एक्स्प्लोर

Corona Effect | कोरोना व्हायरसमुळे सर्वोच्च न्यायालयाच्या कामकाजात अनेक ऐतिहासिक बदल

सर्वोच्च न्यायालयाच्या इतिहासात पहिल्यांदाच एका न्यायाधीशांच्या खंडपीठाची व्यवस्था करण्यात आली. आतापर्यंत 2 किंवा अधिक न्यायाधीशांचे एक खंडपीठ होते.

नवी दिल्ली : कोरोना व्हायरसमुळे जगभरात अनेक सकारात्मक-नकारात्मक बदल झाले. भारतातही अनेक गोष्टींमध्ये बदल झाले. सर्वोच्च न्यायालयानेही कोरोनाच्या संकटात कामकाजात काही बदल करत काम सुरुच ठेवलं. यातल्या काही बदलांचा कधी विचारही केला जाऊ शकत नव्हता, असे ऐतिहासिक बदल सर्वोच्च न्यायालयाने कामकाजात केले आहेत.

व्हिडीओ कॉन्फरन्सिंगची सुरुवात

कोरोना व्हायरसचा प्रादुर्भाव आणि लॉकडाऊन असूनही, सर्वोच्च न्यायालयाने आपल्या कामकाजात व्यत्यय येऊ दिला नाही. लॉकडाऊन जाहीर झाल्यानंतर काही दिवसातच सर्वोच्च न्यायालयाने व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे महत्त्वपूर्ण प्रकरणांची सुनावणी करण्यास सुरुवात केली. आठवड्यातून 3 ते 4 दिवस महत्वाच्या प्रकरणांच्या सुनावणींना न्यायाधीशांनी सुरुवात केली. कधी एका खंडपीठाने तर कधी दोन खंडपीठांनी न्यायालयाची कार्यवाही सुरु ठेवली.

माध्यमांसाठी विशेष सुविधा

भारतातील न्यायालये ओपन कोर्ट सिस्टमनुसार चालतात. त्यामुळे पत्रकार न्यायालयात हजर राहून न्यायालयाच्या कार्यवाहीचा अहवाल देतात. सध्या सुरु असलेली व्हिडीओ कॉन्फरन्सिंग सुनावणी पत्रकारांना पाहता यावी याची व्यवस्था सर्वोच्च न्यायालयाने केली आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या एका इमारतीतील एका खोलीत सुनावणीची लाईव्ह व्हिडिओ लिंक माध्यमांना उपलब्ध करुन देण्यात आली आहे.

आतापर्यंत व्हिडीओ कॉन्फरन्सिंगच्या सुनावणीत न्यायाधीश त्यांच्या घरातून सुनावणी घेत असत. वरिष्ठ न्यायाधीशांच्या घरी असलेल्या कार्यालयात इतर न्यायाधीश त्यांच्यासोबत बसत. मात्र यात आता बदल झाले आणि सर्वोच्च न्यायालयात बनलेल्या खोलीत न्यायाधीश बसू लागले आहेत. मात्र वकील अजूनही त्यांच्या घर किंवा कार्यालयातून न्यायाधीशांशी संवाद साधत आहेत. येत्या आठवड्यापासून अनेक खंडपीठ एकत्र बसण्यास सुरुवात करणार असल्याचे न्यायालयाने संकेत दिले आहेत.

पहिल्यांदाच एका न्यायाधीशांचं खंडपीठ

सर्वोच्च न्यायालयाच्या इतिहासात पहिल्यांदाच एका न्यायाधीशांच्या खंडपीठाची व्यवस्था करण्यात आली. आतापर्यंत 2 किंवा अधिक न्यायाधीशांचे एक खंडपीठ होते. लॉकडाऊन दरम्यान जमा झालेल्या खटल्यांचा ओढा कमी करण्यासाठी नियम बदलून एका न्यायाधीशांचं खंडपीठ करण्यात आलं. या खंडपीठाचे न्यायाधीश 7 वर्षांपर्यंत शिक्षेच्या गुन्ह्यांसाठी जामीन याची प्रकरणं पाहतील. तसेच दिवाणी व फौजदारी खटल्यांमध्ये एका ठिकाणाहून दुसर्‍या ठिकाणी बदली करण्याच्या अर्जावर विचार करतील.

