एक्स्प्लोर

Devendra Fadnavis On Chhava Movie Tax Free: "'छावा' चित्रपट टॅक्स फ्री करणं शक्य नाही..."; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचं मोठं वक्तव्य, नेमकं काय म्हणाले?

Devendra Fadnavis On Chhava Movie Tax Free: चोहीकडून राज्यात 'छावा' चित्रपट टॅक्स फ्री होण्याची मागणी होत आहे. अशातच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी 'छावा' चित्रपट टॅक्स फ्री करणं शक्य नाही, असं म्हटलं आहे.

Devendra Fadnavis On Chhava Movie Tax Free: विक्की कौशल (Vicky Kaushal) अभिनीत आणि लक्ष्मण उतेकर (Laxman Utekar) दिग्दर्शित'छावा' चित्रपटानं (Chhaava Movie) फक्त राज्यात किंवा देशातच नाहीतर संपूर्ण जगभरात धुमाकूळ घातला आहे. 2025 चा सर्वात मोठा ओपनर ठरलेल्या 'छावा' चित्रपटानं विक्रमांचे अनेक डोंगर उभे केले आहेत. महाराष्ट्रात तर प्रेक्षकांनी 'छावा' चित्रपटाला डोक्यावर घेतलं आहे. अशातच आता महाराष्ट्रात 'छावा' चित्रपट टॅक्स फ्री (Chhaava Movie Tax Free) करण्याच्या मागणीनं जोर धरला आहे. याबाबत राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (CM Devendra Fadnavis) यांनी महत्त्वाचं वक्तव्य केलं आहे. तसेच, 'छावा'च्या निर्मात्यांचं अभिनंदनही देवेंद्र फडणवीस यांनी केलं आहे. 

'छावा' चित्रपटाबाबत बोलताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की, "मला एका गोष्टीचा आनंद आहे की, छत्रपती संभाजी महाराज ज्यांचं शौर्य, विरता आणि विद्वत्ता प्रचंड होती, पण इतिहासानं त्यांच्यावर मोठा अन्याय केला. ज्यांच्याबद्दल 'देश धरम पर मिटने वाला, शेर शिवा का छावा था। महापराक्रमी परमप्रतापी, एक ही शंभू राजा था', असं म्हटलं गेलं त्यांच्यावर अतिशय चांगला, इतिहासाशी कुठलीही प्रतारणा न करता ऐतिहासिक असा सिनेमा तयार झाला आहे. त्याबद्दल सिनेमाचे निर्माते, दिग्दर्शक आणि प्रमुख भूमिका करणाऱ्या विक्की कौशल यांचं मानापासून अभिनंदन करतो."

'छावा' टॅक्स फ्री करू शकत नाही : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

महाराष्ट्रात 'छावा' चित्रपट टॅक्स फ्री करण्याबाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की, "छावा' सिनेमा टॅक्स फ्री करा, अशी मागणी मोठ्या प्रमाणावर होत आहे. पण, मला महाराष्ट्रातील जनतेला सांगायतंय की, इतर राज्य जेव्हा चित्रपट टॅक्स फ्री करतात, तेव्हा जो करमणूक कर असतो, तो माफ केला जातो. महाराष्टानं 2017 सालीच यासंदर्भातला निर्णय घेतला आणि महाराष्ट्रात करमणूक कर हा नेहमी‍करिता रद्द केला. आपल्याकडे करमणूक कर नाही. त्यामुळे अशी माफी देण्यासाठी असा करच आपल्याकडे नाही.", असं देवेंद्र फडणवीस म्हणाले. पुढे बोलताना देवेंद्र फडणवीस यांनी 'छावा'च्या प्रमोशनकरता किंवा छत्रपती शंभू राजेंचा इतिहास हा प्रत्येक व्यक्तीपर्यंत पोहचवण्यासाठी आपल्याला अधिक काय चांगलं करता येईल ते आपण करू, असं आश्वासनही दिलं आहे. 

केकेआरच्या ट्वीटबाबत देवेंद्र फडणवीस काय म्हणाले? 

बॉलिवूड अभिनेता केकेआरनं काही दिवसांपू्र्वी छत्रपती संभाजी महाराजांबाबत आक्षेपार्ह्य पोस्ट केली होती. ती पोस्ट करताना केकेआरनं विकीपीडियाचा आधार घेतला होता. यावर बोलताना देवेंद्र फडणवीस म्हणाले की, "अपमान करणाऱ्यांना त्यांची जागा आम्ही दाखवू, अशा प्रकारे कोणी वागत असेल तर सरकारही माफ करणार नाही आणि शिवप्रेमीही माफ करणार नाहीत..."

"केवळ महाराष्ट्रातीलच नाही तर जगभरातील शिवप्रेमींना छत्रपती शिवरायांच्या जन्मोत्सवाच्या खूप खूप शुभेच्छा. छत्रपती होते म्हणून आम्ही आहोत. छत्रपतींनी आम्हाला आत्माभिमान दिला, आत्मतेज दिलं. छत्रपती शिवाजी महाराज यांनी आम्हाला समतेचा संदेश दिला. 18 पगड जातींना एकत्रित करून ज्या स्वराज्याची त्यांनी स्थापना केली त्या स्वराज्यातून एकतेचा संदेश त्यांनी आम्हाला दिला. राज्यकारभार कसा चालवला पाहिजे हे आम्हाला छत्रपती शिवाजी महाराज यांनी आम्हाला शिकवलं. वनसंवर्धन, जलसंवर्धन कसं केलं पाहिजे हे शिवरायांनी शिकवलं. करप्रणाली कशी असली पाहिजे, सुरक्षा, समुद्री सुरक्षा कशी ठेवली पाहिजे हे महाराजांनी आम्हाला शिकवलं.", असं देवेंद्र फडणवीस म्हणाले. 

महत्त्वाच्या इतर बातम्या : 

Sharad Ponkshe in Beed: "भयंकर, मला इथे परत येण्याची इच्छाच नाही..."; बीडमधील 'त्या' प्रकारानंतर शरद पोंक्षे रागानं लालबुंद

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

हिवाळ्याच्या थंडीत आवर्जुन खावा चाकवताची भाजी, पचनसंस्था अन् हाडांना बळकटी; जाणून घ्या गुणकारी फायदे
हिवाळ्याच्या थंडीत आवर्जुन खावा चाकवताची भाजी, पचनसंस्था अन् हाडांना बळकटी; जाणून घ्या गुणकारी फायदे
Smriti Mandhana : स्मृती मानधनाची पलाश मुच्छल सोबतचं लग्न स्थगित झाल्यानंतर पहिली पोस्ट,फॅन्सनी एक गोष्ट हेरली, म्हणाले...
स्मृती मानधनाची पलाश मुच्छल सोबतचं लग्न स्थगित झाल्यानंतर पहिली पोस्ट,फॅन्सनी एक गोष्ट हेरली, म्हणाले...
US Visa Social Media Policy : अमेरिकेला जायचंय, तुमच्या सोशल मीडियाची खात्यांची तपासणी होणार,  डोनाल्ड ट्रम्प प्रशासनाचा नवा निर्णय
अमेरिकेचा व्हिसा हवाय, तुमचा सोशल मीडिया जपून वापरा, ट्रम्प प्रशासन तपासणी करणार
जय की बारात... लेकाच्या लग्नात अजित दादांचा झिंगाट डान्स, रोहित अन् युगेंद्र पवारही एकाच फ्रेममध्ये, पाहा फोटो
जय की बारात... लेकाच्या लग्नात अजित दादांचा झिंगाट डान्स, रोहित अन् युगेंद्र पवारही एकाच फ्रेममध्ये, पाहा फोटो

