अंतिम सामन्यात भारताने न्यूझीलंडला पराभूत करून विजेतेपद जिंकले आणि ट्रॉफीसह खेळाडू आपल्या मायदेशी परतले आहेत.
पुरस्कार वितरण सोहळ्यालादरम्यान आयसीसीचे अध्यक्ष जय शहा यांच्यासह 4 अधिकारी मंचावर उपस्थित होते.
बीसीसीआयचे अध्यक्ष रॉजर बिन्नी आणि सचिव देवजित सायकिया, न्यूझीलंडचे संचालक रॉजर ट्वोझ उपस्थित होते.
पाकिस्तान हा चॅम्पियन्स ट्रॉफी 2025 चा यजमान असूनही पीसीबी बोर्डाचा एकही अधकारी का उपस्थित नव्हता? असा प्रश्न पाकिस्तानच्या एका माजी क्रिकेटपटूने तसेच आणि काही लोकांनी उपस्थित केला.
आयसीसीच्या प्रवक्त्याने टीव्हीशी बोलताना सांगितले की, आयसीसीने पीसीबीचे प्रमुख मोहसिन नकवी यांच्यासाठी पुरस्कार वितरण सोहळ्यादरम्यान स्टेजवर व्यवस्था करण्यात आली होती पण ते पोहोचले नाहीत.
नियमानुसार, आयसीसी फक्त होस्ट बोर्डाच्या प्रमुखांना बोलविते. जसे की अध्यक्ष, उपाध्यक्ष, किंवा मुख्य कार्यकारी अधिकारी.
इतर बोर्ड अधिकारी, कार्यक्रमस्थळी उपस्थित असले तरीही ते स्टेजवर उपस्थित नसतात.