सुट्ट्या कमी होण्याची शक्यता

सर्वोच्च न्यायालायाला यावेळी उन्हाळ्याची सुट्टी केवळ दोन आठवड्यांसाठी असेल, असेही संकेत मिळत आहेत. सर्वोच्च न्यायालयाची सुट्टी कमी झाल्यास हे सर्वोच्च न्यायालयाच्या इतिहासात पहिल्यांदाच घडेल. सर्वोच्च न्यायालयाला दरवर्षी उन्हाळ्यात सुमारे दीड महिना सुट्टी असते. सुट्टी मे महिन्याच्या मध्यापासून जुलैच्या पहिल्या आठवड्यापर्यंत असते. मात्र गेल्या 2 महिन्यांपासून नियमितपणे सुनावणी न झाल्याने उन्हाळ्याची सुट्टी कमी करण्याचा विचार न्यायालय करत आहे.

ड्रेस कोडमध्ये बदल

सर्वोच्च न्यायालयातील न्यायाधीश आणि वकील यांना सुनावणीदरम्यानच्या काळा कोट आणि त्यावर गाऊन घालणे बंधनकारक आहे. तसेच न्यायाधीश आणि वकील त्यांच्या शर्टवर बॅन्ड लावतात. आज झालेल्या सुनावणीदरम्यान सरन्यायाधीश शरद बोबडे आणि इतर न्यायाधीश कोट आणि गाऊन न घातला सुनावणीला बसले. मात्र पांढर्‍या शर्टवर त्यांनी बँड घातला होता. सरन्यायाधीश म्हणाले की, कोट-गाऊनसारख्या कपड्यांमध्ये कोरोना व्हायरस टीकण्याची शक्यता जास्त आहे. म्हणूनच सध्याच्या परिस्थितीत आम्ही वकील आणि न्यायाधीशांचा ड्रेस कोड बदलणार आहोत आणि हे लवकरच सार्वजनिक केले जाईल.

महत्त्वाच्या बातम्या

महिलांसाठी गुड न्यूज! आता तिसऱ्या अपत्याच्या जन्मासाठीही मिळणार 365 दिवसांची रजा, 'या' सरकारनं घेतला मोठा निर्णय 
महिलांसाठी गुड न्यूज! आता तिसऱ्या अपत्याच्या जन्मासाठीही मिळणार 365 दिवसांची रजा, 'या' सरकारनं घेतला मोठा निर्णय 
Satyendar Jain Arrested: आम आदमी पार्टीचे नेते सत्येंद्र जैन यांना एसीबीकडून अटक, मोदी सरकारचा अंत निश्चित, केजरीवालांचा आरोप, भाजपकडूनही पलटवार
मोठी बातमी, आम आदमी पार्टीचे नेते सत्येंद्र जैन यांना एसीबीकडून अटक
Bangladesh : भारतावर जळणारा बांगलादेश अंधारात, मदतीसाठी भारताकडे याचना; परराष्ट्र मंत्रालय म्हणाले, आमच्या गरजा लक्षात घेऊन...
भारतावर जळणारा बांगलादेश अंधारात, मदतीसाठी भारताकडे याचना; परराष्ट्र मंत्रालय म्हणाले, आमच्या गरजा लक्षात घेऊन...
तुम्हाला UPSC तयारी करायचीय? मुख्य परीक्षा उत्तीर्ण होण्यासाठी किती लागतात गुण? गेल्या तीन वर्षातील कट ऑफ किती? 
तुम्हाला UPSC तयारी करायचीय? मुख्य परीक्षा उत्तीर्ण होण्यासाठी किती लागतात गुण? गेल्या तीन वर्षातील कट ऑफ किती? 

व्हिडीओ

Nashik Crime : लिव्ह इनमध्ये राहणाऱ्या प्रेयसीकडून हत्या Special Report
Vinod Tawde UP incharge : विनोद तावडेंची कामगिरी, उत्तर प्रदेशची जबाबदारी Special Report
Maharashtra Weather Rain Updates: पावसाचं पॅटर्न बदललं? जुलैमध्ये धो धो कोसळला, ऑगस्टमध्ये गायब; पुढे काय, हवामान विभागाची A टू Z माहिती
Laxman Hake PC : ओबीसींनी ज्यांना मतदान केलं त्या सत्ताधाऱ्यांनी तुम्हाला निर्वस्त्र केलंय
Devendra Fadnavis On Tukaram Mundhe FDA: तुकाराम मुंढेंच्या धडक कारवाईवर फडणवीस पहिल्यांदाच बोलले

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Mumbai : मुंबईत रिक्षा चालवणार, पैसे कमावणार... पण मराठी बोलणार नाही; उत्तर भारतीय रिक्षा चालकाचा माज, प्रताप सरनाईकांना थेट चॅलेंज
मुंबईत रिक्षा चालवणार, पैसे कमावणार... पण मराठी बोलणार नाही; उत्तर भारतीय रिक्षा चालकाचा माज, प्रताप सरनाईकांना थेट चॅलेंज
Dhruv Jurel Catch Controversy : OUT की OUT Not? ध्रुव जुरेलच्या 'त्या' वादग्रस्त कॅचनंतर राडा! श्रीलंकेच्या खेळाडूंचा पारा चढला; नेमकं काय घडलं? Video
ध्रुव जुरेलच्या 'त्या' वादग्रस्त कॅचनंतर राडा! श्रीलंकेच्या खेळाडूंचा पारा चढला; नेमकं काय घडलं? Video
Home Loan : 20 वर्षांचं गृहकर्ज 12 वर्षात कसं फेडायचं? 5 सोपे, प्रभावी उपाय आणि लाखो रुपये वाचवा,जाणून घ्या
20 वर्षांचं गृहकर्ज 12 वर्षात कसं फेडायचं? 5 सोपे,प्रभावी उपाय आणि लाखो रुपये वाचवा,जाणून घ्या
Satyendar Jain Arrested: आम आदमी पार्टीचे नेते सत्येंद्र जैन यांना एसीबीकडून अटक, मोदी सरकारचा अंत निश्चित, केजरीवालांचा आरोप, भाजपकडूनही पलटवार
मोठी बातमी, आम आदमी पार्टीचे नेते सत्येंद्र जैन यांना एसीबीकडून अटक
Beed : सीझरनंतर महिला डॉक्टरांनी पोटातच सोडले हातमोजे अन् कागद; बाळाला जन्म देताच आईची मृत्यूशी झुंज
सीझरनंतर महिला डॉक्टरांनी पोटातच सोडले हातमोजे अन् कागद; बाळाला जन्म देताच आईची मृत्यूशी झुंज
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 18 ऑगस्ट 2026 | मंगळवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 18 ऑगस्ट 2026 | मंगळवार
El Nino : अल निनो मजबूत! भारतात दुष्काळाचा धोका 70% पर्यंत वाढला; पिकांचं नुकसान अन् महागाईचा भडका उडण्याची भीती, सर्वसामान्यांच्या ताटावर होणार परिणाम?
अल निनो मजबूत! भारतात दुष्काळाचा धोका 70% पर्यंत वाढला; पिकांचं नुकसान अन् महागाईचा भडका उडण्याची भीती, सर्वसामान्यांच्या ताटावर होणार परिणाम?
Abhijeet Dipke: चिमुकल्या विद्यार्थ्यांना वर्गात झाडू मारताना पाहून अभिजीत दिपके संतापले, शिक्षकांना सुनावलं, म्हणाला....
चिमुकल्या विद्यार्थ्यांना वर्गात झाडू मारताना पाहून अभिजीत दिपके संतापले, शिक्षकांना सुनावलं, म्हणाला....
Embed widget