975 मध्ये तत्कालीन पंतप्रधानांनी लादलेल्या 21 महिन्यांच्या आणीबाणीबद्दल आहे. 'इमर्जन्सी'मध्ये अनुपम खेर, श्रेयस तळपदे, विशाख नायर, मिलिंद सोमण आणि दिवंगत अभिनेते सतीश कौशिक देखील महत्त्वाच्या भूमिकेत आहेत.
महत्त्वाच्या इतर बातम्या :
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज

