Constitution Day : भारतीय संविधानाची मूळ प्रत कुठे आहे माहितीय का? वाचा संविधानाची माहिती
Constitution Day 2022 : आज संविधान दिनाच्या निमित्ताने आपलं संविधान कसं तयार केलं म्हणजेच त्याचा इतिहास काय आहे आणि याच्याशी संबंधित काही रंजक गोष्टी जाणून घेऊया...
Constitution Day 2022 : भारतीय इतिहासातील 26 नोव्हेंबर हा 'संविधान दिन' (Constitution Day) म्हणून जरी साजरा केला जात असला तरी संविधानच्या अंमलबजावणी 26 जानेवारी 1950 पासून करण्यात आली आहे. संविधान ज्या दिवशी स्वीकारलं त्या तारखेला म्हणजे 26 नोव्हेंबरला संविधान दिन साजरा केला जातो आणि 26 जानेवारीला प्रजासत्ताक दिन साजरा केला जातो. भारत सरकारने 2015 मध्ये 'संविधान दिन' साजरा करण्यास सुरुवात झाली. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या योगदानाचा सन्मान करण्यासाठी आणि संविधानाच्या महत्त्वाचा प्रसार करण्यासाठी 'संविधान दिन' साजरा केला जातो. भारतीय संविधानाची मूळ संसदेच्या वाचनालयातील हिलियम भरलेल्या बॉक्समध्ये ठेवलं आहे.
जगातील सर्वात मोठी लोकशाही असणार्या भारताने भारतीय संविधानाच्या अंमलबजावणीने खर्या अर्थाने लोकशाहीची प्रस्थापना झाली. सर्वश्रेष्ठ संविधान समजले जाणारे भारतीय संविधान 26 नोव्हेंबर 1949 रोजी घटना समितीने स्वीकारले होते. मात्र त्याची खर्या अर्थाने अंमलबजावणी मात्र 26 जानेवारी 1950 पासून करण्यात आली.
चित्रकारी
संविधानाचं प्रत्येक पान चित्रांनी सजवण्याचं काम आचार्य नंदलाल बोस यांच्यावर सोपवण्यात आलं होतं. पंडित जवाहरलाल नेहरु आणि नंदलाल बोस यांची भेट शांतीनिकेतनमध्ये झाली होती. त्यावेळी नेहरुंनी त्यांच्यासमोर हा प्रस्ताव ठेवला होता. त्यांच्या मार्गदर्शनात त्यांच्या शिष्यांनी संविधान सजवण्याचं काम केलं. मोठी चित्र स्वत: नंदलाल बोस यांनी रंगवली आहेत. संविधानचा सर्वात महत्त्वाचं 'प्रस्तावना' पान सजवण्याचं काम व्यौहार राममनोहर सिन्हा यांनी केलं. ते नंदलाल बोस यांचे एक शिष्य होते.
सर्वात मोठं संविधान
भारताचं संविधान हे जगातील सर्वात मोठं आणि सर्वात विस्तृत संविधान आहे. यामध्ये 25 भाग, 448 अनुच्छेद आणि 12 परिशिष्ट आहेत. मूळ संविधानात 395 आर्टिकल्स आणि 9 परिशिष्ट होते. भारतीय संविधानाचं सर्वात मोठं सौंदर्य म्हणजे हे तयार करताना सांस्कृतिक, धार्मिक आणि भौगोलिक विविधता ध्यानात घेतली होती.
उधारीची थैली
भारताच्या संविधानाला उधारीची थैलीही म्हटलं जातं. यामधील अनेक महत्त्वाच्या गोष्टी इतर संविधानांमधून घेण्यात आल्यात आहेत. स्वातंत्र्य, समता आणि बंधुत्वचे सिद्धांत फ्रान्सच्या संविधानातून घेतले आहेत. पंचवार्षिक योजनेची कल्पना यूएसएसआरकडून घेतली होती. सामाजिक-आर्थिक अधिकाराचा सिद्धांत आयर्लंडकडून घेतला आहे. तर सर्वात महत्त्वाचं, ज्या कायद्यावर सुप्रीम कोर्ट काम करतं, ते जपानकडून घेतलं आहे. अशा अनेक गोष्टी आहेत ज्या इतर देशांच्या संविधानातून घेतल्या आहेत.