व्हिडीओ

Election Update : राज्यातील सहकारी संस्थांच्या निवडणुका पुढे ढकलण्याचा निर्णय
Thackeray Sena Vs BJP Rada : ठाकरेंची शिवसेना, भाजपमध्ये कामगार युनियनवरुन राडा
PM Narendra Modi : भारत आणि रशियात विन-विन संबंध बनले, उर्जा सुरक्षा ही दोन्ही देश संबंधात मोठी बाब
Vladimir Putin : उर्जा क्षेत्रात विना अडथळा भारताला पुरवठा करत राहणार, पुतीन यांचं महत्वाचं विधान
Amol Kolhe Lok Sabha : अमोल कोल्हे यांच्या प्रश्नाला केंद्रीय जलशक्ती मंत्र्‍यांचं मराठीतून उत्तर

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
हिवाळ्याच्या थंडीत आवर्जुन खावा चाकवताची भाजी, पचनसंस्था अन् हाडांना बळकटी; जाणून घ्या गुणकारी फायदे
हिवाळ्याच्या थंडीत आवर्जुन खावा चाकवताची भाजी, पचनसंस्था अन् हाडांना बळकटी; जाणून घ्या गुणकारी फायदे
Smriti Mandhana : स्मृती मानधनाची पलाश मुच्छल सोबतचं लग्न स्थगित झाल्यानंतर पहिली पोस्ट,फॅन्सनी एक गोष्ट हेरली, म्हणाले...
स्मृती मानधनाची पलाश मुच्छल सोबतचं लग्न स्थगित झाल्यानंतर पहिली पोस्ट,फॅन्सनी एक गोष्ट हेरली, म्हणाले...
US Visa Social Media Policy : अमेरिकेला जायचंय, तुमच्या सोशल मीडियाची खात्यांची तपासणी होणार,  डोनाल्ड ट्रम्प प्रशासनाचा नवा निर्णय
अमेरिकेचा व्हिसा हवाय, तुमचा सोशल मीडिया जपून वापरा, ट्रम्प प्रशासन तपासणी करणार
जय की बारात... लेकाच्या लग्नात अजित दादांचा झिंगाट डान्स, रोहित अन् युगेंद्र पवारही एकाच फ्रेममध्ये, पाहा फोटो
जय की बारात... लेकाच्या लग्नात अजित दादांचा झिंगाट डान्स, रोहित अन् युगेंद्र पवारही एकाच फ्रेममध्ये, पाहा फोटो
धक्कादायक! बीडमार्गे शिर्डीला निघालेल्या भाविकांना मध्यरात्री लुटले, ट्रकचालकाने व्हिडिओतून सांगितला थरारक प्रसंग
धक्कादायक! बीडमार्गे शिर्डीला निघालेल्या भाविकांना मध्यरात्री लुटले, ट्रकचालकाने व्हिडिओतून सांगितला थरारक प्रसंग
हा सागरी किनारा... नॅशनल क्रश पुन्हा चर्चेत, निळाभोर समुद्र, मंद वारा अन् गिरीजाचा लाजरा नं साजरा मुखडा
हा सागरी किनारा... नॅशनल क्रश पुन्हा चर्चेत, निळाभोर समुद्र, मंद वारा अन् गिरीजाचा लाजरा नं साजरा मुखडा
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 05 डिसेंबर 2025 | शुक्रवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 05 डिसेंबर 2025 | शुक्रवार
जामखेडमध्ये नर्तिकेनं लॉजवरच संपवलं जीवन, रोहित पवारांचं ट्विट, तो व्यक्ती कोण, कोणत्या पक्षाशी निगडीत?
जामखेडमध्ये नर्तिकेनं लॉजवरच संपवलं जीवन, रोहित पवारांचं ट्विट, तो व्यक्ती कोण, कोणत्या पक्षाशी निगडीत?
Embed widget